माजी आमदार नरेंद्र मेहतांची विमानतळावर अडवणूक, मालदीव्जला जाताना पोलिसांनी थांबवले

| Updated on: Aug 26, 2021 | 7:45 AM

नरेंद्र मेहता हे कुटुंबियांसह 25 ऑगस्ट 2021 रोजी मालदीव्जला जात होते. मात्र पूर्वी काढलेल्या लूकआऊट नोटीसमुळे त्यांना पोलिसांनी विमानतळावर अडवले होते.

माजी आमदार नरेंद्र मेहतांची विमानतळावर अडवणूक, मालदीव्जला जाताना पोलिसांनी थांबवले
Narendra Mehta
Follow us on

मीरा भाईंदर : लूकआऊट नोटीस रद्द न झाल्यामुळे भाजपचे माजी आमदार नरेंद्र मेहता (Narendra Mehta) यांना परदेशात जात असताना विमानतळावर पोलिसांकडून अडवण्यात आले होते. मेहता यांच्यावर दाखल झालेल्या गुन्ह्यात मुंबई उच्च न्यायालयाकडून अंतरिम जामीन मिळाला असल्याने अटक न करण्याचे न्यायालयाचे निर्देश आहेत. यासंबंधी कागदपत्रं दाखवल्यानंतर मेहतांना प्रवास करण्याची परवानगी देण्यात आली.

काय आहे प्रकरण?

भाजपच्या एक नगरसेविकाने माजी आमदार नरेंद्र मेहता यांच्यावर लैंगिक अत्याचाराचे आरोप केले होते. त्यानंतर बलात्कार आणि अॅट्रोसिटी कायद्याअंतर्गत दीड वर्षांपूर्वी मीरा रोड पोलीस ठाण्यात यासंबंधी गुन्हा दाखल करण्यात आला होता. हे प्रकरण सध्या न्यायालयात प्रलंबित आहे. न्यायालयाकडून त्यांना दिलासाही मिळाला आहे.

मालदीव्जला जाताना अडवणूक

नरेंद्र मेहता हे कुटुंबियांसह 25 ऑगस्ट 2021 रोजी मालदीव्जला जात होते. मात्र पूर्वी काढलेल्या लूकआऊट नोटीसमुळे त्यांना पोलिसांनी विमानतळावर अडवले होते. मात्र हायकोर्टाकडून अंतरिम जामीन मिळाल्याची कागदपत्रं दाखवल्यानंतर मेहतांना कुटुंबासह जाण्याची परवानगी देण्यात आली.

काय आहेत आरोप? 

भाजपचे माजी आमदार नरेंद्र मेहता यांनी लैंगिक अत्याचार केल्याचा आरोप मीरा-भाईंदरच्या भाजप नगरसेविकेने केला होता. मेहता यांच्यापासून माझ्या संपूर्ण कुटुंबाच्या जीवाला धोका आहे, मेहता यांनी अनेक महिलांचं शोषण केल्याचा आरोपही त्यांनी केला होता. भाजपच्या वरिष्ठ नेत्यांकडून न्याय मिळत नसल्याचे सांगत त्यांनी पोलिसात धाव घेतली होती. सोशल मीडियात एक व्हिडीओ पोस्ट करत त्यांनी आपली बाजू मांडली होती.  त्यांच्या तक्रारीनंतर नरेंद्र मेहतांविरोधात पोलिसात गुन्हा दाखल करण्यात आला होता. फेब्रुवारी 2020 मध्येच मेहतांनी भाजपच्या सर्व पदांचा राजीनामा दिला होता.

दरम्यान या संपूर्ण प्रकरणाचे पडसाद फेब्रुवारी 2020 मध्ये विधीमंडळातही उमटले होते. महिला आमदारांनी या प्रकरणात कारवाई करण्याची मागणी उचलून धरली होती. त्यावर नरेंद्र मेहतांसंदर्भातील आधीच्या तक्रारीचा तपास करण्याचे निर्देश तत्कालीन गृहमंत्री अनिल देशमुख यांनी दिले होते.

संबंधित बातम्या :

भाजप नगरसेविकेवर गुन्हा नोंदवण्याचे आदेश, नरेंद्र मेहतांना दिलासा मिळण्याची शक्यता

भाजपच्या माजी आमदारावर पक्षाच्याच नगरसेविकेकडून लैंगिक छळाचा आरोप, विधीमंडळातही जोरदार पडसाद