ट्रेनमधून प्रवाशाने पाहिलं, वाशीच्या खाडी तरंगणारा मृतदेह, आत्महत्या की घातपात?
नवी मुंबईत मध्यमवयीन व्यक्तीचा मृतदेह आढळला आहे. वाशी खाडीत ही डेड बॉडी तरंगताना आढळली. पोलिसांनी स्थानिक मच्छिमारांच्या मदतीने मृतदेह बाहेर काढला.
नवी मुंबई : नवी मुंबईत (Navi Mumbai Crime News) 55 वर्षीय व्यक्तीचा मृतदेह आढळल्याने एकच खळबळ उडाली आहे. वाशी खाडीत (Vashi Creek) ही डेड बॉडी मिळाली असून पोलिसांनी स्थानिक मच्छिमारांच्या मदतीने ती (Dead Body) बाहेर काढली आहे. मयत व्यक्तीच्या पँटच्या खिशात काही कागदपत्रं सापडली आहेत. त्यानुसार त्याचे नाव प्रशांत विचारे असे असल्याचे दिसून येत आहे. मात्र त्याने आत्महत्या केली, तो अपघाताने वाशी खाडीत पडला, की त्याची हत्या करण्यात आली, याचा शोध पोलीस करत आहेत.
मागील काही दिवसापूर्वी तीन लोक बेपत्ता असल्याची नोंद वाशी पोलीस स्टेशनमध्ये झाल्याचीही माहिती पोलिसांनी दिली आहे. त्यातीलच ही व्यक्ती आहे का हे ही तपासून बघितले जाणार असल्याचे पोलिसांनी सांगितले.
काय आहे प्रकरण?
नवी मुंबईत मध्यमवयीन व्यक्तीचा मृतदेह आढळला आहे. वाशी खाडीत ही डेड बॉडी तरंगताना आढळली. पोलिसांनी स्थानिक मच्छिमारांच्या मदतीने मृतदेह बाहेर काढला.
खिशातील कागदपत्रांवरुन ओळख
मयत व्यक्तीच्या पँटच्या खिशात पॅनकार्ड, डेबिट कार्ड यासारखी काही कागदपत्रं सापडली आहेत. त्यावर प्रशांत विचारे अशा नावाचा उल्लेख आहे. तर त्याचे वय 55 वर्ष असलयाचे समजते.
रेल्वेतील प्रवाशाने मृतदेह पाहिला
खाडीवरून रेल्वेचे पूल जवळ असल्याने ट्रेनमधून प्रवास करताना एका प्रवाश्याला ही व्यक्ती पाण्यावर तरंगत असल्याचे दिसले. त्याने पोलीस हेल्पलाईन नंबर वर फोन करून सदर प्रकरणाची माहिती दिली.
पोलिसांनी लगेच स्थानिक मच्छीमारांना घेऊन या व्यक्तीला रस्सीच्या सहाय्याने बाहेर काढले. मृतदेह वाशी येथील नवी मुंबई महानगर पालिकेच्या रुग्णालयात घेऊन गेले आहेत.
आत्महत्या, अपघात की घातपात?
दरम्यान, संबंधित व्यक्तीने आत्महत्या केली, तो अपघाताने वाशी खाडीत पडला, की त्याची हत्या करण्यात आली, हे अद्याप स्पष्ट झालेले नाही. याचा शोध पोलीस घेत आहेत