CCTV | जागा आमची, पत्रे आमचे, तू का हटवतोस? डोंबिवलीत वादावादी, दोघा भावांची बिल्डरला मारहाण
डोंबिवली पूर्वेकडील गोळवली परिसरात दिनकर हाईट्स ही तीन मजली इमारत आहे. इमारतीचे मालक आणि बांधकाम व्यावसायिक आशिष गव्हाणे आपल्या काही सहकाऱ्यांसोबत इमारत परिसरातील जागेवर साफसफाई करत होते.
डोंबिवली : साफ सफाई करण्याच्या वादातून बिल्डरला बेदम मारहाण (Builder) करण्यात आली. ठाणे जिल्ह्यात डोंबिवली शहरातील मानपाडा पोलिसांनी (Dombivli Crime) या प्रकरणी गुन्हा दाखल केला असून पुढील तपास आहे. बांधकाम व्यावसायिकला मारहाण होतानाची घटना सीसीटीव्ही कॅमेरामध्ये (CCTV Camera) कैद झाली आहे. साफसफाई करताना सिमेंटचे पत्र हटवण्यावरुन बिल्डरचा दोघा भावांशी वाद झाला होता. आमच्या जागेवरील पत्रे तुम्ही कसे हटवता, याचा जाब विचारत दोघांनी बिल्डरला मारहाण केल्याचा आरोप आहे.
काय आहे प्रकरण?
डोंबिवली पूर्वेकडील गोळवली परिसरात दिनकर हाईट्स ही तीन मजली इमारत आहे. इमारतीचे मालक आणि बांधकाम व्यावसायिक आशिष गव्हाणे आपल्या काही सहकाऱ्यांसोबत इमारत परिसरातील जागेवर साफसफाई करत होते.
पत्रे हटवण्यावरुन वाद
या जागेवर असलेले काही सिमेंटचे पत्रे हटवताना याच परिसरात राहणाऱ्या निलेश गायकर नावाच्या व्यक्तीने हा पत्रा आमचा आहे, जागा आमची आहे, तू पत्रे हटवतोस, असे सांगितले. याच दरम्यान आशिष आणि निलेश यांच्यामध्ये वाद झाला. या वादातून निलेश गायकर आणि त्याचा भाऊ अमित गायकर यांनी आशिश गव्हाणेंना मारहाण करण्यास सुरूवात केली.
या मारहाणीचा व्हिडीओ सीसीटीव्ही कॅमेरात कैद झाला आहे. हे प्रकरण समोर येताच मानपाडा पोलिसांनी मारहाण करणाऱ्या व्यक्ती विरोधात गुन्हा दाखल केला आहे. या प्रकरणाचा तपास सुरु आहे.
पाहा व्हिडीओ :
CCTV | जागा आमची, पत्रे आमचे, तू का हटवतोस? डोंबिवलीत वादावादी, दोघा भावांची बिल्डरला मारहाण #Dombivli | #Fight | #Thane | #Crime pic.twitter.com/flcJ5JWmBx
— TV9 Marathi (@TV9Marathi) March 4, 2022
संबंधित बातम्या :
किरकोळ भांडणातून तरुणाला उकळत्या चुन्यात ढकललं, साताऱ्यात अंगाचा थरकाप उडवणारा प्रकार