Badlapur | भांडणात मध्यस्थी केल्याचा राग, बारमध्येच तरुणावर कोयत्याने हल्ला

जखमी तरुणाला बदलापूरच्या भगवती हॉस्पिटलमध्ये दाखल करण्यात आलं आहे. त्याने दिलेल्या तक्रारीनुसार बदलापूर पश्चिम पोलिसांनी चेतन वाघेरे याच्याविरोधात हत्येच्या प्रयत्नाचा गुन्हा दाखल करत त्याला बेड्या ठोकल्या आहेत.

Badlapur | भांडणात मध्यस्थी केल्याचा राग, बारमध्येच तरुणावर कोयत्याने हल्ला
बदलापुरात तरुणावर हल्ला
Follow us
| Updated on: Dec 19, 2021 | 7:52 AM

बदलापूर : भांडणात मध्यस्थी केल्याच्या रागातून बारमध्येच एका तरुणावर जीवघेणा हल्ला करण्यात आला. ठाणे जिल्ह्यातील बदलापूर शहरात घटना उघडकीस आली आहे. या प्रकरणी पोलिसांनी आरोपीला बेड्या ठोकल्या आहेत. हल्ल्याचं सीसीटीव्ही देण्यास पोलिसांकडून नकार देण्यात आला आहे.

काय आहे प्रकरण?

बदलापूरच्या हेंद्रे पाड्यात राहणारा चेतन वाघेरे उर्फ बब्या हा रेकॉर्डवरील गुन्हेगार आहे. शुक्रवारी चेतन आणि एब्राहिम नामक एका तरुणाचे वाद सुरु होते. त्या वादात सॅम्युएल जॉन नामक तरुणाने मध्यस्थी करत वाद सोडवला.

गळ्यावर आणि दंडावर वार

यानंतर चेतन याने सॅम्युएलला बियर पाजण्यास सांगितलं. त्यामुळे चेतनला घेऊन सॅम्युएल हा जवळच्याच आदिती बारमध्ये गेला. तिथे गेल्यानंतर चेतन हा बाथरूमला जाण्याच्या निमित्ताने किचनच्या परिसरात गेला आणि येताना किचनमधून कोयता घेऊन आला. त्याने थेट सॅम्युएलच्या गळ्यावर आणि दंडावर वार केले.

हत्येच्या प्रयत्नाचा गुन्हा

या घटनेनंतर सॅम्युएलला बदलापूरच्या भगवती हॉस्पिटलमध्ये दाखल करण्यात आलंय. त्यानं दिलेल्या तक्रारीनुसार बदलापूर पश्चिम पोलिसांनी चेतन वाघेरे याच्याविरोधात हत्येच्या प्रयत्नाचा गुन्हा दाखल करत त्याला बेड्या ठोकल्या आहेत.

सीसीटीव्ही देण्यास पोलिसांचा नकार

दरम्यान, ही संपूर्ण घटना बारच्या आतमध्ये लावलेल्या सीसीटीव्ही कॅमेरात कैद झाली असली, तरी पोलिसांनी सीसीटीव्हीचा डीव्हीआरच जप्त केला असून फुटेज द्यायला सुद्धा नकार दिला आहे. तर दुसरीकडे या सगळ्यात हॉटेल चालकाने थेट एखाद्या ग्राहकाला कोयता दिलाच कसा? असा प्रश्न जखमी सॅम्युएलने उपस्थित केला असून हॉटेलचालकावरही कारवाई करण्याची मागणी केली आहे. या सगळ्यात पोलीस हॉटेल चालकाला पाठीशी घालण्याचा प्रयत्न करतायत का? असा प्रश्न उपस्थित झाला आहे.

काय आहे प्रकरण?

Traffic Police | Nagpur | मुंबईतील घटनेची नागपुरात पुनरावृत्ती! वाहतूक पोलिसाला फरफटत नेलं

Attack on Shiv Sena Activist | शिवसेना कार्यकर्त्यावर कणकवलीत तलवारीनं हल्ला! हल्ल्यामागे राणेंचा हात?

Bihar | दारुसाठी कल्ला, बिहारमधील पोलिसाचाही बाटलीवर डल्ला?

'मंत्रिमंडळात नाव आहे, असं सांगितलं अन् शपथविधीच्या वेळी वगळलं...'
'मंत्रिमंडळात नाव आहे, असं सांगितलं अन् शपथविधीच्या वेळी वगळलं...'.
छगन भुजबळांचा मंत्रिमंडळातून पत्ता कट, मनोज जरांगे पहिली प्रतिक्रिया
छगन भुजबळांचा मंत्रिमंडळातून पत्ता कट, मनोज जरांगे पहिली प्रतिक्रिया.
मंत्रिमंडळातून पत्ता कट शिवतारे भडकले, 'आता अडीच वर्षांनी मंत्रिपद...'
मंत्रिमंडळातून पत्ता कट शिवतारे भडकले, 'आता अडीच वर्षांनी मंत्रिपद...'.
मंत्रिमंडळ विस्तारानंतर नाराजी नाट्य, कोण-कोणत्या नेत्यांमध्ये नाराजी?
मंत्रिमंडळ विस्तारानंतर नाराजी नाट्य, कोण-कोणत्या नेत्यांमध्ये नाराजी?.
दोघांची दोस्ती अन् विधानभवनाच्या पायऱ्यांवर जमली गट्टी; बघा व्हिडीओ
दोघांची दोस्ती अन् विधानभवनाच्या पायऱ्यांवर जमली गट्टी; बघा व्हिडीओ.
बावनकुळेंनंतर भाजप प्रदेशाध्यक्षपदासाठी 'या' दोन नेत्यांची नावं चर्चेत
बावनकुळेंनंतर भाजप प्रदेशाध्यक्षपदासाठी 'या' दोन नेत्यांची नावं चर्चेत.
मंत्रिपद नाही, नाराज भुजबळ म्हणाले, 'मला डावललं, फेकलं फरक पडत नाही..'
मंत्रिपद नाही, नाराज भुजबळ म्हणाले, 'मला डावललं, फेकलं फरक पडत नाही..'.
मंत्रिपद हुकलं... तानाजी सावंत बॅग पॅक करून नागपुरातून निघाले अन्...
मंत्रिपद हुकलं... तानाजी सावंत बॅग पॅक करून नागपुरातून निघाले अन्....
बिनखात्याचं मंत्रिमंडळ म्हणत संजय राऊतांचा महायुतीवर निशाणा; म्हणाले..
बिनखात्याचं मंत्रिमंडळ म्हणत संजय राऊतांचा महायुतीवर निशाणा; म्हणाले...
आज महाराष्ट्र बंदची हाक, परभणीत आंबेडकर अनुयायांनी पुकारला जिल्हा बंद
आज महाराष्ट्र बंदची हाक, परभणीत आंबेडकर अनुयायांनी पुकारला जिल्हा बंद.