Sign In

By signing in or creating an account, you agree with Associated Broadcasting Company's Terms & Conditions and Privacy Policy.

Salman Khan Threat : लॉरेन्स बिश्नोईनेच दिलं सलमान खानला धमकीचं पत्र, आरोपींनी मुंबईत येताच सौरभ महाकाळची घेतली भेट

एएनआयने दिलेल्या माहितीनुसार, अभिनेता सलमान खान आणि त्याच्या वडिलांना धमकी देणाऱ्या पत्राचा तपास करणाऱ्या मुंबई गुन्हे शाखेच्या पथकाने गुरुवारी पुण्यात जाऊन लॉरेन्स बिश्नोई टोळीचा भाग असलेल्या सौरभ महाकाळची चौकशी केल्याचे एका पोलिस अधिकाऱ्याने सांगितले.

Salman Khan Threat : लॉरेन्स बिश्नोईनेच दिलं सलमान खानला धमकीचं पत्र, आरोपींनी मुंबईत येताच सौरभ महाकाळची घेतली भेट
सलमान खानला संपवण्यासाठी शूटर राजस्थानहून मुंबईत आला पण पुढं जे झालं त्यानं भाई वाचलाImage Credit source: TV9
Follow us
| Updated on: Jun 09, 2022 | 11:36 PM

मुंबई : सध्या तुरुंगात असलेला गँगस्टर लॉरेन्स बिश्नोई (Lawrence Bishnoi)ने सलमान खान (Salman Khan) आणि त्याचे वडील सलीम खान यांना पत्र धमकी (Threat)चे पत्र पाठवले होते. पत्र घराच्या जवळ टाकण्यासाठी त्याच्या टोळीतील तीन जण राजस्थानच्या जालोर येथून मुंबईत आले होते. त्यांनी आरोपी सौरभ महाकाळची भेट घेतली असल्याची माहिती मुंबई पोलीसांनी दिली. थेट सलमान खानला धमकी देण्यात आल्याने मुंबई पोलिसांना एक पद्धतीचं आवाहन होतं. परंतु पोलिसांनी या प्रकरणाचा छडा लावला आहे. सलमानचे वडिल सलीम खान नेहमीप्रमाणे 5 जून रोजी मॉर्निंग वॉकला गेले असताना त्यांना हे धमकीचं पत्र मिळालं होतं.

एएनआयने दिलेल्या माहितीनुसार, अभिनेता सलमान खान आणि त्याच्या वडिलांना धमकी देणाऱ्या पत्राचा तपास करणाऱ्या मुंबई गुन्हे शाखेच्या पथकाने गुरुवारी पुण्यात जाऊन लॉरेन्स बिश्नोई टोळीचा भाग असलेल्या सौरभ महाकाळची चौकशी केल्याचे एका पोलिस अधिकाऱ्याने सांगितले. सलमान खानच्या धमकी पत्र प्रकरणात महाकाळ आणि संतोष जाधव यांचा थेट संबंध नाही. ते या प्रकरणातील संशयित नाहीत, असे पोलीस सूत्रांकडून कळते. मात्र सलमान खानच्या धमकी पत्राबाबत महाकाळला माहिती असल्याचे प्रथमदर्शनी दिसते. तथापि, या प्रकरणात बिश्नोई टोळीचा सहभाग असल्याचे अधोरेखित केले जाऊ शकते. महाकाळकडे त्याबद्दलची माहिती असून त्याची चौकशी केली जाणार आहे. मात्र आतापर्यंतच्या तपासानुसार, महाकाळने याबद्दल काहीही उघड केलेले नाही.

सौरभ महाकाळला पुणे पोलिसांकडून मोक्का अंतर्गत अटक

पुणे ग्रामीण पोलिसांनी बुधवारी मोक्का अंतर्गत अटक केली आहे. मुसेवाला हत्या प्रकरणात फरार आरोपी संतोष जाधवला फरार असताना आसरा दिल्याने पुणे पोलिसांनी त्याला पुणे-अहमदनगर सीमेवरुन ताब्यात घेतले. त्यानंतर मोक्का न्यायालयात हजर केले असता न्यायालयाने त्याला 20 जूनपर्यंत पोलीस कोठडी सुनावली. त्यानंतर मुंबई गुन्हे शाखेच्या पथकाने गुरुवारी पुण्यात जाऊन लॉरेन्स बिश्नोई टोळीचा भाग असलेल्या महाकाळची चौकशी केली. (Gangster Lawrence Bishnoi sent threatening letter to Salman Khan)

संभाजीनगरचे जिल्हाधिकारी औरंगजेबच्या कबरीजवळ दाखल
संभाजीनगरचे जिल्हाधिकारी औरंगजेबच्या कबरीजवळ दाखल.
ते काही आक्रमक झाले नाही, भेदरले होते; ठाकरेंची एकनाथ शिंदेंवर टीका
ते काही आक्रमक झाले नाही, भेदरले होते; ठाकरेंची एकनाथ शिंदेंवर टीका.
अमरावतीत पोलीस अलर्ट मोडवर; संवेदनशील भागात बंदोबस्त वाढवला
अमरावतीत पोलीस अलर्ट मोडवर; संवेदनशील भागात बंदोबस्त वाढवला.
'...मोदींकडे मागणी करा', कबरीच्या वादावर ठाकरेंचं पहिल्यांदाच भाष्य
'...मोदींकडे मागणी करा', कबरीच्या वादावर ठाकरेंचं पहिल्यांदाच भाष्य.
डिसीपी निकेतन कदम यांनी सांगितला नागपूरचा थरार
डिसीपी निकेतन कदम यांनी सांगितला नागपूरचा थरार.
'अबू आझमी उद्धव ठाकरेंचा कोण लागतो?', भाजपच्या नेत्याचा आक्रमक सवाल
'अबू आझमी उद्धव ठाकरेंचा कोण लागतो?', भाजपच्या नेत्याचा आक्रमक सवाल.
मुख्यमंत्र्यांचा मी लाडका आहे, ते मला काय बोलतील? नितेश राणेंचं विधान
मुख्यमंत्र्यांचा मी लाडका आहे, ते मला काय बोलतील? नितेश राणेंचं विधान.
नागपुरच्या राड्यात 33 पोलिसांसह 4 DCP जखमी, हिंसेला सुरूवात कुठून ?
नागपुरच्या राड्यात 33 पोलिसांसह 4 DCP जखमी, हिंसेला सुरूवात कुठून ?.
नागपूरच्या राड्यानंतर मुख्यमंत्र्यांनी केला 'छावा' चित्रपटाचा उल्लेख
नागपूरच्या राड्यानंतर मुख्यमंत्र्यांनी केला 'छावा' चित्रपटाचा उल्लेख.
संतोष देशमुख प्रकरण; आरोपी विष्णु चाटेबद्दल मोठी अपडेट आली समोर
संतोष देशमुख प्रकरण; आरोपी विष्णु चाटेबद्दल मोठी अपडेट आली समोर.