ऑनलाईन गेमिंगच्या माध्यमातून तब्बल 400 मुलांचं धर्मांतर? धागेदोरे मुंब्र्यापर्यंत, आरोपी फरार

ऑनलाईन गेमिंगच्या माध्यमातून धर्मांतर केलं जात असल्याचा धक्कादायक प्रकार समोर आला आहे. या माध्यमातून 400 जणांचं धर्मांतर करण्यात आल्याचा संशय व्यक्त केला जातोय.

ऑनलाईन गेमिंगच्या माध्यमातून तब्बल 400 मुलांचं धर्मांतर? धागेदोरे मुंब्र्यापर्यंत, आरोपी फरार
Follow us
| Updated on: Jun 08, 2023 | 4:06 PM

ठाणे : धर्म ही अफूची गोळी आहे, असं म्हणतात. धर्मावरुन सातत्याने राजकीय आणि समाजिक वाद निर्माण करण्याचे प्रयत्न काही समाजकंटकांडून केला जातो. प्रत्येक धर्म आणि जातीचे चांगले विचार आणि संस्कार असतात. हे सर्व धर्म मानवतेचाच संदेश देतात. पण हल्ली कट्टरता इतकी वाढत चाललीय की नको त्या विकृत घटना घडायला सुरुवात झाली आहे. मुंब्र्यातून अशी एक विक्षिप्त घटना समोर आली आहे. खरंतर या घटनेची माहिती गाझियाबाद येथून समोर आलीय. या घटनेचे धागेदोरे मुंब्र्यापर्यंत असल्याची माहिती समोर आली आहे. ऑनलाईन गेमिंगच्या माध्यमातून आरोपींनी थेट गेम खेळणाऱ्या शेकडो मुलांचं धर्मांतर केल्याचा संशय पोलिसांना आहे. त्यामुळे एकच खळबळ उडाली आहे.

ऑनलाईन गेमिंगच्या माध्यमातून धर्मांतर केलं जात असल्याचा धक्कादायक प्रकार समोर आला आहे. या माध्यमातून 400 जणांचं धर्मांतर करण्यात आल्याचा संशय व्यक्त केला जातोय. संबंधित प्रकार हा गाझियाबादमध्ये उघडकीस आलाय. या प्रकरणाचे धागेदोरे हे मुंब्र्यापर्यंत असल्याची माहिती मिळत आहे. त्यामुळे गाझियाबाद पोलिसांचं एक पथक मुंब्र्यात दाखल झालंय. मुंब्र्यातील स्थानिक पोलिसांच्या मदतीने आरोपीचा शोध सुरु आहे.

गाझियाबाद पोलिसांकडून वेगाने तपास, एकाला अटक

ऑनलाईन खेळाच्या नावाखाली धर्मांतर होत असल्याची बाब गाझियाबाद पोलिसांना समजतात त्यांनी एक पथक नेमलं. या पोलिसांच्या तपासात महत्त्वाची माहिती मिळाली. विशेष म्हणजे पोलिसांनी एका आरोपीला अटक केली. त्या आरोपीच्या माहितीनुसार दुसरा आरोपी हा ठाण्यातील मुंब्रा या विभागात असल्याचा खुलासा करण्यात आला. यानंतर गाजियाबादची एक टीम मुंब्रामध्ये दाखल झाली. स्थानिक मुंब्रा पोलिसांच्या मदतीने शहानवाज नामक आरोपीचा शोध सुरु झाला. हाच शहानवाज गेल्या आठ दिवसांपासून आपल्या घरी येत नसल्याचं आजूबाजूच्या सर्वच शेजाऱ्यांनी पोलिसांना सांगितलं.

हे सुद्धा वाचा

मिळालेल्या माहितीनुसार, ऑनलाईन गेमद्वारे धर्मांतर होत असल्याची नोटीस उत्तर प्रदेशातील गाझियाबाद पोलिसांनी बजावली होती. गाझियाबाद पोलिसांना तात्काळ एक पथक तयार करून तपास सुरू केला. एका आरोपीला अटक केल्यानंतर मुब्रा भागातील एका आरोपीचा शोध गाझियाबाद पोलीस करत आहेत.

आरोपी नेमकं मुलांना कसं फसवायचा?

मुंब्रा भागातील शाहनवाज मकसूद खान याने महाराष्ट्रातील मुलांना एक फेक यूजर आयडी बनवून संबंधित कृत्य केल्याची माहिती समोर आली आहे. तो गेम हरल्यावर कुराणमधील कलमा वाचण्यास सांगत होता. कुराणमधील कलमा वाचल्याने तुम्ही कधीही गेम हरणार नाहीत, असं सांगत असल्याची माहिती समोर आली आहे.

मुंब्रा येथील देवरी पाडा येथे असलेल्या शाझिया इमारतीच्या पहिल्या मजल्यावर शाहनवाज मकसूद खान नावाचा व्यक्ती आपल्या कुटुंबासह राहत होता. गाझियाबाद पोलीस त्याच शाहनवाज मकसूद खानच्या शोधात त्याला अटक करण्यासाठी मुंब्रा येथील देवरी पाड्यावर आले. पण शाहनवाज मकसूद खान आपल्या कुटुंबासह कुठेतरी फरार झालाय. शाहनवाजच्या शेजारच्यांनी सांगितले की, तीन भाऊ आणि एक आई असं परिवार राहत होतं. शाहनवाजचा हर्बल शॅम्पू बनवण्याचा व्यवसाय करातो. गेल्या आठवड्यापासून त्याच्या घराला कुलूप आहे, अशी माहिती पोलिसांना मिळालीय.

Non Stop LIVE Update
बाप.. बाप होता है, विजयानंतर काय म्हणाले धर्मरावबाबा आत्राम
बाप.. बाप होता है, विजयानंतर काय म्हणाले धर्मरावबाबा आत्राम.
साकोलीत नाना पटोले यांचा कसाबसा निसटता विजय, पाहा काय घडले?
साकोलीत नाना पटोले यांचा कसाबसा निसटता विजय, पाहा काय घडले?.
वसईतून भाजपाच्या स्नेहा दुबे विजयी, काय म्हणाल्या...पाहा
वसईतून भाजपाच्या स्नेहा दुबे विजयी, काय म्हणाल्या...पाहा.
'या' दिग्गज नेत्यांचा दारूण पराभव, कोणाच्या जिव्हारी लागला निकाल?
'या' दिग्गज नेत्यांचा दारूण पराभव, कोणाच्या जिव्हारी लागला निकाल?.
..अन् मुसंडी, भाजप-महायुतीच्या यशाचं क्रेडिट फक्त फडणवीसांना कारण...
..अन् मुसंडी, भाजप-महायुतीच्या यशाचं क्रेडिट फक्त फडणवीसांना कारण....
माहिममध्ये अमित ठाकरे,सदा सरवणकर पराभूत; ठाकरे गटाच्या उमेदवाराची बाजी
माहिममध्ये अमित ठाकरे,सदा सरवणकर पराभूत; ठाकरे गटाच्या उमेदवाराची बाजी.
भावानं परळीचा गड राखला... धनंजय मुंडे म्हणाले, 'माझी बहीण पंकजा...'
भावानं परळीचा गड राखला... धनंजय मुंडे म्हणाले, 'माझी बहीण पंकजा...'.
महायुतीच्या विजयनानंतर एकनाथ शिंदे म्हणाले, ही तर लँडस्लाईड व्हिक्ट्री
महायुतीच्या विजयनानंतर एकनाथ शिंदे म्हणाले, ही तर लँडस्लाईड व्हिक्ट्री.
फडणवीस CM होणार? सलग तिसऱ्यांदा महाराष्ट्राच्या चाणाक्यावर मात अन्...
फडणवीस CM होणार? सलग तिसऱ्यांदा महाराष्ट्राच्या चाणाक्यावर मात अन्....
कणकवलीत भाजपचा जल्लोष, निलेश राणे म्हणाले, आता अल्लाहू अकबर नाही तर...
कणकवलीत भाजपचा जल्लोष, निलेश राणे म्हणाले, आता अल्लाहू अकबर नाही तर....