Kirit Somaiya Car attack: किरीट सोमय्या हल्लाप्रकरणी सगळ्यात मोठी बातमी! Video मध्ये दिसणारी सोमय्यांची जखम कृत्रिम?
किरीट सोमय्या यांच्या हनुवाटीला झालेली जखमच कृत्रिम (Fake injury) असण्याची शंका आता घेतली जाते आहे.
मुंबई : भाजप नेते किरीट सोमय्या यांच्या गाडीवर (Kirit Somaiya Car Attack) शनिवारी खार पोलीस स्थानकाबाहेर (Khar Police Station) हल्ला झाला होता. या प्रकरणाला आता वेगळं वळण लागताना पाहायला मिळतंय. कारण किरीट सोमय्या यांच्या हनुवाटीला झालेली जखमच कृत्रिम (Fake injury) असण्याची शंका आता घेतली जाते आहे. हल्ल्यानंतर समोर आलेल्या दृश्यांमध्ये किरीट सोमय्या यांना हनुवाटीतून रक्त येत असल्याचं दिसून आलं होतं. दरम्यान, ही जखम बनावट होती कीय काय, अशी शंका पोलिसांकडून उपस्थित करण्यात आली असल्याची माहिती मिळतेय. त्या पार्श्वभूमीवर पोलिसांकडून तपास केला जाणार आहे. गृहखात्याकडून किरीट सोमय्या हल्लाप्रकरणाची सत्यता पडताळण्यासाठी परिसरातील सीसीटीव्हीही तपासले जाणार आहे, असंही सांगितलं जातंय. त्यामुळे या तपासातून आता काय नवीन खुलासा होतो, हे पाहणंही महत्त्वाचं ठरणार आहे.
कसा झाला हल्ला?
किरीट सोमय्या खार पोलीस स्थानकात शनिवारी रात्री गेले होते. तिथे त्यांनी राणा दाम्पत्याची भेट घेतली होती. ही भेट झाल्यानंतर खार पोलीस स्थानकाबाहेर तुफान राडा झाला.
खार पोलीस स्थानकाबाहेर भाजप आणि शिवसेनेचे कार्यकर्ते आमनेसामने आले होते. त्यानंतर दगडफेक आणि चप्पल किरीट सोमय्या यांच्या गाडीच्या दिशेनं भिरकावण्यात आल्या होत्या. यात किरीट सोमय्या यांच्या गाडीच्या काचेला भेदून एक दगड गाडीतून आत घुसला. यात किरीट सोमय्या जखमी झाले होते. त्यांच्या हनुवटीतून रक्त येत असल्याचंही व्हिडीओमध्ये नंतर दिसून आलं होतं.
शिवसेनेचा आरोप
दरम्यान, खार पोलीस स्थानकाबाहेरील शिवसैनिकांनी परस्परविरोधी आरोप किरीट सोमय्यांवर लावला आहे. किरीट सोमय्यांनी आपल्या अंगावर गाडी घातल्यामुळी शिवसैनिक आक्रमक झाले, असा आरोप करण्यात आला. दरम्यान, यानंतर किरीट सोमय्या यांच्या चालकाविरोधात तक्रारही देण्यात आली होती.
भाजपचं शिष्टमंडळ दिल्लीत
खोटी एफआयआर या संपूर्ण प्रकरणी दिल्याचा दावा करत किरीट सोमय्यांनी संजय पांडे यांच्यावही गंभीर आरोप केले. त्यानंतर भाजपचं शिष्टमंडळ सोमवारी सकाळीच दिल्लीत दाखल झालं. केंद्रीय गृहसचिवांची भेट घेऊन या संपूर्ण प्रकरणी विशेष पथक पाठवून चौकशी करावी, अशी मागणी भाजपकडून करण्यात आली आहे.
किरीट सोमैया मारहाण प्रकरणाचा पाठपुरावा करण्यासाठी मुंबई भाजपा चे शिष्टमंडळ दिल्ली साठी मुंबई हून रवाना, आ. मिहिर कोटेचा, आ. अमित साटम, आ. पराग शाह, आ राहुल नार्वेकर, विनोद मिश्रा आणि किरीट सोमैया.
नॉर्थ ब्लॉक दिल्ली येथे केंद्र सरकारचे गृह सचिव यांना भेटणार.@BJP4Maharashtra pic.twitter.com/Y5CkefR6iN
— Kirit Somaiya (@KiritSomaiya) April 25, 2022
पाहा व्हिडीओ : शनिवारी घडलं काय होतं?
संबंधित बातम्या :
Kirit Somaiya : माझ्यावरील हल्ल्याला पोलीस आयुक्त संजय पांडेच जबाबदार; किरीट सोमय्या यांचा थेट आरोप