मुंबई : मुंबईत हिट अँड रनची (Hit and Run) आणखी एक भयावह घटना समोर आली आहे. एसयूव्ही चालवणाऱ्या अल्पवयीन मुलाने 29 वर्षीय दुचाकीस्वाराला धडक दिली. त्यानंतर बाईकसह तरुण जवळपास 200 मीटर अंतरापर्यंत फरफटत गेला. या अपघातात बाईकस्वार सेल्समनचा मृत्यू झाला. 14 फेब्रुवारी रोजी मुंबईतील घाटकोपर पूर्व (Ghatkopar Mumbai) भागात ही घटना घडली. घटनेच्या वेळी कार चालवणाऱ्या 17 वर्षीय मुलाला पोलिसांनी ताब्यात घेतले आहे, तर त्याच्या वडिलांनाही अटक करण्यात आली आहे. आसिफ शेख असे मयत सेल्समनचे नाव आहे. तो आपल्या बाईकने जात असताना लक्ष्मीनगर सिग्नलजवळ कारने त्याला धडक दिल्याचा (Car Accident) आरोप आहे. घटनेनंतर कोणतीही वैद्यकीय मदत न देता चालकाने पोबारा केला. या घटनेचा अंगावर काटे आणणारा व्हिडीओ समोर आला आहे.
या प्रकरणी पंतनगर पोलिसांनी अल्पवयीन चालक आणि त्याचे वडील अशा दोघा जणांना आरोपीच्या पिंजऱ्यात उभे केले आहे. निष्काळजीपणा आणि बेदरकारपणे गाडी चालवल्यामुळे मृत्यूस जबाबदार ठरल्याबद्दल त्यांच्यावर भारतीय दंड संहिता आणि मोटार वाहन कायद्याच्या संबंधित कलमांखाली गुन्हा दाखल करण्यात आला आहे. फ्री प्रेस जर्नलच्या वेबसाईटवर यांसदर्भात वृत्त देण्यात आले आहे.
पोलीस सूत्रांनी दिलेल्या माहितीनुसार, घाटकोपर (पू) येथील गौतम नगर येथे राहणारा आसिफ शेख कामावर जात असताना 14 फेब्रुवारी रोजी दुपारी 3.30 वाजताच्या सुमारास ही घटना घडली. रशिका बारसमोरील लक्ष्मी नगर सिग्नलजवळ तो पोहोचले असता, अल्पवयीन तरुण चालवत असलेल्या एसयूव्हीने त्याच्या दुचाकीला पाठीमागून धडक दिली. त्यानंतर शेखला किमान 200 मीटरपर्यंत चाकाखाली खेचत नेले. कारच्या धडकेत त्याच्या बाईकचा चक्काचूर झाला.
अपघाताच्या वेळी कारमध्ये एकटाच असलेला अल्पवयीन मुलगा घटनास्थळावरुन लगेच पळून गेला. स्थानिकांनी शेखला तात्काळ राजावाडी रुग्णालयात नेले, तिथे त्याला मृत घोषित करण्यात आले. त्यानंतर कार चालकावर निष्काळजीपणा आणि रॅश ड्रायव्हिंगमुळे मृत्यू झाल्याचा गुन्हा दाखल करून तपास सुरू करण्यात आला. अल्पवयीन मुलगा डोंबिवलीचा रहिवासी असल्याची माहिती आहे.
CCTV | कारने धडक देत 200 मीटरपर्यंत फरफटत नेलं, 29 वर्षीय बाईकस्वाराचा मृत्यू, अल्पवयीन कार चालक ताब्यात, मुंबईत हिट अँड रन #Mumbai | #Accident | #Car | #HitandRun | #Ghatkopar | #CCTV pic.twitter.com/M6JXFQrcZC
— TV9 Marathi (@TV9Marathi) February 17, 2022
संबंधित बातम्या :
CCTV | भरधाव रिक्षा अचानक रस्त्यात घसरली, सात वर्षांच्या चिमुकलीसह चौघं जखमी
कंटेनर गेटला घासत नाही ना? ड्रायव्हर उतरताच गाडी अचानक पुढे, गेटमध्ये अडकून जागीच मृत्यू