खासगी बंदुकीची परवानगी द्या, परमबीर सिंग यांची तक्रार करणाऱ्या PI अनुप डांगेंची मागणी

अनुप डांगे सध्या पोलीस कंट्रोल रुमला तैनात आहेत त्यांच्याकडे सर्व्हिस रिव्हॉल्व्हर आहे, मात्र ते पोलीस आयुक्तांच्या सूचनेप्रमाणेच वापरता येऊ शकतं. काही कामानिमित्त बाहेर गेल्यास ते सोबत नेता येत नाही

खासगी बंदुकीची परवानगी द्या, परमबीर सिंग यांची तक्रार करणाऱ्या PI अनुप डांगेंची मागणी
माजी पोलीस आयुक्त परमबीर सिंग यांना सोमवारी हजर राहण्याचे चांदिवाल आयोगाचे आदेश
Follow us
| Updated on: Sep 02, 2021 | 8:39 AM

मुंबई : मुंबईचे माजी पोलीस आयुक्त परमबीर सिंग (Parambir Singh) यांच्या विरोधात तक्रार करणाऱ्या पोलिसाने खासगी बंदूक ठेवण्यासाठी परवानगी मागितली आहे. परमबीर सिंग यांच्यावर भ्रष्टाचाराचा आरोप करणारे पोलीस निरीक्षक अनुप डांगे (Anup Dange) यांनी खासगी पिस्तुल वापरण्याची अनुमती देण्याची विनंती केली आहे.

काय आहे प्रकरण?

अनुप डांगे यांनी तक्रार केली होती की, परमबीर सिंह यांच्या विरोधातील खटल्यातील साक्षीदारांना धमकावले जात आहे आणि त्यांच्या हालचालींचा मागोवा घेतला जात आहे. अनुप डांगे यांच्या तक्रारीवरुन एसीबीकडून खुली चौकशी सुरू आहे. डांगे यांनी परमबीर सिंग यांच्यावर भ्रष्टाचाराचा आरोप केला होता. गावदेवी पोलीस ठाण्यात असताना डांगे यांना जाणूनबुजून निलंबित करण्यात आल्याचं डांगे यांनी म्हटलं होतं.

बाहेर गेल्यानंतर जीवाला धोका

अनुप डांगे सध्या पोलीस कंट्रोल रुमला तैनात आहेत त्यांच्याकडे सर्व्हिस रिव्हॉल्व्हर आहे, मात्र ते पोलीस आयुक्तांच्या सूचनेप्रमाणेच वापरता येऊ शकतं. काही कामानिमित्त बाहेर गेल्यास ते सोबत नेता येत नाही. बाहेर गेल्यानंतर जीवाला धोका आहे यासाठी खाजगी पिस्तुल वापरण्याची अनुमती देण्याची विनंती डांगे यांनी केली आहे.

अनुप डांगे यांचे आरोप काय?

गावदेवी पोलिस स्टेशनमध्ये कार्यरत असताना अनुप डांगे यांनी काही काळापूर्वी मुख्यमंत्री उद्धव ठाकरे आणि गृहमंत्री यांना एक पत्र लिहून परमबीर सिंग यांच्यावर अंडरवर्ल्डशी मैत्री आणि भ्रष्टाचाराचा आरोप केला होता. अनुप डांगे यांच्या म्हणण्यानुसार, 2019 मध्ये एका पबवर छापा टाकताना पबचे मालक जीतू निवलानी यांनी परमबीरसिंग यांच्याशी संबंध असल्याची धमकी दिली होती.

विरोधात पुरेसे पुरावे नसले तरी केस तयार केली म्हणून संबंधित व्यावसायिकाविरुद्ध खटला भरण्यासाठी विभागीय कार्यवाही करत असताना आपल्याला निलंबित करण्यात आले होते, असा दावा अनुप डांगे यांनी केला. अनुप डांगे यांच्या दाव्यानुसार त्यांना पब मालकाच्या सांगण्यावरुन परमबीर सिंग यांनीच अडकवलं होतं.

परमबीर यांच्या निकटवर्तीयाकडून दोन कोटींची मागणी

परमबीर सिंग हे अंडरवर्ल्डमधील काही गुंडांच्या सेटिंगचं काम पाहत असत. क्राईम ब्रांचमार्फत ते डील करत होते, असा आरोप अनुप डांगे यांनी केला होता. परमबीर सिंग यांच्या जवळच्या एका व्यक्तीने त्यांना पुन्हा नोकरीवर रुजू करण्यासाठी 2 कोटींची मागणी केल्याचाही दावा डांगेंनी केला होता.

संबंधित बातम्या :

बुकी सोनू जालान ते पीआय डांगे, परमबीर सिंग यांच्यावरील तीन आरोपांची गोपनीय चौकशी

परमबीर सिंग यांचे अंडरवर्ल्डशी संबंध? पोलीस निरीक्षक अनुप डांगेंच्या आरोपांचीही चौकशी होणार

18 दिवसांनंतरही आरोपींना अटक नाही, पोलीस करतायत तरी काय ?
18 दिवसांनंतरही आरोपींना अटक नाही, पोलीस करतायत तरी काय ?.
आणखी एका सरपंचावर जीवघेणा हल्ला, तुळजापुरात बीडची पुनरावृत्ती
आणखी एका सरपंचावर जीवघेणा हल्ला, तुळजापुरात बीडची पुनरावृत्ती.
माझा संतोष देशमुख होण्याची वाट बघताय का ? कोणी केला सवाल
माझा संतोष देशमुख होण्याची वाट बघताय का ? कोणी केला सवाल.
अभिनेते अनुपम खेर यांची माजी पंतप्रधान मनमोहन सिंग यांना श्रद्धांजली
अभिनेते अनुपम खेर यांची माजी पंतप्रधान मनमोहन सिंग यांना श्रद्धांजली.
बीड प्रकरणात आरोपीला वाचवण्यात गृहमंत्र्यांचा हात - संजय राऊतांचा आरोप
बीड प्रकरणात आरोपीला वाचवण्यात गृहमंत्र्यांचा हात - संजय राऊतांचा आरोप.
माजी पंतप्रधान डॉ. मनमोहन सिंह यांचं निधन, देशात 7 दिवसांचा दुखवटा
माजी पंतप्रधान डॉ. मनमोहन सिंह यांचं निधन, देशात 7 दिवसांचा दुखवटा.
डॉ. मनमोहन सिंह यांचं निधन, शरद पवार यांनी वाहिली श्रद्धांजली
डॉ. मनमोहन सिंह यांचं निधन, शरद पवार यांनी वाहिली श्रद्धांजली.
देशाच्या अर्थव्यवस्थेला बळकट करणारं नेतृत्व
देशाच्या अर्थव्यवस्थेला बळकट करणारं नेतृत्व.
महाराष्ट्रातल्या सर्व शस्र परवान्यांची चौकशी लावा - अंजली दमानिया
महाराष्ट्रातल्या सर्व शस्र परवान्यांची चौकशी लावा - अंजली दमानिया.
99 अपराध यांनी पचवले, संतोष देशमुख 100 वा होता, काय म्हणाले सुरेश धस?
99 अपराध यांनी पचवले, संतोष देशमुख 100 वा होता, काय म्हणाले सुरेश धस?.