मुंबई : महाराष्ट्राचे माजी गृहमंत्री अनिल देशमुख (Anil Deshmukh) यांच्यासह बडतर्फ सहाय्यक पोलीस निरीक्षक सचिन वाझे (Sachin Vase) आणि अन्य दोघांना भ्रष्टाचाराच्या एका प्रकरणात मुंबईतील विशेष सीबीआय न्यायालयाने शनिवारी 29 एप्रिलपर्यंत न्यायालयीन कोठडी (Judicial Custody) सुनावली. अनिल देशमुख यांची सीबीआय कोठडी वाढवून देण्यासाठी सीबीआयने विनंती केली होती. ती विनंती अमान्य करीत न्यायालयाने देशमुखांसह वाझे व इतर दोघांची न्यायालयीन कोठडीत रवानगी केली. त्यामुळे हा निर्णय सीबीआयसाठी धक्का देणारा असून अनिल देशमुख यांच्यासाठी काही अंशी दिलासासादायक मानला जात आहे. अनिल देशमुख हे कथित 100 कोटी रुपयांच्या वसुली प्रकरणात आरोपी आहेत. (Former Home Minister Anil Deshmukh and three others remanded in judicial custody in corruption case)
माजी गृहमंत्री अनिल देशमुख व त्यांचे दोन साथीदार संजीव पालांडे आणि कुंदन शिंदे यांना अंमलबजावणी संचालनालयाने (ईडी) मनी लॉन्डरिंग प्रकरणात अटक केली होती. त्यानंतर हे तिघे न्यायालयीन कोठडीत होते, तर सचिन वाझे हे अँटिलिया स्फोटके प्रकरण आणि मनसुख हिरन खून प्रकरणात न्यायालयीन कोठडीत होते. या महिन्याच्या सुरुवातीला या सर्व आरोपींना भ्रष्टाचाराच्या प्रकरणात केंद्रीय अन्वेषण विभागाच्या कोठडीत ठेवण्यात आले होते. आज, शनिवारी त्यांच्या सीबीआय कोठडीची मुदत संपली होती. त्यामुळे तपास यंत्रणेने त्यांना विशेष सीबीआय न्यायाधीश डी.पी. शिंगाडे यांच्यासमोर हजर केले होते. यावेळी न्यायाधीशांनी या आरोपींची सीबीआय कोठडी आवश्यक नसल्याचे आढळून आल्यानंतर या चारही आरोपींची न्यायालयीन कोठडीत रवानगी केली.
#Update | Maharashtra | Special CBI court sends former Maharashtra minister Anil Deshmukh, suspended Police officer Sachin Waze, Kundan Shinde and Sanjeev Palande to judicial custody in connection with a corruption case
— ANI (@ANI) April 16, 2022
सचिन वाझे, पालांडे आणि शिंदे यांच्या कोठडीत वाढ करण्याची मागणी न करता सीबीआयने अनिल देशमुख यांची आणखी तीन दिवस कोठडी मागितली. मात्र, सीबीआयची ही विनंती फेटाळून लावत न्यायालयाने चारही आरोपींना न्यायालयीन कोठडी सुनावली. मुंबईचे माजी पोलीस आयुक्त परमबीर सिंह यांनी तत्कालीन गृहमंत्री देशमुख यांच्यावर मुंबई शहरातील बार आणि रेस्टॉरंटमधून १०० कोटी रुपये उकळल्याचा आरोप केला होता. त्यानंतर गेल्या वर्षी एप्रिलमध्ये मुंबई उच्च न्यायालयाने दिलेल्या निर्देशानुसार सीबीआयने चौकशी केली . त्या चौकशीमध्ये भ्रष्ट्राचाराच्या आरोपांमध्ये तथ्य आढळून आल्यानंतर सीबीआयने एफआयआर दाखल केला होता.
माझ्या मते सीबीआयला अनिल देशमुख यांची पुरेशी कोठडी मंजूर केली होती. त्यामुळे अनिल देशमुख यांच्या सीबीआय कोठडीची मुदत वाढवण्यामागे ठोस आणि समाधानकारक कारण नाही. त्यामुळे हे न्यायालय अनिल देशमुख यांच्या सीबीआय कोठडीत वाढ देण्यास इच्छुक नाही. सध्या देशमुख यांच्यासह इतर आरोपींना न्यायालयीन कोठडीत ठेवण्याची गरज आहे, असे मत विशेष सीबीआय न्यायाधीशांनी यावेळी व्यक्त केले. (Former Home Minister Anil Deshmukh and three others remanded in judicial custody in corruption case)
इतर बातम्या
PNB Scam : मेहुल चोक्सीच्या नाशिकातील मालमत्तांवर टाच; ‘आयकर’ची कारवाई
केरळमधील बदलापूर? SDPI कार्यकर्त्याची हत्येनंतर 24 तासांत दुकानात घुसून RSS नेत्याची हत्या