कल्याण रेल्वे स्टेशनवर सराईत चोरटा गजाआड, प्रवाशांना हेरायचा, गोड बोलायचा, आणि…

कल्याण रेल्वे पोलिसांनी एका सराईत चोरट्याला अटक केली आहे. तो रेल्वे प्रवाशांना बिस्किटात गुंगीचे औषध देऊन लुटायचा. मंगळवारी एका प्रवाशाला असेच लुटण्याचा प्रयत्न करताना पोलिसांनी त्याला रंगेहाथ पकडले. आरोपी रामसुरत पाल याने आपला गुन्हा कबूल केला आहे. पोलिस आता त्याच्या अन्य गुन्ह्यांचा तपास करत आहेत.

कल्याण रेल्वे स्टेशनवर सराईत चोरटा गजाआड, प्रवाशांना हेरायचा, गोड बोलायचा, आणि...
कल्याण रेल्वे स्टेशनवर सराईत चोरटा गजाआड, प्रवाशांना हेरायचा, गोड बोलायचा, आणि...
Follow us
| Updated on: Oct 17, 2024 | 7:49 PM

कल्याण लोहमार्ग पोलिसांनी एका सराईत चोरट्याला बेड्या ठोकल्या आहेत. हा आरोपी रेल्वे प्रवाशांसोबत सलगी करून त्यांना बोलण्यात गुंतवायचा. त्यानंतर त्यांना बिस्किटमधून गुंगीचे औषध खाण्यास द्यायचां. यानंतर प्रवासी गुंगी येऊन पडला की त्याच्या जवळील किंमती ऐवज किंवा त्याच्या पिशवीतील रोख रक्कम, मोबाईल घेऊन पळून जाणाऱ्या एका सराईत चोरट्याला कल्याण लोहमार्ग पोलिसांनी बुधवारी अटक केली आहे. रामसुरत रामराज पाल (४६) असे आरोपीचे नाव आहे. तो मुळचा उत्तर प्रदेशातील आहे. तो सध्या भिवंडी येथे वास्तव्यास आहे. भिवंडीत राहून तो कल्याण ते मुंबई परिसरातील रेल्वे स्थानकांवर प्रवाशांच्या पिशव्या, मोबाईल चोरण्याचे धंदे करत होता.

पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, मंगळवारी (15 ऑक्टोबर) एक प्रवासी कल्याण रेल्वे स्थानकातील स्कायवॉकवर उभा होता. त्याला उत्तर प्रदेशात जायचे होते. त्याच्या जवळ एक ते दोन पिशव्या होत्या. तो प्रवासी उत्तर प्रदेशात जाणाऱ्या एक्सप्रेसची वाट पाहत उभा होता. आरोपी रामसुरत याने त्या प्रवाशाजवळ जाऊन तू कोठे चालला आहेस, अशी विचारणा केली. त्याने आपण उत्तर प्रदेशात चाललो आहोत, असे सांगितले. रामसुरतने मीही उत्तर प्रदेशातील असून तेथेच जाणार आहे, असे स्पष्ट केले.

बिस्किटात गुंगीचे औषध टाकून नकळत दिले आणि…

रामसुरतने त्या प्रवाशाशी मैत्री केली. त्याला भूक लागली आहे असे बोलून आरोपी रामसुरत याने स्वत:जवळील बिस्किट काढून खाण्यास सुरुवात केली. याच दरम्यान प्रवाशाची नजर चुकवून रामसुरतने प्रवाशाला द्यायच्या बिस्किटला गुंगीचे औषध लावून ते प्रवाशाला खाण्यास दिले. तेवढ्यात प्रवाशाला तात्काळ गुंगी येऊन त्याचे डोके जड झाले. त्याला उलटी, मळमळ सुरू झाली. प्रवासी बसल्या जागीच चक्कर येऊन कोसळला.

पोलिसांनी आरोपीला अटक कशी केली?

या संधीचा गैरफायदा घेत रामसुरतने प्रवाशाची पिशवी उचलून तेथून पळ काढण्याचा प्रयत्न केला. मात्र यावेळी गस्तीवरील रेल्वे पोलिसांना हा प्रकार निदर्शनास आला. त्यांनी तातडीने रामसुरतला रोखून पिशवी कोणाची आहे? अशी विचारणा केली. रामसुरतची बोबडी वळली. पोलिसांना हा प्रकार संशयास्पद वाटल्याने तातडीने रामसुरतला लोहमार्ग पोलीस ठाण्यात आणण्यात आले. त्याची कसून चौकशी करताच त्याने आपण एका प्रवाशाला बिस्किटातून गुंगीचे औषध देऊन त्याची पिशवी चोरल्याची कबुली पोलिसांना दिली. सध्या पोलिसांनी रामसुरतवर गुन्हा दाखल करत अशाप्रकारे किती चोऱ्या केल्या आहेत याचा तपास सुरू केला आहे.

Non Stop LIVE Update
ही आक्रोशाची लाट देवेंद्र फडणवीस यांचा कार्यक्रमच करणार- जरांगे पाटील
ही आक्रोशाची लाट देवेंद्र फडणवीस यांचा कार्यक्रमच करणार- जरांगे पाटील.
आम्ही गुवाहाटीला गेलो म्हणून फडणवीस सत्तेत, शहाजीबापू पाटील आक्रमक
आम्ही गुवाहाटीला गेलो म्हणून फडणवीस सत्तेत, शहाजीबापू पाटील आक्रमक.
ठाकरे त्यांच्या आजाराचा सहानुभूतीसाठी वापर करतात, कोणी केला आरोप
ठाकरे त्यांच्या आजाराचा सहानुभूतीसाठी वापर करतात, कोणी केला आरोप.
भाजपाच्या काही आमदारांना डच्चू मिळणार,तर काही नेत्यांचे पुनर्वसन?
भाजपाच्या काही आमदारांना डच्चू मिळणार,तर काही नेत्यांचे पुनर्वसन?.
IRS अधिकारी समीर वानखेडे निवडणूकीच्या रिंगणात, या पक्षाकडून उमेदवारी?
IRS अधिकारी समीर वानखेडे निवडणूकीच्या रिंगणात, या पक्षाकडून उमेदवारी?.
भाजपाच्या 110 उमेदवारांची यादी उद्या येण्याची शक्यता, कोणाला संधी?
भाजपाच्या 110 उमेदवारांची यादी उद्या येण्याची शक्यता, कोणाला संधी?.
पाडापाडी करायची की लढायचं? जरांगे यांची 20 तारखेला बैठक
पाडापाडी करायची की लढायचं? जरांगे यांची 20 तारखेला बैठक.
विरोधक-सत्ताधारी दोघेही 'मुख्यमंत्री पदा'चा चेहरा जाहीर करेनात !
विरोधक-सत्ताधारी दोघेही 'मुख्यमंत्री पदा'चा चेहरा जाहीर करेनात !.
आमदार राजेंद्र शिंगणे यांना पुतणीचाच विरोध ? सिद्धखेड राजात नेमकं काय
आमदार राजेंद्र शिंगणे यांना पुतणीचाच विरोध ? सिद्धखेड राजात नेमकं काय.
एकनाथ शिंदे यांच्या 'त्या'वक्तव्यावर अजितदादा का खुदूखुदू हसले ?
एकनाथ शिंदे यांच्या 'त्या'वक्तव्यावर अजितदादा का खुदूखुदू हसले ?.