अनिल देशमुखांवरील मनी लाँड्रिंगचे आरोप, माजी पीए पालांडे-शिंदेविरोधात आरोपपत्र दाखल होणार
ईडीच्या कायद्यानुसार 60 दिवसात आरोपपत्र दाखल करायचं असतं. त्यानुसार पालांडे आणि शिंदे यांना अटक करुन आज 60 दिवस होत आहेत. यामुळे ईडीच्या वतीने विशेष ईडी कोर्टात हे आरोपपत्र दाखल केलं जाणार आहे.
मुंबई : माजी गृहमंत्री अनिल देशमुख (Anil Deshmukh) यांच्यावरील मनी लाँड्रिंगच्या आरोपांप्रकरणी आज आरोपपत्र दाखल करण्यात येणार आहे. देशमुखांचे माजी पीए संजीव पालांडे आणि कुंदन शिंदे यांच्याविरोधात आरोपपत्र दाखल होणार आहे. अंमलबजावणी संचलनालयाच्या वतीने विशेष ईडी कोर्टात हे आरोपपत्र दाखल केलं जाणार आहे.
महाराष्ट्राचे माजी गृहमंत्री अनिल देशमुख यांच्या विरोधात मनी लाँड्रिंगचा गुन्हा दाखल करण्यात आला आहे. या प्रकरणात आतापर्यंत संजीव पालांडे आणि कुंदन शिंदे या दोघा जणांना अटक करण्यात आली आहे. हे दोघे अनिल देशमुख यांचे सचिव होते. या दोघांना 25 जून रोजी अटक करण्यात आली होती.
साठ दिवस उलटल्याने आरोपपत्र
पालांडे आणि शिंदे सुरुवातीला ईडीच्या कोठडीत होते. त्यानंतर त्यांना न्यायलयीन कोठडी सुनावण्यात आल्यानंतर त्यांना जेलमध्ये ठेवण्यात आलं. गेल्या दोन महिन्यांपासून ते जेलमध्ये आहेत. त्यांना अटक करून आता 60 दिवस होत आहेत. ईडीच्या कायद्यानुसार 60 दिवसात आरोपपत्र दाखल करायचं असतं. त्यानुसार पालांडे आणि शिंदे यांना अटक करुन आज 60 दिवस होत आहेत. यामुळे ईडीच्या वतीने विशेष ईडी कोर्टात हे आरोपपत्र दाखल केलं जाणार आहे.
आरोपपत्रात महत्वाचे पुरावे
या आरोपपत्रात अनेक महत्वाचे पुरावे आहेत. सचिव वाझेचा जबाब, बार मालकांचा जबाब, इतर बोगस कंपन्यांचे पुरावे, अनिल देशमुख यांच्या संस्थांत आलेल्या पैशाचे पुरावे या आरोपपत्रात आहेत.
संबंधित बातम्या :
पालांडे डील करायचे, कुंदन कॅश स्वीकारायचा, देशमुखांच्या PA वर आरोप, ED पुन्हा समन्स पाठवणार