बॉयफ्रेण्डकडून बलात्काराचं व्हिडीओ शूट, 14 वर्षीय मुलीवर 31 जणांचा गँगरेप, डोंबिवलीत खळबळ
14 वर्षीय अल्पवयीन मुलीवर गँगरेप प्रकरणात 31 जण आरोपी असल्याची माहिती आहे. 22 जणांना मानपाडा पोलिसांनी ताब्यात घेतलं आहे. अल्पवयीन मुलीच्या प्रियकराने जानेवारीमध्ये बलात्कार करत व्हिडीओ काढला होता.
डोंबिवली : पुण्यातील अल्पवयीन मुलीवर किमान 15 जणांनी सामूहिक बलात्कार केल्याची घटना ताजी असतानाच ठाणे जिल्ह्यातूनही हादरवून टाकणारी बातमी समोर आली आहे. 14 वर्षीय मुलीवर गँगरेप झाल्याची घटना डोंबिवलीतील भोपर परिसरात समोर आली आहे. बॉयफ्रेण्डने बलात्काराचं व्हिडीओ शूट करत ब्लॅकमेल केल्यानंतर 31 जणांनी अत्याचार केल्याचा आरोप आहे.
14 वर्षीय अल्पवयीन मुलीवर गँगरेप प्रकरणात 31 जण आरोपी असल्याची माहिती आहे. 22 जणांना मानपाडा पोलिसांनी ताब्यात घेतलं आहे. अल्पवयीन मुलीच्या प्रियकराने जानेवारीमध्ये बलात्कार करत व्हिडीओ काढला होता. या व्हिडीओच्या आधारे ब्लॅकमेल करत आरोपींनी बलात्कार केल्याचा आरोप आहे. डोंबिवलीतील भोपर परिसरात हा प्रकार घडला.
पुण्यात अल्पवयीन मुलीवर गँगरेप
पीडित 13 वर्षीय मुलगी ही 31 ऑगस्टच्या रात्री गावी जाण्यासाठी पुणे रेल्वे स्थानकावर आली होती. यावेळी काही आरोपींना इतक्या रात्री तुला गाडी मिळणार नाही, असे सांगून रेल्वे स्थानकाबाहेर आणले. त्यानंतर तिचे अपहरण करत वानवडी परिसरात नेले आणि तिच्यावर आळीपाळीने सामूहिक बलात्कार केला. तब्बल दोन दिवस हा सर्व प्रकार सुरु होता.
दरम्यान रविवारी (5 सप्टेंबर) सायंकाळी हा प्रकार उघडकीस आल्यानंतर संपूर्ण शहरात एकच खळबळ उडाली. वानवडी पोलिसांनी घटनेचे गांभीर्य ओळखून तात्काळ या प्रकरणी सामूहिक बलात्काराचा गुन्हा दाखल केला होता. त्यानंतर आरोपींची ओळख पटवून सुरुवातीला आठ जणांना अटक करण्यात आली होती. या संपूर्ण प्रकरणात आतापर्यंत एकूण आरोपींची संख्या 17 वर गेली आहे. पोलीस याबाबत अधिक तपास करत आहेत.
पिंपरीत शिक्षिकेवर बलात्कार
दुसरीकडे, पिंपरीत निवृत्त सहाय्यक पोलीस आयुक्त असल्याचे सांगत एका नराधमाने शिक्षिकेवर बलात्कार केला. संबंधित शिक्षिकेला पैशाची अडचण असल्याने तिने ओळखीत असलेल्या विकास अवस्थी याच्याकडे पैशाची मागणी केली. मात्र आरोपी विकास अवस्थीने दहा टक्के व्याजाने पैसे देतो असे सांगून पीडित महिलेला घरी बोलावले. तिच्याकडून दोन कोऱ्या चेक आणि कोऱ्या कागदावर सह्या घेतल्या. त्यानंतर पीडित महिलेला सॉफ्ट ड्रिंकमधून गुंगीचं औषध दिलं. पीडित महिलेचे विवस्त्र अवस्थेतील फोटो काढून ते सर्वांना दाखवून बदनामी करण्याचीधमकी दिल्याचा आरोप आहे.
संबंधित बातम्या :