वांद्रे : मुंबईच्या वांद्रे पूर्व येथील बेहराम नगर(Behram Nagar) येथे ग्राऊंड +4 घर कोसळल्या(Collapse)ची घटना घडली असून या घराच्या ढिगाऱ्याखाली आठ ते नऊ जण अडकल्याची भीती स्थानिक राहिवाशांनी व्यक्त केली होती. त्यातील 7 जणांना आतापर्यंत बाहेर काढण्यात यश आले असून 4 जखमींना व्हिएन देसाई रुग्णालयात तर 3 जणांना जवळच्या भाभा रूग्णालयात उपचारासाठी भर्ती करण्यात आले आहे. अग्निशमन दलाचे जवान आणि मुंबई महानगरपालिकेचे कर्मचारी ढिगाऱ्याखाली आणखी कुणी अडकलंय का ते शोधत आहेत. (Four-storey house collapses in Bandra, seven rescued)
ह्या घराचे बांधकाम सुरू होते. या बांधकामाविरोधात पोलिसात आणि महापालिकेत तक्रार दिली गेली होती. आरोप केला जात आहे की जर महापालिकेने वेळेवर लक्ष दिले असते तर हा अपघात टळला असता. तकार करून देखील दुर्लक्ष केले आहे असा आरोप तक्रारदाराने केला आहे. ही घटना घडली त्यावेळी स्थानिक तरुणांनी लोकांना मदत करून रुग्णालयात पाठविले.
भिवंडीत विटभट्टीवर कोळसा भरलेल्या ट्रकची ट्रॉली झोपडीवर कोसळल्याने तीन चिमुरडींचा दुर्दैवी मृत्यू झाल्याची घटना बुधवारी घडली आहे. भिवंडी तालुक्यातील टेंभवली गावच्या हद्दीतील वीटभट्टीवरील हृदयद्रावक घटना आहे. या घटनेमुळे वीटभट्टी मजूर बाळाराम वळवी यांच्या कुटुंबियांवर दुःखाचा डोंगर कोसळला आहे. झोपडीत झोपलेल्या लावण्या(7), अमिषा (6) आणि प्रीती (3) अशी अपघातात मृत्यू झालेल्या चिमुरड्यांची नावे आहेत. या तिघीही सख्या बहिणी आहेत. याप्रकरणी भिवंडी तालुका पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला आहे.
मालाडमधील मालवणी येथेही मंगळवारी 1+2 झोपडी कोसळल्याची घटना घडली होती. या दुर्घटनेत दोन-तीन जण जळमी झाले आहेत. मात्र सुदैवाने कोणतीही जीवितहानी झाली नाही. अग्निशमन दलाच्या पथकाने तात्काळ घटनास्थळी पोहोचत बचावकार्य केले. जी खोली कोसळली होती ती दुरुस्त केलेली नाही. घरमालकाने घर रिकामे केले आहे. (Four-storey house collapses in Bandra, seven rescued)
इतर बातम्या
Supreme Court : कायदे शिक्षणात ‘असामाजिक’ घटकांचा शिरकाव; सुप्रीम कोर्टाने व्यक्त केली चिंता