डोंबिवली : ठाणे जिल्ह्यातील डोंबिवली शहरात मटण शॉपमधून 9 बकरे चोरीला गेले होते. मात्र सीसीटीव्ही व्हिडीओमुळे ही चोरी उघडकीस आली. बकरे चोरणाऱ्या आरोपीला ताब्यात घेत पोलिसांनी आठ बकरेही हस्तगत केले आहेत. दुसऱ्यावर आळ घेण्याचा डाव सीसीटीव्हीमुळे फसला.
नेमकं काय घडलं?
डोंबिवली शहरात सागाव येथील संजयनगर परिसरात एका मटण शॉपमधून 9 बकरे चोरीला गेले होते. शुक्रवारी रात्री हा प्रकार घडला होता. चोरीची घटना सीसीटीव्हीत कैद झाली होती.
8 बकरे हस्तगत
मटण शॉप मालकाने या प्रकरणात मानपाडा पोलिस ठाण्यात तक्रार केली होती. पोलिसांनी सीसीटीव्हीच्या सहाय्याने या प्रकरणी बकरा चोरणाऱ्या आरोपी अरफत शेख याला ताब्यात घेऊन चोरीला गेलेले 9 पैकी 8 बकरे हस्तगत करण्यात आले आहेत.
आरोपीचा डाव काय होता?
अरफात हे सर्व बकरे मुंब्रा येथील एका ठिकाणी विकण्याच्या तयारीत होता. अरफातने बकरा चोरी करण्यासाठी एका व्यावसायिकाची गाडी वापरली आणि पुन्हा तीच गाडी ज्या ठिकाणी होती तिथेच नेऊन ठेवली. कारण चोरीचा संशय गाडीच्या मालकावर यावा असा त्याचा उद्देश होता.
सीसीटीव्हीमुळे त्याची ही चोरी उघडकीस आली. 9 पैकी 8 बकरे हस्तगत करण्यात आले आहेत. या प्रकरणात त्याच्यासोबत आणखी किती जण होते, याचा तपास पोलिस करत आहेत.
पाहा व्हिडीओ :
संबंधित बातम्या :
कांजुर मार्गमध्ये ब्रिजवर मोठा अपघात, चार गाड्या एकामागोमाग धडकल्या
किरकोळ मारहाणीचं कारण, सांगलीत भयानक रक्तपात, दोघांचा खून, नेमकं काय घडलं?
चोरी करायला दुकानात शिरला, दुकान जाळून खाक केलं, पोलिसांनी पकडलं तेव्हा तर….