Salman Khan | बदनामीच्या खटल्याआडून जमिनीची लढाई, सलमान खानवर शेजाऱ्याचे दबंग आरोप सुरुच

सलमान खानतर्फे मुंबई सत्र न्यायालयात केतन कक्कड यांच्यावर बदनामीसह अनेक गंभीर आरोप करण्यात आले आहेत. मुंबई सत्र न्यायालयात मानहानीचा खटला दाखल करण्यात आला आहे.

Salman Khan | बदनामीच्या खटल्याआडून जमिनीची लढाई, सलमान खानवर शेजाऱ्याचे दबंग आरोप सुरुच
सलमान खान
Follow us
| Updated on: Feb 10, 2022 | 6:35 AM

मुंबई : बॉलिवूडचा दबंग अभिनेता सलमान खान (Salman Khan) याने पनवेल फार्महाऊसच्या (Panvel Farmhouse) शेजारी राहणाऱ्या केतन कक्कड यांच्यावर मानहानीचा दावा (Defamation Case) दाखल केला आहे. बुधवारी सत्र न्यायालयात या प्रकरणी ऑनलाईन सुनावणी झाली. यावेळी केतन कक्कड यांच्या वकील आणि वरिष्ठ कायदेतज्ज्ञ आभा सिंह यांनी कोर्टाला सांगितले की, सलमानला केतन कक्कड यांची जमीन स्वस्तात हवी होती. जमिनीसाठी ही लढाई सुरु असल्यामुळे सलमानने मानहानीचा खटला दाखल केल्याचा आरोप कक्कडच्या वकिलांतर्फे करण्यात आला. दोन शेजार्‍यांमध्ये जमिनीबाबत वाद होता, बदनामीच्या खटल्याच्या नावाखाली ही जमिनीसाठी लढाई आहे. सलमान खानने ही याचिका स्वच्छ हेतूने न्यायालयात दाखल केली नाही, त्यामुळे ही याचिका फेटाळण्यात यावी असा युक्तिवाद केतन कक्कड यांच्या वकील आभा सिंह यांनी केला. आज पुन्हा या याचिकेवर सुनावणी होणार आहे.

काय आहे प्रकरण?

सलमान खानतर्फे मुंबई सत्र न्यायालयात केतन कक्कड यांच्यावर बदनामीसह अनेक गंभीर आरोप करण्यात आले आहेत. मुंबई सत्र न्यायालयात मानहानीचा खटला दाखल करण्यात आला आहे.

केतन कक्कड यांच्या घरासमोर असलेल्या विजेच्या खांबावरुन वीज घेण्यात आली आहे, मात्र सलमान खानने हा खांब देखील तोडून टाकला आहे. तसेच सलमान खानने घराच्या समोरच मोठे गेट बसवले आहे, त्यामुळे केतन कक्कड यांना या गेटमधून प्रवास करता येत नाही, तसेच त्या ठिकाणी असलेल्या मंदिरात दर्शनाला देखील जाता येत नाही. अशा प्रकारे केतन क्ककड यांना सलमान खानकडून विनाकारण त्रास देण्यात येत आहे, असा आरोप कक्कड यांच्या वकील आभा सिंह यांनी यावेळी केला.

बदनामीचे आरोप खोटे, कक्कड यांचा दावा

सलमान खानने केतन कक्कड यांच्यावर बदनामी केल्याचे जे आरोप लावले आहेत, ते खोटे आहेत. कारण कक्कड यांनी कुठेही सलमान खानचे नाव घेतलेला नाही. त्यांनी आपलं म्हणणं मांडलं आहे, असाही दावा वकिलांनी केला. डी कंपनीसोबत संबंध असल्याचा आरोप असो, किंवा चाईल्ड ट्रॅफिकिंग किंवा इतर आरोप असो, कक्कड यांनी कुठेही सलमानचं नाव घेऊन आरोप केले नाही, असा युक्तिवादही आभा सिंग यांच्यातर्फे करण्यात आला.

संबंधित बातम्या :

“स्वत: ला समजतोस कोण, असे 100 सलमान खान गल्ली झाडायला उभे करेन”

सलमान फार्म हाऊस म्हणजे गुन्हेगारीचा अड्डा?, कलाकारांचे मृतदेह, लहान मुलांची तस्करी, भाईजानविरूद्ध आरोपांची राळ!

सलमान खान रोज रात्री 12 वाजता मला फोन करतो, मी पण त्याचा फोन घेते, लारा दत्ताचा गौप्यस्फोट

Non Stop LIVE Update
इचलकरंजीत 2019च्या सभेची पुनरावृत्ती,भर पावसात पुन्हा शरद पवारांची सभा
इचलकरंजीत 2019च्या सभेची पुनरावृत्ती,भर पावसात पुन्हा शरद पवारांची सभा.
'एकदा या गद्दाराला पाडा...', उद्धव ठाकरेंचा अब्दुल सत्तारांवर हल्लाबोल
'एकदा या गद्दाराला पाडा...', उद्धव ठाकरेंचा अब्दुल सत्तारांवर हल्लाबोल.
MNS Manifesto : ''आम्ही हे करु'','मनसे'च्या जाहीरनाम्यात कोणासाठी काय
MNS Manifesto : ''आम्ही हे करु'','मनसे'च्या जाहीरनाम्यात कोणासाठी काय.
शिवतीर्थवरील सभेच्या शर्यतीतून मनसे आऊट? 17 तारखेची सभा होणार की नाही
शिवतीर्थवरील सभेच्या शर्यतीतून मनसे आऊट? 17 तारखेची सभा होणार की नाही.
'...मुली आणणार कुठून?', मुंडेंचा शरद पवार गटाच्या उमेदवाराला खोचक सवाल
'...मुली आणणार कुठून?', मुंडेंचा शरद पवार गटाच्या उमेदवाराला खोचक सवाल.
'भाजपविरोधात मतदान करा, नाहीतर अल्लाहसोबत बेईमानी...', फडणवीस आक्रमक
'भाजपविरोधात मतदान करा, नाहीतर अल्लाहसोबत बेईमानी...', फडणवीस आक्रमक.
महायुतीचा CM पदाचा चेहरा कोण? फडणवीस स्पष्टच म्हणाले, 'मी शर्यतीत...'
महायुतीचा CM पदाचा चेहरा कोण? फडणवीस स्पष्टच म्हणाले, 'मी शर्यतीत...'.
म्हणून राष्ट्रपती राजवट लागली, पवारांचं नाव घेत फडणवीसांचा गौप्यस्फोट
म्हणून राष्ट्रपती राजवट लागली, पवारांचं नाव घेत फडणवीसांचा गौप्यस्फोट.
'मुंडे 12 वर्ष वनवासात, बऱ्याच गोष्टी इच्छेविरुद्ध...',अंधारेंचा टोला
'मुंडे 12 वर्ष वनवासात, बऱ्याच गोष्टी इच्छेविरुद्ध...',अंधारेंचा टोला.
अजितदादांची शरद पवारांकडून पुन्हा भरसभेत नक्कल अन्..., बघा व्हिडीओ
अजितदादांची शरद पवारांकडून पुन्हा भरसभेत नक्कल अन्..., बघा व्हिडीओ.