मुंबई : डॉ. बाबासाहेब आंबेडकर जयंतीच्या (Dr Babansaheb Ambedkar Jayanti) पूर्वसंध्येला मुंबई पोलिसांची (Mumbai Police) स्थानिकांसोबत बाचाबाची झाल्याचा प्रकार समोर आला आहे. काल (बुधवार 13 एप्रिल) रात्री मुंबईत ही घटना घडल्याची माहिती आहे. डिलाईल रोड, लोअर परेल परिसरात डॉ. बाबासाहेब आंबेडकर जयंती साजरी करणाऱ्या नागरिकांशी मुंबई पोलिसांची बाचाबाची झाल्याचा आरोप आहे. यावेळी ना. म. जोशी मार्ग पोलीस स्टेशनचे पोलीस शिपाई नितीन मिरकर यांनी बंदूक काढण्याचा प्रयत्न केला, असा आरोप स्थानिक रहिवाशांनी केला आहे. तरुणांना घाबरवण्यासाठी पिस्तूल काढल्याचा दावा केला जात आहे. मात्र गर्दी अंगावर येऊ लागल्याने भीतीपोटी पोलिसांनी बंदुकीचा बेल्ट उघडल्याची माहिती आहे. पिस्तूल परत खिशात ठेवताना पोलीस कॅमेरात कैद झाले असून या घटनेचा व्हिडीओ सोशल मीडियावर व्हायरल (Viral Video) झाला आहे.
डॉ. बाबासाहेब आंबेडकर जयंतीच्या आदल्या दिवशी मुंबई पोलिसांची परळमधील स्थानिक रहिवाशांसोबत बाचाबाची झाल्याची घटना उघडकीस आली आहे. बुधवार 13 एप्रिल रोजी रात्री मुंबईतील डिलाईल रोड, लोअर परेल परिसरात ही घटना घडल्याची माहिती आहे.
डॉ. बाबासाहेब आंबेडकर जयंती साजरी करणारे नागरिक आणि मुंबई पोलिसांमध्ये बाचाबाची झाल्याचा आरोप आहे. ना. म. जोशी मार्ग पोलीस स्टेशनचे पोलीस शिपाई नितीन मिरकर यांनी बंदूक काढण्याचा प्रयत्न केल्याचा आरोप यावेळी स्थानिक रहिवाशांनी केला आहे.
तरुणांना घाबरवण्यासाठी पोलिसांनी पिस्तूल काढल्याचा दावा केला जात आहे. मात्र गर्दी अंगावर येऊ लागल्याने भीतीपोटी पोलिसांनी बंदुकीचा बेल्ट उघडल्याचा प्रतिदावा केला जात आहे. पिस्तूल परत खिशात ठेवताना पोलीस स्थानिकांनी रेकॉर्ड केलेल्या व्हिडीओमध्ये कैद झाले आहेत. हा व्हिडीओ सध्या सोशल मीडियावर चांगलाच व्हायरल झाला आहे.
Mumbai Police VIDEO | लोअर परेलमध्ये मुंबई पोलिसांची स्थानिकांशी बाचाबाची, पोलिसांनी पिस्तूल काढल्याचा आरोप #Mumbai #LowerParel pic.twitter.com/AkFLVESR6r
— TV9 Marathi (@TV9Marathi) April 14, 2022
संबंधित बातम्या :
अहमदनगरमध्ये किरकोळ वादातून बंदुक रोखली, सहा जणांवर गुन्हा दाखल
लग्न मंडपात जल्लोषात गोळीबार, पोटात गोळी लागून भाजप पदाधिकाऱ्याच्या भावाचा मृत्यू
दोघा पोलिसांची थेट न्यायाधीशांना मारहाण, पिस्तुलही ताणले, भर कोर्टात हलकल्लोळ