जामिनासाठी 50 लाखांची खंडणी मागत धमकी, पोलीस निरीक्षक शालिनी शर्मांसह तिघांवर गुन्हा

तक्रारदार आरोपीची बहीण शहिदा कुरेशी यांनी पोलीस ठाण्यात तसेच वरिष्ठ अधिकाऱ्याकडे यासंदर्भात फिर्याद दिली होती. पोलिसांचा हस्तक राजू सोनटक्के याने आरोपींकडे दोन लाख रुपये व्हॉट्सअॅप कॉल करून मागितल्याचा आरोप तक्रारदाराने केला होता.

जामिनासाठी 50 लाखांची खंडणी मागत धमकी, पोलीस निरीक्षक शालिनी शर्मांसह तिघांवर गुन्हा
शालिनी शर्मा
Follow us
| Updated on: Feb 04, 2022 | 2:50 PM

मुंबई : महाराष्ट्र पोलीस दलातील महिला पोलीस निरीक्षकावर (Lady Police Inspector) गुन्हा दाखल करण्यात आला आहे. शालिनी शर्मा (Shalini Shaema) यांच्यावर चेंबूर पोलीस ठाण्यात गुन्हा नोंदवण्यात आला आहे. खंडणी आणि धमकी प्रकरणी (Extortion Case) शर्मांवर गुन्हा दाखल करण्यात आला आहे. चेंबूर पोलिस ठाण्यात अटकेत असलेल्या आरोपीकडे शालिनी शर्मा यांच्यासह तिघा जणांनी खंडणी मागितल्याचा आरोप आहे. या प्रकरणी पोलिस निरीक्षक शर्मा, एक निलंबित पोलिस अधिकारी आणि अन्य एका व्यक्तीवर खंडणीचा गुन्हा दाखल करण्यात आला आहे. तक्रारदार आरोपीची बहीण शहिदा कुरेशी यांनी पोलीस ठाण्यात तसेच वरिष्ठ अधिकाऱ्याकडे यासंदर्भात फिर्याद दिली होती. पोलिसांचा हस्तक राजू सोनटक्के याने आरोपींकडे दोन लाख रुपये व्हॉट्सअॅप कॉल करून मागितल्याचा आरोप तक्रारदाराने केला होता.

काय आहे प्रकरण?

मुंबईतील चेंबूर पोलीस ठाण्यात शालिनी शर्मा एक वर्षापूर्वी वरिष्ठ पोलिस अधिकारी म्हणून कार्यरत होत्या. निलंबित पोलिस अधिकारी अनिल उर्फ भानुदास जाधव आणि त्यांचा हस्तक राजु सोनटक्के अशी इतर आरोपींची नावे आहेत. आरोपींमधील निलंबित पोलिस अधिकारी अनिल जाधव याने अन्य एका आरोपीला जमीन मिळवून देण्यासाठी तब्बल 50 लाख रुपयांची खंडणी मागितली होती. पैसे न दिल्यास इतर गुन्ह्यात अडकवण्याची धमकी दिल्याचा आरोप आहे.

पोलिसांच्या हस्तकाने दोन लाख मागितल्याचा आरोप

तक्रारदार आरोपीची बहीण शहिदा कुरेशी यांनी पोलीस ठाण्यात तसेच वरिष्ठ अधिकाऱ्याकडे यासंदर्भात फिर्याद दिली होती. पोलिसांचा हस्तक राजू सोनटक्के याने आरोपींकडे दोन लाख रुपये व्हॉट्सअॅप कॉल करून मागितल्याचा आरोप तक्रारदाराने केला होता.

यावर गुन्हे शाखेने तक्रारीची शहानिशा करुन या प्रकरणी चेंबूर पोलिस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला आहे. याबाबत आता पुढील तपास गुन्हे शाखा करत आहे.

कोण आहेत शालिनी शर्मा?

विशेष म्हणजे शालिनी शर्मा यांनी पोलीस दलात उल्लेखनीय कामगिरी केल्याबद्दल त्यांना राष्ट्रपती पुरस्काराने सन्मानित करण्यात आलं होतं. तर नागपाडा पोलीस ठाण्यात वरिष्ठ पोलीस अधिकारी नेमणुकीस असतांना शाहीन बाग आंदोलन प्रकरणी समाजवादी पक्षाचे आमदार अबू आझमी यांच्याशी खटका उडाल्यावर त्यांची अनपेक्षित बदली असुद्धा चेंबूर पोलीस ठाण्यात करण्यात आली होती.

संबंधित बातम्या :

दोघींसोबत रिलेशनशीपमध्ये, वादावादीतून एकीची समुद्रात उडी, गर्लफ्रेण्डला वाचवताना तरुणाचा बुडून मृत्यू

मित्र म्हणाला माझ्याकडे पैसे नाहीत, काकाला येऊ दे, चिडलेल्या तरुणाने जीवलगालाच संपवलं

नांदेड-हैदराबाद महामार्गावर भीषण अपघात, सोमनाथ हंटेच्या शरीराचे अक्षरश: दोन तुकडे!

कराडच्या पत्नीकडे 'ते' व्हिडीओ, सुरेश धस स्पष्ट म्हणाले; ' मी लई...'
कराडच्या पत्नीकडे 'ते' व्हिडीओ, सुरेश धस स्पष्ट म्हणाले; ' मी लई...'.
सैफवर हल्ला करणाऱ्या 'त्या' व्यक्तीचा फोटो समोर, आरोपीची ओळख पटली?
सैफवर हल्ला करणाऱ्या 'त्या' व्यक्तीचा फोटो समोर, आरोपीची ओळख पटली?.
सैफच्या हल्ल्यावर मुख्यमंत्र्यांची पहिली प्रतिक्रिया; म्हणाले...
सैफच्या हल्ल्यावर मुख्यमंत्र्यांची पहिली प्रतिक्रिया; म्हणाले....
सैफवर हल्ला करणाऱ्या 'त्या' व्यक्तीचं लोकेशन ट्रेस, मुंबईच्या या भागात
सैफवर हल्ला करणाऱ्या 'त्या' व्यक्तीचं लोकेशन ट्रेस, मुंबईच्या या भागात.
सैफचा जीव घ्यायचा होता? बॉलिवूडच्या खलनायकाकडून हल्ल्याचा निषेध
सैफचा जीव घ्यायचा होता? बॉलिवूडच्या खलनायकाकडून हल्ल्याचा निषेध.
लाडकी बहीण योजना महिलांना आमिष दाखवण्यासाठी... सरकारनं काय म्हटलं?
लाडकी बहीण योजना महिलांना आमिष दाखवण्यासाठी... सरकारनं काय म्हटलं?.
'बारामतीत दरमहिन्याला बोलवत जा कारण...', मुंडे दादांना काय म्हणाल्या?
'बारामतीत दरमहिन्याला बोलवत जा कारण...', मुंडे दादांना काय म्हणाल्या?.
ट्रेन रिकामी, सीटवर पाय; विशेष लोकलमध्ये रेल्वे कर्मचाऱ्यांची दादागिरी
ट्रेन रिकामी, सीटवर पाय; विशेष लोकलमध्ये रेल्वे कर्मचाऱ्यांची दादागिरी.
...म्हणून सैफ टार्गेटवर, शरद पवार गटाच्या बड्या नेत्याला कोणावर संशय?
...म्हणून सैफ टार्गेटवर, शरद पवार गटाच्या बड्या नेत्याला कोणावर संशय?.
सैफची प्रकृती सध्या कशी? 'लिलावती'कडून निवेदन जारी, नेमकं काय म्हटलंय?
सैफची प्रकृती सध्या कशी? 'लिलावती'कडून निवेदन जारी, नेमकं काय म्हटलंय?.