Ambernath | आईला मारहाण करणाऱ्या दारुड्या बापावर पोरांचा संताप, एकदाची अद्दल घडवली

अंबरनाथ तालुक्यातील भाल गावात नरेंद्र सिंग हा पत्नी किरणदेवी आणि मुलांसह राहतो. नरेंद्र हा सतत दारु पिऊन पत्नीला मारहाण करत असे. हा प्रकार मुलांना सहन होत नव्हता.

Ambernath | आईला मारहाण करणाऱ्या दारुड्या बापावर पोरांचा संताप, एकदाची अद्दल घडवली
अंबरनाथमध्ये मुलांनी बापाच्या डोक्यात दगड घातलाImage Credit source: टीव्ही9
Follow us
| Updated on: Apr 04, 2022 | 10:56 AM

अंबरनाथ : मुलांनी वडिलांवर जीवघेणा हल्ला (Attack) केल्याचा धक्कादायक प्रकार समोर आला आहे. ठाणे जिल्ह्यातील अंबरनाथमध्ये ही घटना (Ambernath Crime) घडली. आईला मारतो म्हणून मुलांनी बापाला जीवे मारण्याचा प्रयत्न केल्याचा आरोप आहे. मुलांनी बापाच्या डोक्यात दगड घातला होता. यानंतर गंभीर जखमी झालेल्या बापाला उपचारांसाठी मुंबईला हलवण्यात आलं आहे. अंबरनाथ तालुक्यातील भाल गावात हा प्रकार घडला आहे. रविवारी पिता नरेंद्र सिंगने पत्नीला जीवघेणी मारहाण करत जखमी केलं. त्यामुळे त्याच्या मुलांनी थेट नरेंद्रच्या डोक्यात दगड घातला आणि त्याला भाल रोडवर तडफडत टाकून दिलं. जखमी बापावर मुंबईतील रुग्णालयात उपचार सुरु आहेत. पोलीस या प्रकरणी अधिक तपास करत आहेत.

काय आहे प्रकरण?

अंबरनाथ तालुक्यातील भाल गावात नरेंद्र सिंग हा पत्नी किरणदेवी आणि मुलांसह राहतो. नरेंद्र हा सतत दारु पिऊन पत्नीला मारहाण करत असे. हा प्रकार मुलांना सहन होत नव्हता.

आईला मारहाण केल्याने पोरांचा संताप

त्यातच रविवारी पुन्हा नरेंद्रने पत्नीला जीवघेणी मारहाण करत जखमी केलं. त्यामुळे त्याच्या मुलांनी थेट नरेंद्रच्या डोक्यात दगड घातला आणि त्याला भाल रोडवर तडफडत टाकून दिलं.

वडिलांवर हल्ला, पोरांची कबुली

काही गावकऱ्यांनी नरेंद्रला पाहिल्यानंतर उचलून उल्हासनगरच्या मध्यवर्ती रुग्णालयात नेलं, तेव्हा तिथे त्याच्या पत्नीला उपचारांसाठी मुलांनी आधीच आणल्याचं दिसून आलं. त्यांना विचारलं असता, बाप सारखा सारखा आईला मारत असल्यानं आम्हीच डोक्यात दगड घातल्याचं त्यांनी सांगितलं.

या घटनेत गंभीर जखमी असलेल्या नरेंद्रला उपचारांसाठी थेट मुंबईला हलवण्यात आलं आहे. हिललाईन पोलीस या घटनेचा अधिक तपास करत आहेत.

संबंधित बातम्या :

Bar Dancer Attacked | मुंबईत बारबालेसह बहिणीवर ब्लेड हल्ला, एक्स बॉयफ्रेण्ड पसार

Kolhapur CCTV | रस्त्याने शांतपणे चाललेली महिला, कुत्रा मागून धावत आला आणि लचके तोडले

Sangli Crime | भावकीतील वाद, जंगलात दबा धरुन तलवार हल्ला, तिघे गंभीर जखमी

सैफचा जीव घ्यायचा होता? बॉलिवूडच्या खलनायकाकडून हल्ल्याचा निषेध
सैफचा जीव घ्यायचा होता? बॉलिवूडच्या खलनायकाकडून हल्ल्याचा निषेध.
लाडकी बहीण योजना महिलांना आमिष दाखवण्यासाठी... सरकारनं काय म्हटलं?
लाडकी बहीण योजना महिलांना आमिष दाखवण्यासाठी... सरकारनं काय म्हटलं?.
'बारामतीत दरमहिन्याला बोलवत जा कारण...', मुंडे दादांना काय म्हणाल्या?
'बारामतीत दरमहिन्याला बोलवत जा कारण...', मुंडे दादांना काय म्हणाल्या?.
ट्रेन रिकामी, सीटवर पाय; विशेष लोकलमध्ये रेल्वे कर्मचाऱ्यांची दादागिरी
ट्रेन रिकामी, सीटवर पाय; विशेष लोकलमध्ये रेल्वे कर्मचाऱ्यांची दादागिरी.
...म्हणून सैफ टार्गेटवर, शरद पवार गटाच्या बड्या नेत्याला कोणावर संशय?
...म्हणून सैफ टार्गेटवर, शरद पवार गटाच्या बड्या नेत्याला कोणावर संशय?.
सैफची प्रकृती सध्या कशी? 'लिलावती'कडून निवेदन जारी, नेमकं काय म्हटलंय?
सैफची प्रकृती सध्या कशी? 'लिलावती'कडून निवेदन जारी, नेमकं काय म्हटलंय?.
सैफवर चाकूने 6 वार पण 12 व्या मजल्यावरच्या घरात चोराची एन्ट्री कशी?
सैफवर चाकूने 6 वार पण 12 व्या मजल्यावरच्या घरात चोराची एन्ट्री कशी?.
कराडला कोठडी अन् वकिलांमध्येच जुंपली, कोर्टाबाहेर एकच गदारोळ अन्...
कराडला कोठडी अन् वकिलांमध्येच जुंपली, कोर्टाबाहेर एकच गदारोळ अन्....
वाल्मिक कराडच्या समर्थकांच्या आलं अंगात, महिलांमध्ये घुमतंय कोण?
वाल्मिक कराडच्या समर्थकांच्या आलं अंगात, महिलांमध्ये घुमतंय कोण?.
पंतप्रधान मोदी मुंबईत अन् मंत्री धनंजय मुंडे परळीत... नेमकं कारण काय?
पंतप्रधान मोदी मुंबईत अन् मंत्री धनंजय मुंडे परळीत... नेमकं कारण काय?.