‘मला झोपेतून का उठवलं’ म्हणत वॉर्ड बॉयची रुग्णाच्या नातेवाईकांना शिवीगाळ करत धक्काबुक्की

कल्याण डोंबिवली महानगरपालिकेच्या शास्त्रीनगर रुग्णालयात धक्कादायक प्रकार समोर आलाय. मला चांगली झोप लागलेली असताना मला तू झोपेतून का उठवलं म्हणत वॉर्ड बॉयने रुग्णाच्या नातेवाईकांना शिवीगाळ करत धक्काबुक्की केली.

'मला झोपेतून का उठवलं' म्हणत वॉर्ड बॉयची रुग्णाच्या नातेवाईकांना शिवीगाळ करत धक्काबुक्की
पहाटे उठवून झोपमोड केली म्हणत वॉर्ड बॉयची रुग्णाच्या नातेवाईकांना शिवीगाळ करत धक्काबुक्की
Follow us
| Updated on: Sep 12, 2021 | 8:10 AM

कल्याण : कल्याण डोंबिवली महानगरपालिकेच्या शास्त्रीनगर रुग्णालयात धक्कादायक प्रकार समोर आलाय. मला चांगली झोप लागलेली असताना मला तू झोपेतून का उठवलं म्हणत वॉर्ड बॉयने रुग्णाच्या नातेवाईकांना शिवीगाळ करत धक्काबुक्की केली.

नेमकी घटना काय?

केडीएमसीच्या शास्त्री नगर रुग्णालयातील एका व्हायरल व्हिडीयोमुळे रुग्णालयातील गलथान कारभार पुन्हा एकदा चव्हाट्यावर आलाय. पहाटेच्या सुमारास डोंबिवलीत राहणारे आनंद नवसागरे आपल्या वडिलांच्या छातीत दुखू लागल्याने त्यांना घेऊन शास्त्री नगर रुग्णलयात आले. मात्र शास्त्री नगर रुग्णालयातील इमरजन्सी विभागातील नर्स व वार्ड बॉय साखर झोपेत होते.

शिवीगाळ करत धक्काबुक्की

रुग्णाच्या नातेवाईकांनी वॉर्ड बॉय आणि सिस्टर यांना उठवण्याचा प्रयत्न केला. अर्धा तासाच्या खटाटोपानंतर प्रतीक नावाचा वॉर्ड बॉय जागा झाला तर नर्सने दरवाजा उघडला. त्यानंतर रुग्णावर उपचार करणं सोडून बिथरलेल्या वॉर्ड बॉयने थेट आनंद यांना शिवीगाळ करत धक्काबुक्की केली.

वॉर्डबॉय दारु पिऊन झोपल्याचा रुग्णाच्या नातेवाईकांचा आरोप

रुग्णालयातील इतर कर्मचाऱ्यांनी मध्यस्थी करुन देखील हा वॉर्ड बॉय थांबत नव्हता. वॉडबॉय दारु पिऊन इमर्जन्सी वॉडमध्ये झोपला असताना त्याला उठवल्याने त्याने शिवीगाळ व धक्काबुक्की केल्याचा आरोप रुग्णाच्या नातेवाईकाने करत बेजबाबदार व्यक्तींवर कठोर कारवाईची मागणी केली आहे.

चौकशी करुन दोषींवर कारवाई करु, रुग्णालय प्रशासनाकडून स्पष्ट

दरम्यान या घटनेबाबत शास्त्रीनगर रुग्णालयाच्या मुख्य वैद्यकीय अधिकारी सुहासिनी बेडेकर यांच्याशी संपर्क साधला असता त्यांनी याबाबत तक्रार प्राप्त झाली असून या प्रकरणाची चौकशी करून दोषींवर कारवाई करण्यात येईल असं सांगितलं.

अलिबागमध्ये रुग्णाने डॉक्टरच्या डोक्यात सलाईन स्टँड मारला

काही दिवसांपूर्वी अलिबागमध्ये रुग्णाने डॉक्टरच्या डोक्यात सलाईन स्टँड मारल्याची घटना समोर आली होती. अलिबाग जिल्हा सामान्य रुग्णालयातील आयसीयू कोव्हिड सेंटरमध्ये रुग्णाने डॉक्टरांना मारहाण केल्याचा धक्कादायक प्रकार समोर आला. रात्रपाळीच्या ड्युटीवर असणारे डॉ. स्वप्नदीप थळे यांच्या डोक्यात रुग्णाने पाठीमागून सलाईन स्टँड घातला. यामध्ये डॉ. थळे गंभीर जखमी झाले.

चार दिवसांपूर्वी कोरोनाची लागण झाल्याने तो जिल्हा सामान्य रुग्णालयातील आयसीआयू कोव्हिड सेंटरमध्ये उपचार घेत होता. डॉक्टर स्वप्नदीप थळे मंगळवारी रात्रपाळीसाठी ड्युटीवर आले होते. रात्री तीन-साडेतीन वाजण्याच्या सुमारास ते कोव्हिड सेंटरमध्ये आपले काम करत बसले होते. त्यावेळी रुग्ण पाठीमागून सलाईन लावण्याचे स्टँड हातात घेऊन आला आणि त्याने डॉक्टर स्वप्नदीप यांच्या डोक्यात स्टँड घातला.

(KDMC Shastri nagar hospital Wardboy miss behave with patient relatives )

हे ही वाचा :

अलिबागमध्ये रुग्णाने डॉक्टरच्या डोक्यात सलाईन स्टँड मारला, डॉक्टरला दृष्टीत अडथळे

सायन हॉस्पिटलमध्ये डॉक्टर-नर्सला मारहाण, रुग्णाच्या नातेवाईकांवर कारवाईसाठी डॉक्टरांचा कँडल मार्च

VIDEO: काँग्रेसच्या माजी आमदाराच्या मुलाकडून डॉक्टरवर हल्ला, मारहाण केल्याचा व्हिडीओ व्हायरल

देवेंद्रजी पर्यटन म्हणून तरी बीडला जा, अंजली दमानिया यांचे आवाहन
देवेंद्रजी पर्यटन म्हणून तरी बीडला जा, अंजली दमानिया यांचे आवाहन.
सदावर्तेंमुळे एसटी बँकेचे वाटोळे, कर्मचाऱ्यांचे या तारखेला आंदोलन
सदावर्तेंमुळे एसटी बँकेचे वाटोळे, कर्मचाऱ्यांचे या तारखेला आंदोलन.
सोलापूरात कृषी उत्पन्न बाजार समितीत लसणाचे दर काय ? पाहा
सोलापूरात कृषी उत्पन्न बाजार समितीत लसणाचे दर काय ? पाहा.
विनोद कांबळी याच्या उपचाराची जबाबदारी आमची, काय म्हणाले परिवहनमंत्री?
विनोद कांबळी याच्या उपचाराची जबाबदारी आमची, काय म्हणाले परिवहनमंत्री?.
Beed चा खरा तपास करायचा आहे, तर या लोकांचे CDR काढा, खासदाराची मागणी
Beed चा खरा तपास करायचा आहे, तर या लोकांचे CDR काढा, खासदाराची मागणी.
मला या जिल्ह्याचं पालकमंत्री व्हायला आवडेल,काय म्हणाले देवेंद फडणवीस ?
मला या जिल्ह्याचं पालकमंत्री व्हायला आवडेल,काय म्हणाले देवेंद फडणवीस ?.
'विरोधकांनी बीडमध्ये जरुर जावे, पण...,' काय म्हणाले देवेंद्र फडणवीस
'विरोधकांनी बीडमध्ये जरुर जावे, पण...,' काय म्हणाले देवेंद्र फडणवीस.
एका कार्डवर शेतकऱ्यांची सर्व कामं; काय आहे Farmer Digital ID?
एका कार्डवर शेतकऱ्यांची सर्व कामं; काय आहे Farmer Digital ID?.
पूजा खेडकरचा जामीन अर्ज दिल्ली हायकोर्टाने फेटाळला
पूजा खेडकरचा जामीन अर्ज दिल्ली हायकोर्टाने फेटाळला.
संतोष देशमुखांना टॉर्चर करून करून मारलं - बजरंग सोनावणे
संतोष देशमुखांना टॉर्चर करून करून मारलं - बजरंग सोनावणे.