Sign In

By signing in or creating an account, you agree with Associated Broadcasting Company's Terms & Conditions and Privacy Policy.

VIDEO : कफ परेड परिसरात भरधाव गाडीने चार जणांना उडवले; अपघाताची भीषण घटना CCTV मध्ये कैद

अन्य लोक जखमी झाले असून जखमींची प्रकृती गंभीर आहे. मुकेश प्रदीप सिंग असे आरोपीचे नाव आहे. याप्रकरणी कफ परेड पोलिसांकडून तपास सुरू आहे.

VIDEO : कफ परेड परिसरात भरधाव गाडीने चार जणांना उडवले; अपघाताची भीषण घटना CCTV मध्ये कैद
कफ परेड परिसरात भरधाव गाडीने चार जणांना उडवलेImage Credit source: TV9
Follow us
| Updated on: Apr 12, 2022 | 10:07 PM

मुंबई : भरधाव वाहनाने 4 ते 5 जणांना उडवल्याची दुर्दैवी घटना मुंबईतील कफ परेड (Cuff Parade) परिसरात घडली आहे. या अपघातात नवी मुंबई पोलीस आयुक्तालयातील वरिष्ठ लिपिकाचा मृत्यू (Death) झाला आहे. प्रसेनजीत धाडसे असे अपघातात मृत्यू झालेल्या लिपिकाचे नाव आहे. अन्य लोक जखमी (Injured) झाले असून जखमींची प्रकृती गंभीर आहे. मुकेश प्रदीप सिंग असे आरोपीचे नाव आहे. याप्रकरणी कफ परेड पोलिसांकडून तपास सुरू आहे. कार चालक नशेत असल्याने त्याच्याकडून हा अपघात घडल्याची माहिती मिळते. या अपघाताची चित्तथरारक दृश्ये सीसीटीव्ही कॅमेऱ्यात कैद झाली आहेत. (Four to five people were blown away by a speeding vehicle in the Cuff Parade area one death)

कसा घडला अपघात ?

कफ परेड परिसरात वर्ल्ड ट्रेड सेंटर गेट क्रमांक 4 च्या समोर मंगळवारी दुपारी 1.50 वाजता ही भीषण घटना घडली. भरधाव वेगात आलेल्या एका लाल रंगाच्या कारने रस्त्यावरील पादचाऱ्यांना उडवले. धक्कादायक म्हणजे कारने एकाला काही अंतरापर्यंत फरफटत नेले. यात त्या व्यक्तीचा मृत्यू झाला आहे. सदर मयत व्यक्ती नवी मुंबई पोलीस आयुक्तालय येथील वरिष्ठ लिपिक असून प्रसेनजित गौतम धाडसे (36) असे त्यांचे नाव आहे. तर अन्य दोन जण जखमी झाले असून त्यांना उपचारासाठी बॉम्बे रुग्णालयात दाखल करण्यात आले आहे. नितेश कुमार मंडल (43) आणि सुजय कुमार विश्वास (35) अशी जखमींची नावे आहेत. नितेश मंडल हे रिझर्व्ह बँक ऑफ इंडियामध्ये एजीएम तर सुजय विश्वास हे एसबीआय कॅपिटलमध्ये असिस्टंट व्हाईस प्रेसिडेंट आहेत.

कारपासून वाचण्याच्या नादात टॅक्सीने एकाला उडवले

भरधाव कारने तिघांना उडवल्याचे पाहताच या कारपासून वाचण्यासाठी कारच्या पुढे चाललेला टॅक्सीवाला रस्त्याच्या कडेला आपली गाडी नेण्याचा प्रयत्न करीत होता. या प्रयत्नात टॅक्सीवाल्यानेही एकाला उडवले आहे. आसिफ अहमद शेख असे या जखमी इसमाचे नाव असून त्यांनाही बॉम्बे रुग्णालयात उपचारासाठी दाखल करण्यात आले आहे. (Four to five people were blown away by a speeding vehicle in the Cuff Parade area one death)

इतर बातम्या

Wardha Murder : वर्ध्यात चारित्र्याच्या संशयातून दगडाने ठेचून पत्नीची हत्या, आरोपी पतीला अटक

Fraud: जमिनीच्या नोंदीसाठी 25 हजारची लाच घेतना तलाठी लाचलूचपतच्या जाळ्यात; कोतवालावरही कारवाई

टोळक्यासोबत डान्स, अन् गर्दीवर पैशांची उधळण; कुख्यात टिपूचा व्हिडिओ
टोळक्यासोबत डान्स, अन् गर्दीवर पैशांची उधळण; कुख्यात टिपूचा व्हिडिओ.
राज्यात अवकाळी पावसाची हजेरी, शेती पिकांचं नुकसान
राज्यात अवकाळी पावसाची हजेरी, शेती पिकांचं नुकसान.
कांदा निर्यात शुल्क रद्द, पण अंमलबजावणी कधी?
कांदा निर्यात शुल्क रद्द, पण अंमलबजावणी कधी?.
बीड कारागृहात उरली फक्त कराड गँग; आठवले आणि गीते गँगचे गंभीर आरोप
बीड कारागृहात उरली फक्त कराड गँग; आठवले आणि गीते गँगचे गंभीर आरोप.
प्रशांत कोरटकरला कोल्हापूर न्यायालयाचा दणका, जामीन अर्ज फेटाळला
प्रशांत कोरटकरला कोल्हापूर न्यायालयाचा दणका, जामीन अर्ज फेटाळला.
एकाच दिवसात 183 जीआर आणि कोट्यवधींच्या निधीचे वाटप
एकाच दिवसात 183 जीआर आणि कोट्यवधींच्या निधीचे वाटप.
'...त्यात तोंड घालू नका', धस दमानिया आणि तृप्ती देसाईंवर भडकले
'...त्यात तोंड घालू नका', धस दमानिया आणि तृप्ती देसाईंवर भडकले.
दिल्लीचा तख्त रखायचा असेल तर.., मुनगंटीवारांनी पुन्हा व्यक्त केली खदखद
दिल्लीचा तख्त रखायचा असेल तर.., मुनगंटीवारांनी पुन्हा व्यक्त केली खदखद.
'एप्रिल फूल' डेला आपल्याकडे 'अच्छे दिन' म्हणतात - आदित्य ठाकरेंची
'एप्रिल फूल' डेला आपल्याकडे 'अच्छे दिन' म्हणतात - आदित्य ठाकरेंची.
पुणे-मुंबई एक्स्प्रेसवेवरून प्रवास करताय? तुमच्यासाठी महत्त्वाची बातमी
पुणे-मुंबई एक्स्प्रेसवेवरून प्रवास करताय? तुमच्यासाठी महत्त्वाची बातमी.