Suicide | सततच्या आजारपणाचा वैताग, अंबरनाथमध्ये ज्येष्ठ नागरिकाचं टोकाचं पाऊल

| Updated on: Apr 11, 2022 | 12:12 PM

आजारपणाला वैतागून त्यांनी रविवारी रात्री कीटकनाशक प्राशन केल्याचा आरोप आहे. ही बाब लक्षात येताच त्यांच्या मुलांनी त्यांना अंबरनाथच्या छाया उपजिल्हा रुग्णालयात नेलं, मात्र त्यापूर्वीच त्यांचा मृत्यू झाला होता.

Suicide | सततच्या आजारपणाचा वैताग, अंबरनाथमध्ये ज्येष्ठ नागरिकाचं टोकाचं पाऊल
अंबरनाथमध्ये ज्येष्ठ नागरिकाची आत्महत्या
Image Credit source: टीव्ही9
Follow us on

अंबरनाथ : ज्येष्ठ नागरिकाने आत्महत्या (Suicide) केल्याची धक्कादायक घटना उघडकीस आली आहे. ठाणे जिल्ह्यातील अंबरनाथ शहरात (Ambernath Crime) हा प्रकार घडल्याची माहिती आहे. सततच्या आजारपणाला कंटाळून ज्येष्ठ नागरिकाने टोकाचं पाऊल उचलल्याचा (Senior Citizen) आरोप आहे. कीटकनाशक पिऊन वृद्धाने आपल्या आयुष्याची अखेर केल्याचं समोर आलं आहे. या प्रकरणी अंबरनाथमधील शिवाजीनगर पोलिस ठाण्यात अकस्मात मृत्यूची नोंद करण्यात आली आहे.

काय आहे प्रकरण?

ठाणे जिल्ह्यातील अंबरनाथ पूर्व भागातील शिवगंगा नगरमध्ये हा प्रकार घडला. या ठिकाणी विलास परब हे ज्येष्ठ नागरिक वास्तव्याला होते. त्यांना रक्तदाब आणि मूळव्याध यासारखे आजार जडले होते. सततच्या आजारपणामुळे ते कंटाळले होते.

आजारपणाला कंटाळून टोकाचं पाऊल

याच आजारपणाला वैतागून त्यांनी रविवारी रात्री कीटकनाशक प्राशन केल्याचा आरोप आहे. ही बाब लक्षात येताच त्यांच्या मुलांनी त्यांना अंबरनाथच्या छाया उपजिल्हा रुग्णालयात नेलं, मात्र त्यापूर्वीच त्यांचा मृत्यू झाला होता.

सततच्या आजारपणाला कंटाळून विलास परब यांनी आत्महत्येसारखं टोकाचं पाऊल उचलल्याचा दावा त्यांच्या नातेवाईकांनी पोलिसांकडे केला. या प्रकरणी अंबरनाथच्या शिवाजीनगर पोलीस ठाण्यात अकस्मात मृत्यूची नोंद करण्यात आली आहे.

संबंधित बातम्या :

Vasai | वसईतील सुरुची बाग किनारी मृतदेह सापडला, समुद्रातून वाहत आल्याचा संशय

Suicide | प्रेयसीच्या आईने खडसावलं, बदनामीच्या भीतीने 21 वर्षीय प्रियकराची आत्महत्या

Suicide | प्रियकराचा लग्नाला नकार, प्रेयसीसह सहा मैत्रिणींनी विष प्यायलं, तिघींचा मृत्यू