मुंबई : मुंबईतील झवेरी बाजारात मेसर्स चामुंडा बुलीयन या कंपनीवर जीएसटी विभागाने छापेमारी (Raid) केली. या छाप्यात 9 कोटी 78 लाख रुपये रोकड (Cash) आणि 13 लाख रुपये किंमतीच्या 19 लाख रुपयांच्या चांदीच्या विटा (Silver Bricks) हस्तगत करण्यात आल्या. कंपनीची वर्ष 2019-20 मध्ये उलाढाल 22.83 कोटी रुपयांवरुन वर्ष 2020-21 मध्ये 652 कोटी आणि वर्ष 2021-22 मध्ये 1764 कोटी रुपयांपर्यंत संशयास्पद वाढली. यामुळे राज्य जीएसटी विभागाच्या विश्लेषणात ही बाब लक्षात आल्यानंतर जीएसटी विभागाने या कंपनीवर छापे टाकले. या कंपनीच्या अनेक शाखांची नोंदणी आढळून आली नाही. राज्य जीएसटी विभागाने सदर जागा सिलबंद केली असून प्राप्तीकर विभागालाही या घटनेची माहिती देण्यात आली आहे. (GST department raids Mumbai Zaveri Bazaar, seizes Rs 10 crore cash, 19 kg silver bricks)
कंपनीच्या 35 चौरस मीटरच्या एका छोट्या जागेत जीएसटी विभागाला भिंतीत लपवून ठेवलेली 9 कोटी 78 लाखांची रोकड आणि 13 लाख रुपये किंमतीच्या 19 लाख किलो चांदीच्या विटा आढळून आल्या. प्राप्तिकर विभागाने सदर रक्कम आणि मालमत्तेचा स्त्रोत शोधण्यास सुरुवात केली आहे.
राज्य जीएसटी विभागाने गेल्या काही महिन्यांपासून जीएसटी चोरी शोधणे आणि कारवाईची मोहिम तीव्र केली असून हजारो कोटींची जीएसटी चोरी शोधण्यात यश मिळविले आहे. राज्य कर विभागाचे सहआयुक्त राहूल द्विवेदी, उपायुक्त विनोद देसाई यांच्या नेतृत्व आणि मार्गदर्शनाखाली ही कारवाई करण्यात आली आहे. जीएसटी चोरीविरुद्धची कारवाई या पुढच्या काळात अधिक तीव्र करण्यात येणार असल्याचे राज्य कर विभागातर्फे स्पष्ट करण्यात आले आहे. (GST department raids Mumbai Zaveri Bazaar, seizes Rs 10 crore cash, 19 kg silver bricks)
इतर बातम्या
Gunratna Sadavarte : गुन्ह्यांची यादी वाढता वाढता वाढे! सोलापुरात सदवर्तेंविरोधात आणखी एक गुन्हा