Sign In

By signing in or creating an account, you agree with Associated Broadcasting Company's Terms & Conditions and Privacy Policy.

अंतर ठेवून बसा, कोर्टात सचिन वाझे-सुनील मानेचा बोलण्याचा प्रयत्न, न्यायाधीशांनी फटकारलं

सचिन वाझे आणि सुनील माने या दोघांना न्यायाधीशांनी आरोपींच्या बसण्याच्या जागेवर पाठवलं. त्यावेळी दोघेही एकमेकांच्या जवळ बसून बोलण्याचा प्रयत्न करत होते. त्यावेळी दोघांना फटकारत अंतर ठेवण्यास सांगितले

अंतर ठेवून बसा, कोर्टात सचिन वाझे-सुनील मानेचा बोलण्याचा प्रयत्न, न्यायाधीशांनी फटकारलं
Sunil Mane, Sachin Vaze
Follow us
| Updated on: Aug 30, 2021 | 2:37 PM

मुंबई : निलंबित पोलीस निरीक्षक सचिन वाझेच्या (Sachin Vaze) वकिलांनी वाझेला कोकीलाबेन, सुराना किंवा सैफी रुग्णालयात शस्त्रक्रिया करण्यास परवानगी देण्याची विनंती केली. त्यानुसार त्याला सुराना हॉस्पिटलमध्ये उपचारांची परवानगी मिळाली आहे. तर वाझेला निलंबित पोलीस निरीक्षक सुनील मानेशी (Sunil Mane) बोलत असताना न्यायाधीशांनी फटकारलं. उद्योगपती मुकेश अंबानी यांचे निवासस्थान अँटिलियाबाहेर सापडलेले स्फोटक प्रकरण (Mukesh Ambani Antilia Bomb Scare) आणि मनसुख हिरेन हत्या (Mansukh Hiren) प्रकरणाची एनआयए चौकशी करत आहे.

एकमेकांशी बोलताना न्यायाधीशांनी फटकारलं

सचिन वाझे आणि सुनील माने या दोघांना न्यायाधीशांनी आरोपींच्या बसण्याच्या जागेवर पाठवलं. त्यावेळी दोघेही एकमेकांच्या जवळ बसून बोलण्याचा प्रयत्न करत होते. त्यावेळी दोघांना फटकारत अंतर ठेवण्यास सांगितले.

सचिन वाझे आणि सुनील माने या दोघांना ईडी कस्टडी देण्यास सत्र न्यायालयाने नकार दिला. दोघांना न्यायलयीन कोठडी असली तरी वाझेला खाजगी सुराणा रुग्णालय या खासगी हॉस्पिटलमध्ये उपचारांची परवानगी देण्यात आली आहे. 15 दिवसात उपचाराबाबत कागदपत्रे न्यायलयात सादर करण्यास सांगितले आहे

वाझे-मानेच्या NIA कोठडीची मागणी

एनआयनेने कोर्टाकडे सचिन वाझेची दोन दिवसांची, तर सुनील मानेच्या चार दिवसांच्या कस्टडीची मागणी केली आहे. या गुन्ह्यात 30 दिवस कस्टडी मिळते. त्यानुसार सचिन वाझेची 28 दिवस कस्टडी झालेली असून 2 दिवस कस्टडी बाकी आहे. तर सुनिल मानेची 14 दिवस कस्टडी झालेली आहे. त्यामुळे मानेची 4 दिवस कस्टडी मागण्यात आली आहे.

एनआयए कोठडीची मागणी का?

दोघांना न्यायालयीन कोठडीत पाठवल्यानंतर तपासा दरम्यान काही महत्वाचे पुरावे NIA च्या हाती लागलेले आहे. हे पुरावे एका संशयित आरोपीचे आहेत. त्या अनुषंगाने तपास करणे गरजेचे आहे. त्यानुसार दोघांची कस्टडी मिळणे गरजेचे आहे. आरोपींकडे मोठ्या प्रमाणात रोख रक्कम सापडली होती. पैशांचे व्यवहारही मोठ्या प्रमाणात झालेले आहेत. त्यानुसार दोघांकडे चौकशी करायची असल्याचा युक्तिवाद एनआयएकडून करण्यात आला. मनसुख हिरेनच्या हत्येमध्येही त्या संशयित आरोपींचा सहभाग असल्याचे पुरावे हाती लागले आहे. त्यामुळे दोघांच्या कस्टडीची मागणी एनआयएकडून मागण्यात आली आहे.

ओपन हार्ट सर्जरी करण्याची गरज

दरम्यान सचिन वाझेची ओपन हार्ट सर्जरी करण्याची गरज आहे, असा रिपोर्ट जेजे रुग्णालयातर्फे देण्यात आला आहे. वाझेच्या वकिलांनी याआधी न्यायालयाला सांगितले होते की, मागील 14 दिवसांपासून त्याला जेजे हॉस्पिटलमध्ये उपचारासाठी दाखवले जात आहे. तिथे त्याला ओपन हार्ट सर्जरी करण्याचे ओपिनियन मिळाले आहे. सचिन वाझे प्रकरणात लवकरच चार्जशीटही दाखल केली जाणार आहे.

संबंधित बातम्या :

NIA कडून सचिन वाझे-सुनील मानेच्या कोठडीची मागणी, वाझेचे वकील म्हणतात ओपन हार्ट सर्जरीची गरज

कुटुंबाला भेटण्यासह सचिन वाझेच्या तीन मागण्या, NIA च्या विशेष न्यायाधीशांचा निर्णय काय?

संभाजीनगरमध्ये मध्यरात्री 2 गटात राडा
संभाजीनगरमध्ये मध्यरात्री 2 गटात राडा.
सामंत अन् भुमरेंनी घेतली जरांगेंची भेट, कारण काय? काय झाली चर्चा?
सामंत अन् भुमरेंनी घेतली जरांगेंची भेट, कारण काय? काय झाली चर्चा?.
वर्ष अखेरपर्यंत मुंबईकरांच्या सेवेत आणखी एक मेट्रो येणार
वर्ष अखेरपर्यंत मुंबईकरांच्या सेवेत आणखी एक मेट्रो येणार.
ईडी कार्यालयाबाहेर कॉंग्रेसचं आंदोलन; खासदार वर्षा गायकवाड जखमी
ईडी कार्यालयाबाहेर कॉंग्रेसचं आंदोलन; खासदार वर्षा गायकवाड जखमी.
ATM: प्रवास करताना पैसे संपले तरी आता धावत्या रेल्वेत पैसे काढता येणार
ATM: प्रवास करताना पैसे संपले तरी आता धावत्या रेल्वेत पैसे काढता येणार.
वाघ्याच्या वादात पडळकरांची उडी, पवारांवर टीकास्त्र तर उदयनराजेंबद्दल..
वाघ्याच्या वादात पडळकरांची उडी, पवारांवर टीकास्त्र तर उदयनराजेंबद्दल...
'दारात आलेल्या कुत्र्याला..', भिडेंच्या आडून राजू पाटलांचा टोला कोणाला
'दारात आलेल्या कुत्र्याला..', भिडेंच्या आडून राजू पाटलांचा टोला कोणाला.
निर्धार नाही, पक्ष बचाव मेळावा आहे; संजय शिरसाट यांची टीका
निर्धार नाही, पक्ष बचाव मेळावा आहे; संजय शिरसाट यांची टीका.
अमरावतीचं माझ्यावर कर्ज,फडणवीस विमानतळाच्या लोकार्पणानंतर काय म्हणाले?
अमरावतीचं माझ्यावर कर्ज,फडणवीस विमानतळाच्या लोकार्पणानंतर काय म्हणाले?.
मुलुंडमध्ये मनसे कार्यकर्त्यांनी शिक्षकाच्या अंगावर फेकला कोळसा
मुलुंडमध्ये मनसे कार्यकर्त्यांनी शिक्षकाच्या अंगावर फेकला कोळसा.