CCTV | धावती लोकल पकडण्याचा प्रयत्न अंगलट, महिला पोकळीत पडताना वाचली, MSF जवानामुळे जीवदान

| Updated on: Feb 15, 2022 | 7:37 AM

विरारमध्ये चालती लोकल पकडताना पाय घसरुन पडलेल्या महिला प्रवाशाचे प्राण वाचवण्यात महाराष्ट्र सुरक्षा बलाच्या जवानांना यश आले आहे. रविवारी विरार रेल्वे स्थानकातील प्लॅटफॉर्म क्रमांक 2 वर रात्री 7.45 वाजता ही घटना घडली होती.

CCTV | धावती लोकल पकडण्याचा प्रयत्न अंगलट, महिला पोकळीत पडताना वाचली, MSF जवानामुळे जीवदान
विरार लोकलमधून पडणाऱ्या महिलेचे प्राण वाचवले
Follow us on

विरार : धावती लोकल पकडण्याच्या नादात महिला पाय घसरुन पडल्याची (Mumbai Local Accident) धक्कादायक घटना उघडकीस आली आहे. मात्र सुदैवाने महाराष्ट्र सुरक्षा बल (Maharashtra Security – MSF) जवानांना महिलेचे प्राण वाचवण्यात यश आलं आहे. पश्चिम रेल्वेवरील विरार स्थानकावर (Virar Railway Station) प्लॅटफॉर्म क्रमांक 2 वर ही घटना घडली. चर्चगेटच्या दिशेने निघालेली लोकल सुटल्यानंतर महिला प्रवासी ती पकडण्याचा प्रयत्न करत होती. मात्र धावता धावता तिचा पाय घसरला आणि ती फलाट तसेच लोकलच्या मध्ये असलेल्या पोकळीत पडण्याची भीती होती. मात्र वसई लोहमार्ग पोलीस ठाण्याचे MSF जवान निलेश पाटील यांनी प्रसंगावधान राखून तिला वाचवले. रविवारी रात्री 7.45 वाजता ही घटना घडली. महिलेच्या बचावाचा सर्व थरार रेल्वे स्थानकावरील सीसीटीव्ही कॅमेऱ्यात कैद झाला आहे.

काय आहे प्रकरण?

विरारमध्ये चालती लोकल पकडताना पाय घसरुन पडलेल्या महिला प्रवाशाचे प्राण वाचवण्यात महाराष्ट्र सुरक्षा बलाच्या जवानांना यश आले आहे. रविवारी विरार रेल्वे स्थानकातील प्लॅटफॉर्म क्रमांक 2 वर रात्री 7.45 वाजता ही घटना घडली होती. महिलेला वाचवतानाची घटना रेल्वे स्थानकावरील सीसीटीव्ही कॅमेऱ्यात कैद झाली आहे.

नेमकं काय घडलं?

विरार रेल्वे स्थानकातून रविवारी रात्री 7.45 वाजताची विरार-चर्चगेट ही लोकल प्लॅटफॉर्म क्रमांक 2 वरुन सुटली होती. धावती लोकल पकडण्याचा एका महिलेने प्रयत्न केला. परंतु त्याच वेळी तिचा पाय घसरला आणि ती लोकल आणि प्लॅटफॉर्म यांच्या दरम्यान असलेल्या पोकळीत पडण्याची भीती होती.

जवानाच्या प्रसंगावधानामुळे महिलेला जीवदान

याच वेळी स्थानकावर कार्यरत असणारे वसई लोहमार्ग पोलीस ठाण्याचे MSF जवान निलेश पाटील यांनी हा प्रकार पाहिला. त्यांनी तात्काळ प्रसंगावधान राखून त्या महिलेला खेचून बाहेर काढत जीवदान दिले आहे. MSF जवानाच्या या कामगिरीमुळे त्याच्यावर अभिनंदनाचा वर्षाव होत आहे.

पाहा व्हिडीओ :

संबंधित बातम्या :

चालत्या ट्रेनमधून पळून जाणाऱ्या चोरट्याला पोलिसांनी फिल्मी स्टाईलने पकडले, थरारक घटना सीसीटीव्हीत कैद

धक्कादायक ! चालत्या लोकलमध्ये दरोडा; महिलेचा फोन आणि पर्स घेऊन आरोपी फरार

लोकलमध्ये महिला प्रवाशांचे मोबाईल चोरणारी सराईत महिला चोर जेरबंद