CCTV : सिनेनिर्मात्याने केला बायकोचा जीव घेण्याचा प्रयत्न! मुंबईतील थरार कॅमेऱ्यात कैद

वाटेत आलेल्या बायकोच्या अंगावर सिनेनिर्माते कमल किशोर यांनी का घातली कार? पाहा मुंबईत नेमकं काय घडलं?

CCTV : सिनेनिर्मात्याने केला बायकोचा जीव घेण्याचा प्रयत्न! मुंबईतील थरार कॅमेऱ्यात कैद
नवरा बायकोतील वाद चव्हाट्यावरImage Credit source: TV9 Marathi
Follow us
| Updated on: Oct 27, 2022 | 10:20 AM

मुंबई : फिल्ममेकर म्हणून प्रसिद्ध असलेले कमल किशोर मिश्रा (Kamal Kishor Mishra) चर्चेत आले आहेत. त्यांनी आपल्याच बायकोच्या अंगावर कार घातली आणि तिचा जीव घेण्याचा प्रयत्न केला, असा आरोप करण्यात आलाय. धक्कादायक बाब म्हणजे या प्रकरणाचं सीसीटीव्ही फुटेजही (CCTV Video) समोर आलंय. अंधेरी येथे ही धक्कादायक घटना 19 ऑक्टोबर रोजी घडली होती. कमल किशोर मिश्रा यांच्यावर आता अंधेरी पोलिसांनी गुन्हा (Mumbai Crime News) देखील नोंदवला आहे. याप्रकरणी अधिक तपास केला जातो आहे.

कमल किशोर मिश्रा यांनी अंगावर कार घातल्यामुळे त्यांची पत्नी जखमी झाली. अंधेरी पश्चिमेच्या राहत्या इमारतीतील पार्किंगमध्ये ही थरारक घटना घडली. कमल किशोर यांच्या पत्नीने आपल्या पतीला दुसऱ्या महिलेसोबत कारमध्ये रंगेहाथ पकडलं आणि त्यानंतर त्यांनी कारमधून पळ काढण्याच्या इराद्यात असलेल्या पतीला मार्ग अडवण्याचा प्रयत्न केला.

हे सुद्धा वाचा

यावेळी कमल किशोर यांनी पत्नीचा विरोध न जुमानता तिच्या अंगावरुनच कार नेली. यात पत्नी गंभीररीत्या जखमी झाली. ही संपूर्ण घटना सीसीटीव्ही कॅमेऱ्यात कैद झाली आहे.

पाहा व्हिडीओ :

या थरारक घटनेत कमल किशोर यांच्या पत्नीच्या पायाला, डोक्याला आणि हाताला गंभीर जखम झाली आहे. सध्या त्यांच्यावर उपचार सुरु आहेत. बुधवारी हा संपूर्ण प्रकार उघडकीस आला.

कमल किशोर मिश्रा यांच्याविरोधात आता आयपीसीच्या वेगवेगळ्या कलमांतर्गत गुन्हा दाखल करण्यात आलाय. बेजबाबदारपणे वाहन चालवल्याप्रकरणी कलम 279, एखाद्याच्या जीवास धोका निर्माण केल्याच्या विरोधात कलम 337 अन्वये त्यांच्यावर अंधेरीच्या आंबोली पोलीस स्थानकात गुन्हा दाखल करण्यात आला आहे. याप्रकरणी सध्या आंबोली पोलिसांकडून अधिक तपास केला जातो आहे.

Non Stop LIVE Update
महाराष्ट्र कुणाचा? किंग कोण? एका क्लिकवर पाहा
महाराष्ट्र कुणाचा? किंग कोण? एका क्लिकवर पाहा.
निकालापूर्वीच महायुती-मविआत हालचाली, 160 च्या वर दोघांचाही दावा अन्...
निकालापूर्वीच महायुती-मविआत हालचाली, 160 च्या वर दोघांचाही दावा अन्....
'कालचा बॉम्ब आधी फुटला असता तर...', उद्धव ठाकरेंचं मोठं वक्तव्य
'कालचा बॉम्ब आधी फुटला असता तर...', उद्धव ठाकरेंचं मोठं वक्तव्य.
निकालाला काहीच तास, पवारांकडून दावा; म्हणाले, काळजी करू नका, राज्यात..
निकालाला काहीच तास, पवारांकडून दावा; म्हणाले, काळजी करू नका, राज्यात...
'...तर आव्हाडांनी दादांच्या म्हशीच्या गोठ्यावर काम कराव', कोणाच आव्हान
'...तर आव्हाडांनी दादांच्या म्हशीच्या गोठ्यावर काम कराव', कोणाच आव्हान.
बच्चू कडूंना महायुती अन मविआकडून फोन, तिसऱ्या आघाडीचा पाठिंबा कोणाला?
बच्चू कडूंना महायुती अन मविआकडून फोन, तिसऱ्या आघाडीचा पाठिंबा कोणाला?.
जयंत पाटलांच्या हाती मविआ नेत्यांच्या गाडीचं स्टेअरिंग; राऊत म्हणाले..
जयंत पाटलांच्या हाती मविआ नेत्यांच्या गाडीचं स्टेअरिंग; राऊत म्हणाले...
'मध्यरात्री EVM ठेवलेल्या स्ट्रॉग रुममध्ये भाजपच्या...', पवारांचा आरोप
'मध्यरात्री EVM ठेवलेल्या स्ट्रॉग रुममध्ये भाजपच्या...', पवारांचा आरोप.
'... तर प्रणिती शिंदे यांचे घर फोडू', कोणी भरला काँग्रेसला सज्जड दम?
'... तर प्रणिती शिंदे यांचे घर फोडू', कोणी भरला काँग्रेसला सज्जड दम?.
'एक्झिट पोलची ऐशी की तैशी, आम्ही 26 ला सरकार बनवतोय'; राऊतांचा दावा
'एक्झिट पोलची ऐशी की तैशी, आम्ही 26 ला सरकार बनवतोय'; राऊतांचा दावा.