Sign In

By signing in or creating an account, you agree with Associated Broadcasting Company's Terms & Conditions and Privacy Policy.

Molestation | मुंबई लोकलमध्ये गोव्याच्या तरुणाचा महिलेला किस, सात वर्षांनी शिक्षा

लोकल रेल्वेतील सहप्रवासी महिलेच्या गालावर मुका घेणाऱ्या आरोपीला जवळपास सात वर्षांनी न्यायालयाने शिक्षा सुनावली आहे. पोलिसांनी दिलेल्या माहिती प्रमाणे आरोपीचं नाव किरण सुझा होनावर आहे. तो गोव्यातील पणजीचा रहिवासी आहे.

Molestation | मुंबई लोकलमध्ये गोव्याच्या तरुणाचा महिलेला किस, सात वर्षांनी शिक्षा
महिला पोलीस कॉन्स्टेबलला थप्पड मारणारी महिला निर्दोषमुक्तImage Credit source: टीव्ही9
Follow us
| Updated on: Mar 31, 2022 | 9:01 AM

मुंबई : मुंबई लोकल रेल्वेतील (Mumbai Local) सहप्रवासी महिलेच्या गालावर मुका (Kiss) घेणाऱ्या टवाळखोराला अखेर शिक्षा झाली आहे. आरोपीला एका वर्षाचा सश्रम कारावास आणि दहा हजार रुपयांचा आर्थिक दंड अशी शिक्षा सुनावण्यात आली आहे. 23 ऑगस्ट 2015 रोजी तक्रारदार महिला आपल्या मित्रांसोबत हार्बर मार्गावर गोवंडी ते सीएसएमटी रेल्वे स्टेशनदरम्यान प्रवास करत होती. त्यावेळी आरोपीने तिच्या उजव्या गालावर किस करुन लज्जा उत्पन्न करुन विनयभंग (Molestation) केल्याचा आरोप झाला होता. जवळपास सात वर्षांनी या प्रकरणात शिक्षा सुनावण्यात आली आहे.

लोकल रेल्वेतील सहप्रवासी महिलेच्या गालावर मुका घेणाऱ्या आरोपीला जवळपास सात वर्षांनी न्यायालयाने शिक्षा सुनावली आहे. पोलिसांनी दिलेल्या माहिती प्रमाणे आरोपीचं नाव किरण सुझा होनावर आहे. तो गोव्यातील पणजीचा रहिवासी आहे.

काय आहे प्रकरण?

या प्रकरणात जवळपास सात वर्ष न्यायालयात खटला चालला. संबंधित सर्व साक्षीदारांची तपासणी झाल्यानंतर किल्ला कोर्टाचे महानगर दंडाधिकारी व्ही. पी. केदार यांनी आरोपीला एक वर्षाचा सश्रम कारावास आणि दहा हजार रुपयांचा आर्थिक दंड अशी शिक्षा सुनावली आहे.

या खटल्यामध्ये सरकार पक्षाच्या वतीने अभियोक्ता कदौर यु. शेख होते . त्याचबरोबर या खटल्याच्या सुनावणीचा कामकाज मध्य रेल्वे पोलीस ठाण्याचे वरिष्ठ पोलीस निरीक्षक मेहबूब इनामदार यांच्या निर्देशाप्रमाणे समन्स आणि वॉरंट संदर्भातला कामकाज पोलीस अंमलदार सहाय्यक पोलीस उप-निरीक्षक पुरुषोत्तम गावडे यांनी तर कोर्ट अंमलदार पोलीस नाईक, पांडुरंग जंगम यांनी महत्त्वाची भूमिका या प्रकरणात निभावली आहे .

वरिष्ठ पोलीस निरीक्षक मेहबूब इनामदार यांनी इशारा दिला आहे की, विनयभंग करणाऱ्या कोणत्याही इसमाच्या विरोधात कायद्यानुसार कडक कारवाई केली जाणार आहे . महिलांचा सन्मान करणे हे प्रत्येक व्यक्तीचे कर्तव्य आहे. एवढंच नव्हे तर सीएसएमटी रेल्वे पोलीस ठाण्यामार्फत भविष्यात महिलांच्या विरोधात गुन्हे करणाऱ्यांवर कठोर कारवाई केली जाणार असं वरिष्ठ पोलीस निरीक्षक मेहबूब इनामदार म्हणाले.

नेमकं काय घडलं?

छत्रपति शिवाजी महाराज टर्मिनस पोलिसांच्या माहिती प्रमाणे , 23 ऑगस्ट 2015 रोजी एक महिला प्रवासी आपल्या मित्रांसोबत हार्बर मार्गावरील रेल्वेतून गोवंडी ते सीएसएमटी रेल्वे स्टेशनला प्रवास करत होती. जेव्हा लोकल ट्रेन छत्रपती शिवाजी महाराज टर्मिनसच्या प्लॅटफॉर्म क्रमांक 1 वर आली तेव्हा किरण सुझा होनावर ( 37 वर्ष ) या व्यक्तीने पीडित महिला प्रवाशाच्या उजव्या गालाचा मुका घेऊन लज्जा उत्पन्न करत विनयभंग केला होता.

या घटनेनंतर पीडित महिला प्रवाशाने सीएसएमटी रेल्वे पोलीस ठाण्यात आपल्या बरोबर झालेल्या या घटनेसंदर्भात तक्रार दाखल केली होती. रेल्वे पोलिसांनी पीडित महिलेचा जबाब घेतला आणि आरोपीच्या विरोधात भादंवि कलम 354, 354 (अ) (1) अंतर्गत गुन्हा दाखल केला होता. गुन्हा दाखल झाल्यानंतर तत्कालीन सहायक पोलीस निरीक्षक गणपत गोंदके यांनी चौकशी करत आरोपी होनावर याला अटक केली.

सखोल चौकशी करत त्यांनी अटक आरोपी विरोधात जास्तीत जास्त साक्षीदार आणि सबळ पुरावे संकलित करुन न्यायालयात दोषारोपपत्र सादर केले. जेणेकरून न्यायालयाने आरोपीला एक वर्षाचा सश्रम कारावास व दहा हजार रुपये दंड ठोठावला आहे .

संबंधित बातम्या :

लहान मुलीचा विनयभंग, शिक्षकाला बाईने दप्तराने बडवलं, गावकऱ्यांनी तुडवलं

 वसईत 10 वर्षीय मुलीचा विनयभंग, स्थानिकांकडून आरोपीची धिंड

त्याच्या जीवाला धोका तर..,कामराच्या जबाब नोंदवण्यावरुन कोर्टाचा निर्णय
त्याच्या जीवाला धोका तर..,कामराच्या जबाब नोंदवण्यावरुन कोर्टाचा निर्णय.
'..तर शिवजयंतीला देशभर सुट्टी द्या',निर्धार मेळाव्यातून ठाकरेंची मागणी
'..तर शिवजयंतीला देशभर सुट्टी द्या',निर्धार मेळाव्यातून ठाकरेंची मागणी.
'ती बाई साधी नाही...मोदींची बहीण, नाव लक्षात ठेवा...', राऊतांचा घणाघात
'ती बाई साधी नाही...मोदींची बहीण, नाव लक्षात ठेवा...', राऊतांचा घणाघात.
'...उनपर है धिक्कार', नाशिकच्या निर्धार शिबिरातून संजय राऊत म्हणाले...
'...उनपर है धिक्कार', नाशिकच्या निर्धार शिबिरातून संजय राऊत म्हणाले....
'चावलेला कुत्रा 'वाघ्या' तर..', मिटकरींची भिडेंवर नाव न घेता खोचक टीका
'चावलेला कुत्रा 'वाघ्या' तर..', मिटकरींची भिडेंवर नाव न घेता खोचक टीका.
अजितदादांनी 2024 ची निवडणूक 'गद्दार'वर लढवली...कामराच्या वकिलांचा सवाल
अजितदादांनी 2024 ची निवडणूक 'गद्दार'वर लढवली...कामराच्या वकिलांचा सवाल.
भिडेंना चावणारं कुत्रं शोधण्यासाठी यंत्रणेची अहोरात्र मेहनत
भिडेंना चावणारं कुत्रं शोधण्यासाठी यंत्रणेची अहोरात्र मेहनत.
संभाजीनगरमध्ये मध्यरात्री 2 गटात राडा
संभाजीनगरमध्ये मध्यरात्री 2 गटात राडा.
सामंत अन् भुमरेंनी घेतली जरांगेंची भेट, कारण काय? काय झाली चर्चा?
सामंत अन् भुमरेंनी घेतली जरांगेंची भेट, कारण काय? काय झाली चर्चा?.
वर्ष अखेरपर्यंत मुंबईकरांच्या सेवेत आणखी एक मेट्रो येणार
वर्ष अखेरपर्यंत मुंबईकरांच्या सेवेत आणखी एक मेट्रो येणार.