CCTV | पिस्तुलाच्या धाकाने पाच दरोडेखोर शिरले, मुलुंडमध्ये व्यावसायिकाच्या कार्यालयात 76 लाखांची लूट
मुलुंडमधील पाच रस्ता भागात हेडनवाला इमारतीच्या तळ मजल्यावर व्ही पटेल नावाच्या कंपनीचे कार्यालय आहे. या ठिकाणी पाचही दरोडेखोर शिरले. त्यापैकी दोघा जणांकडे पिस्तुल असल्याची माहिती आहे
मुंबई : मुलुंड पोलीस स्टेशनच्या हद्दीत सशस्त्र दरोडा (Robbery) पडल्याची घटना उघडकीस आली आहे. बंदुकीच्या धाकाने 76 लाख रुपयांची चोरी झाल्याचा धक्कादायक प्रकार उघडकीस आला आहे. मुंबईतील गजबजलेल्या भागात दिवसाढवळ्या घडलेल्या दरोड्याच्या घटनेने एकच खळबळ उडाली आहे. मुलुंड (Mulund) पोलीस ठाण्यापासून अवघ्या काही अंतरावर असलेल्या पाच रस्ता भागात एका अंगडियाच्या व्यावसायिकाच्या कार्यालयात घुसून पाच दरोडेखोरांनी दरोडा टाकला होता. पिस्तुलाचा धाक दाखवून आरोपींनी तब्बल 76 लाख रुपयांची लूट केल्याचा आरोप आहे. बुधवारी दुपारच्या सुमारास ही घटना घडली आहे. दरोड्याची संपूर्ण घटना कार्यालयातील सीसीटीव्ही कॅमेरामध्ये कैद झाली असून पाचही पिस्तुलधारक त्यात दिसत आहेत. पोलिसांनी घटनास्थळी दाखल होत पुढील तपास सुरु केला आहे.
नेमकं काय घडलं?
मुलुंडमधील पाच रस्ता भागात हेडनवाला इमारतीच्या तळ मजल्यावर व्ही पटेल नावाच्या कंपनीचे कार्यालय आहे. या ठिकाणी पाचही दरोडेखोर शिरले. त्यापैकी दोघा जणांकडे पिस्तुल असल्याची माहिती आहे. ऑफिसमध्ये घुसून त्यांनी कर्मचाऱ्यांना शस्त्राचा धाक दाखवला. त्यानंतर कार्यालयातील अंदाजे 76 लाख रुपयांची रक्कम बॅगेत भरुन ते पसार झाले. आरोपी भाड्यावर कार घेऊन आले होते.
दरोडेखोर गेल्यानंतर कर्मचाऱ्यांनी या घटनेची माहिती पोलिसांना दिली. मुलुंड पोलिसांनी तात्काळ घटनास्थळी धाव घेतली. गुन्हे शाखेचे अधिकारी, अप्पर पोलीस आयुक्त संजय दराडे, पोलीस उपायुक्त प्रशांत कदम यांनी घटनास्थळाची पाहणी केली.
ऑफिसमधील सीसीटीव्ही कॅमेरामध्ये दरोड्याची संपूर्ण घटना कैद झाली असून पाचही पिस्तुलधारक त्यात दिसत आहेत. पोलिसांनी या प्रकरणाचा अधिक तपास सुरु केला आहे.
पाहा व्हिडीओ :
संबंधित बातम्या :
बंद घराचे कुलूप तोडून दरोडेखोर घुसले, समोर 23 वर्षीय तरुणी, मग… नागपुरातील हादरवणारी घटना
Noida IT Raid: माजी आयपीएसच्या बंगल्यातील तळघरात 700 लॉकर्स, 5.77 कोटींची रक्कम जप्त
कुरिअर देण्याच्या बहाण्याने रेकी, बँक अधिकाऱ्याच्या घरी सशस्त्र दरोडा, उच्चशिक्षित चोरटे जेरबंद