नात्याला काळिमा, रक्ताच्या नात्यांनीच उद्धवस्त केले; वाचा तरुणीसोबत नेमके काय घडले ?

तरुणीकडे याबाबत विचारणा केली असता तिने काकाने आणि आजोबाने आपले लैंगिक शोषण केल्याची धक्कादायक माहिती उघड केली.

नात्याला काळिमा, रक्ताच्या नात्यांनीच उद्धवस्त केले; वाचा तरुणीसोबत नेमके काय घडले ?
उत्तर प्रदेशात पतीला प्रेयसीसोबत रंगेहाथ पकडलेImage Credit source: TV9
Follow us
| Updated on: Sep 21, 2022 | 7:32 PM

मुंबई : नात्याला काळिमा फासणारी एक घटना मुंबईत उघडकीस आली आहे. या घटनेमुळे मुलींच्या सुरक्षेचा मोठा प्रश्न निर्माण झाला आहे. सख्या आजोबांनी आणि काकानेच मुलीवर लैंगिक अत्याचार (Sexual Assault) केल्याचे उघडकीस आले आहे. या घटनेमुळे एकच खळबळ माजली आहे. पोलिसांनी नराधम आजोबाला अटक (Arrest) केले आहे, तर काका (Uncle)चा शोध घेण्यासाठी पोलिसांचे एक पथक उत्तर प्रदेशात रवाना झाले आहे.

मूळची उत्तर प्रदेशातील रहिवासी आहे तरुणी

पीडित 20 वर्षीय तरुणी ही उत्तर प्रदेशातील रहिवासी आहे. मे महिन्यात ती मुंबईत आजोबांकडे आली होती. एका संसर्गजन्य आजाराची तपासणी करण्यासाठी ती सरकारी रुग्णालयात गेली होती. यावेळी डॉक्टरांनी तिला ती दोन महिन्यांची गर्भवती असल्याचे सांगितले.

काकाने आणि आजोबाने अत्याचार केल्याचे उघड

तरुणीच्या कुटुंबीयांनाही याबाबत माहिती देण्यात आली. यावेळी तरुणीकडे याबाबत विचारणा केली असता तिने काकाने आणि आजोबाने आपले लैंगिक शोषण केल्याची धक्कादायक माहिती उघड केली.

हे सुद्धा वाचा

तरुणीच्या 43 वर्षीय काकाने उत्तर प्रदेशातील तिच्या मूळ गावी तिच्यावर बलात्कार केल्याचे तिने उघड केले. मुंबईत तिच्या 52 वर्षीय आजोबांनीही तिच्यावर लैंगिक अत्याचार केल्याचे फिर्यादीत म्हटले आहे.

पोलिसांकडून आजोबाला अटक

पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, याप्रकरणी 18 सप्टेंबर रोजी मुंबईच्या मध्यवर्ती उपनगरातील एका पोलीस ठाण्यात भारतीय दंड संहिता (IPC) आणि लैंगिक गुन्ह्यांपासून मुलांचे संरक्षण (POCSO) कायद्याच्या तरतुदींनुसार गुन्हा नोंदवण्यात आला. त्यानंतर आजोबाला अटक करण्यात आली.

काका 12 वर्षांपासून करत होता अत्याचार

काका धमकी देत 12 वर्षांपासून तरुणीवर बलात्कार करत असल्याची माहिती तिने पोलिसांना दिली. काकाचा शोध घेण्यासाठी एक पथक उत्तर प्रदेशला पाठवण्यात आले आहे.

देवेंद्रजी पर्यटन म्हणून तरी बीडला जा, अंजली दमानिया यांचे आवाहन
देवेंद्रजी पर्यटन म्हणून तरी बीडला जा, अंजली दमानिया यांचे आवाहन.
सदावर्तेंमुळे एसटी बँकेचे वाटोळे, कर्मचाऱ्यांचे या तारखेला आंदोलन
सदावर्तेंमुळे एसटी बँकेचे वाटोळे, कर्मचाऱ्यांचे या तारखेला आंदोलन.
सोलापूरात कृषी उत्पन्न बाजार समितीत लसणाचे दर काय ? पाहा
सोलापूरात कृषी उत्पन्न बाजार समितीत लसणाचे दर काय ? पाहा.
विनोद कांबळी याच्या उपचाराची जबाबदारी आमची, काय म्हणाले परिवहनमंत्री?
विनोद कांबळी याच्या उपचाराची जबाबदारी आमची, काय म्हणाले परिवहनमंत्री?.
Beed चा खरा तपास करायचा आहे, तर या लोकांचे CDR काढा, खासदाराची मागणी
Beed चा खरा तपास करायचा आहे, तर या लोकांचे CDR काढा, खासदाराची मागणी.
मला या जिल्ह्याचं पालकमंत्री व्हायला आवडेल,काय म्हणाले देवेंद फडणवीस ?
मला या जिल्ह्याचं पालकमंत्री व्हायला आवडेल,काय म्हणाले देवेंद फडणवीस ?.
'विरोधकांनी बीडमध्ये जरुर जावे, पण...,' काय म्हणाले देवेंद्र फडणवीस
'विरोधकांनी बीडमध्ये जरुर जावे, पण...,' काय म्हणाले देवेंद्र फडणवीस.
एका कार्डवर शेतकऱ्यांची सर्व कामं; काय आहे Farmer Digital ID?
एका कार्डवर शेतकऱ्यांची सर्व कामं; काय आहे Farmer Digital ID?.
पूजा खेडकरचा जामीन अर्ज दिल्ली हायकोर्टाने फेटाळला
पूजा खेडकरचा जामीन अर्ज दिल्ली हायकोर्टाने फेटाळला.
संतोष देशमुखांना टॉर्चर करून करून मारलं - बजरंग सोनावणे
संतोष देशमुखांना टॉर्चर करून करून मारलं - बजरंग सोनावणे.