मुंबई : खारमध्ये ज्या दक्षिण कोरीयन तरुणीची छेड काढण्यात आली होती, तिने पोलिसांनी केलेल्या धडाकेबाज कामगिरीबाबत दिलासा व्यक्त केला आहे. शिवाय आपण या कामगिरीमुळे प्रभावित झाल्याचं तिने म्हटलं आहे. पोलिसांनी दक्षिण कोरीयातून आलेल्या या युट्युब तरुणीचा विनयभंग केल्याप्रकरण दोघा तरुणांना अटक केली होती. अवघ्या 12 तासांच्या आत पोलिसांनी तक्रार दाखल झाल्यानं आरोपी तरुणांना अद्दल घडवली होती. या कारवाईनंतर दक्षिण कोरीयन तरुणीने प्रतिक्रिया दिली असून तिने मुंबई पोलिसांचे आभारही मानलेत.
खारमध्ये या तरुणीसोबत जो प्रकरा घडला, त्यानंतर तिने मुंबई सोडून जाण्याचा विचार केला होता. पण मुंबई पोलिसांच्या कामगिरीवर फिदा झालेल्या या तरुणीला पुन्हा एकदा सुरक्षित वाटलं असून तिने मुंबईत आणखी काळ थांबणार असल्याचं म्हटलं आहे.
एका संकेतस्थळाशी बोलताना या युट्युबर तरुणीने म्हटलं की,
मी मागच्या तीन आठवड्यांपेक्षा जास्त काळ मुंबईत आहे. या घटनेनंतरही आता मी मुंबई व्ही-ब्लॉगिंग करण्याचं काम सुरुच ठेवणार आहे. मुंबई पोलिसांनी केलेल्या कामगिरीने मी इम्प्रेस झाले आहे. आता माझं इथलं काम पूर्ण झाल्यावरच मी परतेन.
29 नोव्हेंबर रोजी खार येथे या दक्षिण कोरीयन मुलीसोबत दोघा तरुणांनी छेड काढली होती. त्यावेळी व्हिडीओ दरम्यानच एक तरुण या तरुणीला आधा आय लव्ह यू म्हणाला आणि नंतर तिच्या संमतीशिवायच जबरदस्ती तिचं चुंबन घेण्याचा प्रयत्न करु लागला होता. या घटनेचा व्हिडीओ सोशल मीडियावर व्हायरल झाल्यानंतर खार पोलीस स्थानकात तक्रार नोंदवण्यात आली होती.
Breaking News: In a viral video, Mobeen Chand Mohammad Shaikh and Mohammad Naqeeb Sadrealam Ansari – arrested for molesting a Korean woman YouTuber during a live streaming.
Khar Police (Mumbai) registered an FIR u/s 354 IPC and arrested both of them.
+ pic.twitter.com/wSkne3GMLH— Ashwini Shrivastava (@AshwiniSahaya) December 1, 2022
खार पोलिसांनी या दोघाही तरुणांची ओळख पटवून घेत त्यांना शोधून काढलं. वांद्रे येथून या तरुणांना अटक करण्यात आली. या एका दुर्दैवी घटनेमुळे मी माझा संपूर्ण प्रवास खराब करु इच्छित नसल्यानं पीडित तरुणीने म्हटलंय. भारतात तरुणींच्या सुरक्षेबाबत पोलीस गांभीर्यानं पावलं उचलत असल्याबाबत या तरुणीने समाधान व्यक्त केलं.