नवी मुंबई : पेट्रोल पंपावर आलेल्या व्यक्तीवर दोघा जणांनी जीवघेणा हल्ला (Attack) केल्याची धक्कादायक घटना समोर आली आहे. नवी मुंबईतील पनवेल शहरातील (Panvel Crime News) सिकापुर पेट्रोल पंपावर हा प्रकार घडला. या प्रकरणी खांदेश्वर पोलीस ठाण्यात तक्रार दाखल करण्यात आली आहे. टीव्ही घेण्यावरुन झालेल्या वादावादीतून हा हल्ला झाल्याचा संशय आहे. काठ्या आणि लाथा बुक्क्यांनी पीडिताला जबर मारहाण केल्याचं समोर आलं आहे. पीडित व्यक्तीला पनवेलच्या गांधी रुग्णालयात दाखल केले आहे. त्यांच्या डोक्याला गंभीर दुखापत झाली असून उपचार सुरु असल्याची माहिती आहे. ही संपूर्ण घटना पेट्रोल पंपावरील सीसीटीव्ही कॅमेऱ्यात कैद झाली आहे.
पनवेल जवळील सुकापूरमध्ये पेट्रोल पंपावर दोन तरुणांनी एकाला केली जीवघेणी मारहाण
मारहाणीची घटना CCTV कॅमेरात कैद#Panvel #Petrolpump #Freestyle #Fight #CCTV pic.twitter.com/znlrYQZOYd हे सुद्धा वाचा— TV9 Marathi (@TV9Marathi) May 7, 2022
पेट्रोल पंपावर दोघा जणांनी एकावर प्राणघातक हल्ला केल्याची भीषण घटना उघडकीस आली आहे. नवी मुंबईतील पनवेल शहरातील सिकापूर पेट्रोल पंपावर हा प्रकार घडला. पोलीस या प्रकरणी पुढील तपास करत आहेत.
ह्या तिन्ही व्यक्ती पेट्रोल पंपावर पोहचण्या अगोदर टीव्ही घेण्यावरुन त्यांच्यात वाद झाल्याची माहिती आहे. दोघे आरोपी आणि पीडित व्यक्ती हे पेट्रोल पंपावर एकत्र आले, त्यानंतर काठ्या आणि लाथा बुक्क्यांनी दोघांनी पीडिताला जबर मारहाण केल्याचा आरोप आहे.
पीडित व्यक्तीला पनवेलच्या गांधी रुग्णालयात दाखल केले असून, त्यांच्या डोक्याला गंभीर दुखापत झाली असून उपचार सुरू आहेत. याबाबत खांदेश्वर पोलीस अधिक तपास करत आहेत. ही संपूर्ण घटना सीसीटीव्ही कॅमेऱ्यात कैद झाली आहे.