CCTV | नाल्यातून दोन सेकंद उडालेल्या पाण्याने गूढ उकललं, मुंबईकर विवाहितेची लेकाला छातीशी कवटाळून आत्महत्या

36 वर्षीय श्रुती महाडिक आणि तिचा साडेतीन वर्षांचा मुलगा राजवीर महाडिक मुंबईतील कुर्ला भागातून बेपत्ता असल्याची नोंद होती. श्रुती ही तिचा मुलगा आणि पतीसह कुर्ला येथील नेहरु नगर भागात राहत होती.

CCTV | नाल्यातून दोन सेकंद उडालेल्या पाण्याने गूढ उकललं, मुंबईकर विवाहितेची लेकाला छातीशी कवटाळून आत्महत्या
कुर्ल्यात विवाहितेची मुलासह आत्महत्या
Follow us
| Updated on: Jan 15, 2022 | 11:27 AM

मुंबई : तीन दिवसांपूर्वी बेपत्ता झालेल्या मुंबईतील माय-लेकाचा अखेर शोध लागला, मात्र दुर्दैवाने दोघांचेही मृतदेह हाती आले आहेत. परिसरातील चिखल गाळात मायलेकराचा मृतदेह (Mother Son Dead Bodies) सापडल्याने एकच खळबळ उडाली होती. त्यानंतर, महिलेने साडेतीन वर्षांच्या मुलाला छातीशी कवटाळून इमारतीच्या पंधराव्या मजल्यावरुन खाली उडी मारल्याची धक्कादायक गोष्ट समोर आली आहे. दोघं जण चिखलगाळात पडतानाचा थरकाप उडवणारा सीसीटीव्ही व्हिडीओ (CCTV Video) समोर आला आहे. नाल्यातून दोन सेकंद उडालेल्या पाण्याने गूढ उकललं. चेंबुर भागातील लालडोंगर परिसरात अल्टा विस्टा बिल्डिंगमध्ये हा प्रकार घडला. कुर्ल्याला राहणारी विवाहिता माहेरी आली असताना ही घटना घडल्याची माहिती आहे. चुलत दीरासोबत असलेल्या संपत्तीच्या वादातून महिलेने चिमुकल्यासह आपल्या आयुष्याची अखेर केल्याचा दावा केला जात आहे. महिलेची सुसाईड नोट सापडली असून पोलीस या प्रकरणाचा अधिक तपास करत आहेत.

काय आहे प्रकरण?

36 वर्षीय श्रुती महाडिक आणि तिचा साडेतीन वर्षांचा मुलगा राजवीर महाडिक मुंबईतील कुर्ला भागातून बेपत्ता असल्याची नोंद होती. श्रुती ही तिचा मुलगा आणि पतीसह कुर्ला येथील नेहरु नगर भागात राहत होती. आता मायलेक इमारतीच्या पंधराव्या मजल्यावरुन खाली पडत असल्याचे सीसीटीव्ही फूटेज समोर आले आहे.

नेमकं काय घडलं?

बुधवारी मायलेक अचानक घरातून बेपत्ता झाले होते. याबाबत कुटुंबीयांनी पोलिसांत तक्रारही दाखल केली होती. शुक्रवारी संध्याकाळी दोघांचे मृतदेह तिचे आई वडील वास्तव्यास असलेल्या चेंबूरमधील लालडोंगर भागातील अल्टा विस्टा इमारतीच्या आवारात सापडले.

चिखल गाळात मृतदेह सापडले

दोघांचा मृतदेह परिसरातील चिखल गाळात सापडल्यामुळे एकच दहशत माजली होती. दोघांच्या मृत्यूने परिसरात हळहळ व्यक्त केली जात असून त्यांच्या आत्महत्येचं नेमकं कारण अद्याप अस्पष्ट आहे. मात्र चुलत दिरासोबत असेलल्या संपत्तीच्या वादातून तिने लेकासह टोकाचं पाऊल उचलल्याचा आरोप केला जात आहे. चुनाभट्टी पोलीस घटनास्थळी दाखल झाले असून त्यांचे मृतदेह पोस्टमार्टमसाठी रवाना करण्यात आले.

पोलिसांनी सीसीटीव्ही फूटेज ताब्यात घेत तपासाला सुरुवात केली. महिलेने लेकासह आत्महत्या केली, दोघांचा अपघात झाला, की त्यांच्यासोबत घातपात घडला, याबाबत सुरुवातीला तर्कवितर्क लावले जात होते. मात्र आता तिने आत्महत्या केल्याचं स्पष्ट झालं आहे.

पाहा व्हिडीओ :

संबंधित बातम्या :

दोन लग्नं मोडली, आता लिव्ह इन पार्टनरने घात केला, मुंबईत 29 वर्षीय महिलेची हत्या, 42 वर्षीय बॉयफ्रेण्डला अटक

ट्रीटमेंटसाठी तीन लाख खर्च करण्यावरुन वाद, मुंबईकर सूनेने सासूचा गळा आवळला

वादानंतर पोटच्या पोराचं डोकं हातोड्याने फोडलं, मुंबईत 52 वर्षीय आईला अटक

कराडच्या पत्नीकडे 'ते' व्हिडीओ, सुरेश धस स्पष्ट म्हणाले; ' मी लई...'
कराडच्या पत्नीकडे 'ते' व्हिडीओ, सुरेश धस स्पष्ट म्हणाले; ' मी लई...'.
सैफवर हल्ला करणाऱ्या 'त्या' व्यक्तीचा फोटो समोर, आरोपीची ओळख पटली?
सैफवर हल्ला करणाऱ्या 'त्या' व्यक्तीचा फोटो समोर, आरोपीची ओळख पटली?.
सैफच्या हल्ल्यावर मुख्यमंत्र्यांची पहिली प्रतिक्रिया; म्हणाले...
सैफच्या हल्ल्यावर मुख्यमंत्र्यांची पहिली प्रतिक्रिया; म्हणाले....
सैफवर हल्ला करणाऱ्या 'त्या' व्यक्तीचं लोकेशन ट्रेस, मुंबईच्या या भागात
सैफवर हल्ला करणाऱ्या 'त्या' व्यक्तीचं लोकेशन ट्रेस, मुंबईच्या या भागात.
सैफचा जीव घ्यायचा होता? बॉलिवूडच्या खलनायकाकडून हल्ल्याचा निषेध
सैफचा जीव घ्यायचा होता? बॉलिवूडच्या खलनायकाकडून हल्ल्याचा निषेध.
लाडकी बहीण योजना महिलांना आमिष दाखवण्यासाठी... सरकारनं काय म्हटलं?
लाडकी बहीण योजना महिलांना आमिष दाखवण्यासाठी... सरकारनं काय म्हटलं?.
'बारामतीत दरमहिन्याला बोलवत जा कारण...', मुंडे दादांना काय म्हणाल्या?
'बारामतीत दरमहिन्याला बोलवत जा कारण...', मुंडे दादांना काय म्हणाल्या?.
ट्रेन रिकामी, सीटवर पाय; विशेष लोकलमध्ये रेल्वे कर्मचाऱ्यांची दादागिरी
ट्रेन रिकामी, सीटवर पाय; विशेष लोकलमध्ये रेल्वे कर्मचाऱ्यांची दादागिरी.
...म्हणून सैफ टार्गेटवर, शरद पवार गटाच्या बड्या नेत्याला कोणावर संशय?
...म्हणून सैफ टार्गेटवर, शरद पवार गटाच्या बड्या नेत्याला कोणावर संशय?.
सैफची प्रकृती सध्या कशी? 'लिलावती'कडून निवेदन जारी, नेमकं काय म्हटलंय?
सैफची प्रकृती सध्या कशी? 'लिलावती'कडून निवेदन जारी, नेमकं काय म्हटलंय?.