Sign In

By signing in or creating an account, you agree with Associated Broadcasting Company's Terms & Conditions and Privacy Policy.

रस्त्याच्या कडेला रिक्षा लावली आणि… बदलापुरात तरुण रिक्षा चालकाची आत्महत्या

बदलापुरात एका तरुण रिक्षाचालकाने एरंजाड पुलावरुन उल्हास नदीत उडी मारत आपली जीवनयात्रा संपवली. गुरुनाथ म्हात्रे असं या रिक्षाचालकाचं नाव आहे. गुरुनाथ म्हात्रे हा याच भागातील वडवली गावात राहत होता.

रस्त्याच्या कडेला रिक्षा लावली आणि... बदलापुरात तरुण रिक्षा चालकाची आत्महत्या
नदीत उडी घेत रिक्षा चालकाची आत्महत्या
Follow us
| Updated on: Feb 23, 2022 | 1:31 PM

बदलापूर : रिक्षा चालकाने आत्महत्या (Rickshaw Driver Suicide) केल्याची धक्कादायक घटना उघडकीस आली आहे. ठाणे जिल्ह्यातील बदलापूर शहरात (Badlapur Thane) हा प्रकार समोर आला आहे. तरुणाने उल्हास नदीत उडी (Ulhas River) मारुन आपल्या आयुष्याची अखेर केली. गुरुनाथ म्हात्रे असं मयत रिक्षा चालकाचं नाव आहे. रिक्षा रस्त्याच्या कडेला लावून थेट नदीत उडी मारली. प्रत्यक्षदर्शींनी ही घटना पाहून त्याची माहिती पोलीस आणि अग्निशमन दलाला दिली. त्यानंतर त्याचा मृतदेह अग्निशमन दलानं नदीच्या बाहेर काढला. मात्र रिक्षा चालकाने टोकाचं पाऊल का उचललं, याचं कारण अद्याप समजलेलं नाही.

काय आहे प्रकरण?

बदलापुरात एका तरुण रिक्षाचालकाने एरंजाड पुलावरुन उल्हास नदीत उडी मारत आपली जीवनयात्रा संपवली. गुरुनाथ म्हात्रे असं या रिक्षाचालकाचं नाव आहे. गुरुनाथ म्हात्रे हा याच भागातील वडवली गावात राहत होता.

एरंजाड पुलावरुन नदीत उडी

आज (बुधवारी) सकाळी 11 वाजताच्या सुमारास गुरुनाथ बदलापूरहून बारवी डॅमकडे जाणाऱ्या रस्त्यावर गेला. एरंजाडच्या उल्हास नदीच्या पुलाजवळ तो आला. त्यानंतर रिक्षा रस्त्याच्या कडेला लावून त्याने थेट नदीत उडी मारल्याचा आरोप आहे.

हा प्रकार पाहून काही प्रत्यक्षदर्शींनी याची माहिती पोलीस आणि अग्निशमन दलाला दिली. यानंतर अग्निशमन दलाने नदीत बोटीच्या सहाय्याने गुरुनाथ म्हात्रे याचा शोध घेत त्याचा मृतदेह बाहेर काढला.

आत्महत्येचं कारण अस्पष्ट

त्याचा मृतदेह शव विच्छेदन करण्यासाठी ग्रामीण रुग्णालयात पाठवण्यात आला आहे. मात्र गुरुनाथने आत्महत्येसारखे टोकाचे पाऊल का उचलले? हे अद्याप समजू शकलेले नाही. या घटनेमुळे बदलापूरहून बारवी डॅमकडे जाणाऱ्या रस्त्यावर काही काळ वाहतूक कोंडी झाली होती.

संबंधित बातम्या :

एक दुजे के लिये! दोघांचीही लग्नं झाली, पण मन रमेना, अमरावतीत ‘विवाहित’ प्रेमी युगलाची आत्महत्या

माय लास्ट लोकेशन इज…, व्हॉट्सअ‍ॅपवर स्टेटस, पुलावर सायकल, भंडाऱ्यात ITI च्या विद्यार्थ्याचं टोकाचं पाऊल?

मुलीच्या आत्महत्येनंतर सहा महिन्यांनी मृतदेह सापडला, बापाने जंगलात पुरला, पोलिसांनी दोन वर्षांनी उकरला

मराठी माणसांच्या अस्तित्वावर वरवंटा फिरवून.., राज ठाकरे स्पष्ट म्हणाले
मराठी माणसांच्या अस्तित्वावर वरवंटा फिरवून.., राज ठाकरे स्पष्ट म्हणाले.
'हिंदी'विरोधात दादरमध्ये जागोजागी तुफान बॅनरबाजी, 'हिंदू आहोत पण...'
'हिंदी'विरोधात दादरमध्ये जागोजागी तुफान बॅनरबाजी, 'हिंदू आहोत पण...'.
अपघातग्रस्तांना 1 लाखापर्यंत कॅशलेस उपचार मिळणार
अपघातग्रस्तांना 1 लाखापर्यंत कॅशलेस उपचार मिळणार.
उद्या बोलाल गुजराती शिका, परवा बोलाल.. 'हिंदी'सक्तीचा मनसेकडून विरोध
उद्या बोलाल गुजराती शिका, परवा बोलाल.. 'हिंदी'सक्तीचा मनसेकडून विरोध.
बीडमध्ये वकिली करणाऱ्या महिलेला अंग काळंनिळं होईपर्यंत बेदम मारहाण
बीडमध्ये वकिली करणाऱ्या महिलेला अंग काळंनिळं होईपर्यंत बेदम मारहाण.
सिंधुदुर्गचं बीड होणार? वैभव नाईक यांचे गंभीर आरोप
सिंधुदुर्गचं बीड होणार? वैभव नाईक यांचे गंभीर आरोप.
रविवारी लोकलने प्रवास करताय? 'या' स्थानकांवर रेल्वे सेवा नसणार
रविवारी लोकलने प्रवास करताय? 'या' स्थानकांवर रेल्वे सेवा नसणार.
मोदी आणि शहांना इंग्रजी येत नाही, म्हणून.. ; संजय राऊतांचा थेट आरोप
मोदी आणि शहांना इंग्रजी येत नाही, म्हणून.. ; संजय राऊतांचा थेट आरोप.
विरोधकांना काहीही काम उरलेलं नाही; अजित पवारांचा विरोधकांना टोला
विरोधकांना काहीही काम उरलेलं नाही; अजित पवारांचा विरोधकांना टोला.
शरण येण्याआधीच बीड पोलिसांनी रणजित कासलेला ताब्यात घेतलं
शरण येण्याआधीच बीड पोलिसांनी रणजित कासलेला ताब्यात घेतलं.