Snehal Gaware Murder | बेपत्ता मुलीच्या चिंतेने ज्या बेडवर घालवली रात्र, त्यातच सापडला होता डोंबिवलीच्या स्नेहलचा मृतदेह

स्नेहल गवारे अंधेरीच्या सरदार पटेल इंजिनिअरिंग कॉलेजमध्ये प्रथम वर्षाचं शिक्षण घेत होती. डोंबिवलीतील निनाद सोसायटीत ती आई-वडिलांसोबत राहत होती. 21 जुलैला 2007 रोजी घरातील बेड बॉक्समध्ये स्नेहलचा मृतदेह आढळला होता

Snehal Gaware Murder | बेपत्ता मुलीच्या चिंतेने ज्या बेडवर घालवली रात्र, त्यातच सापडला होता डोंबिवलीच्या स्नेहलचा मृतदेह
Snehal Gaware
Follow us
| Updated on: Aug 11, 2021 | 8:22 AM

मुंबई : जुलै 2007 मध्ये ठाणे जिल्ह्यातील डोंबिवली एका इंजिनिअरिंग विद्यार्थिनीच्या हत्याकांडाने हादरुन गेले होते. अवघ्या 21 वर्षांच्या स्नेहल गवारे (Snehal Gaware) हिची राहत्या घरी निर्घृण हत्या करण्यात आली होती. मुलगी बेपत्ता असल्याच्या चिंतेतून तिच्या आई-वडिलांनी तळमळून पहिली रात्र काढली होती, धक्कादायक म्हणजे ज्या बेडवर ते बसायचे, त्यातच दुसऱ्या दिवशी स्नेहलचा मृतदेह सापडला होता. मात्र चौदा वर्षांनंतरही तिच्या हत्येचे गूढ उकललेले नाही.

कोण होती स्नेहल गवारे?

स्नेहल गवारे अंधेरीच्या सरदार पटेल इंजिनिअरिंग कॉलेजमध्ये प्रथम वर्षाचं शिक्षण घेत होती. डोंबिवलीतील निनाद सोसायटीत ती आई-वडिलांसोबत राहत होती. जून महिन्यात तिच्या पायाला दुखापत झाल्याने ती फारशी बाहेर जात नव्हती. तो दिवस होता 20 जुलै 2007 चा. स्नेहलची आई कल्पना गवारे या शिक्षिका. आई शाळेतून घरी परत आली, तेव्हा लेक कुठेच न दिसल्याने ती चक्रावून गेली. स्नेहल घरातून बेपत्ता झाली, म्हणून तिची शोधाशोध सुरु करण्यात आली.

मुलगी बेपत्ता असल्याच्या समजातून तिच्या आई-वडिलांनी अख्खी रात्र काढली होती. बेडरुममधील ज्या बेडवर त्यांचा वावर होता, त्यातच स्नेहलचा मृतदेह लपवण्यात आला होता. दुसऱ्याच दिवशी म्हणजे 21 जुलैला त्यांच्या घरातील बेड बॉक्समध्ये स्नेहलचा मृतदेह आढळला आणि एकच खळबळ उडाली. गळा आळून हत्या केल्यानंतर हातपाय बांधून स्नेहलचा मृतदेह बेडमध्ये कोंबण्यात आला होता.

कुटुंबाचा दावा काय?

स्नेहलची आई कल्पना गवारे यांच्या म्हणण्यानुसार, 20 जुलै 2007 च्या दुपारी तीन वाजून 28 मिनिटांनी त्यांना स्नेहलच्या फोनवरुन एक ब्लँक एसएमएस आला होता. मात्र मीटिंगमध्ये व्यस्त असल्यामुळे त्यांनी त्याकडे फारसं लक्ष दिलं नाही. “मी घरी आले तेव्हा स्नेहल घरी नव्हती. बेडरुमचा दरवाजा बाहेरुन लॉक होता. मी तिला फोन केला, तर मोबाईल आऊट ऑफ रिच येत होता. हॉलमध्ये एक दोरखंड आणि पाण्याचा रिकामा ग्लास होता”

“आम्ही दोघं घरी तळमळत होतो. रात्री माझं लक्ष एका थर्मासकडे गेलं. तो थर्मास सहसा बेडमध्ये असल्याने मला जरा आश्चर्य वाटलं. दुसऱ्या दिवशी सकाळी मी बेड बॉक्सचा ड्रॉवर उघडला, तेव्हा आतल्या बॅगा आणि बेडशीट्स हललेल्या दिसल्या. मी चादर बाजूला केली, तर मला स्नेहलचे पाय दिसले.” असा दावा कल्पना गवारेंनी केला होता.

आई-वडील की प्रियकर?

स्नेहलची हत्या तिचा बॉयफ्रेण्ड हितेन राठोड याने केली की दिल्लीच्या आरुषी हत्याकांडाप्रमाणे हा गुन्हा घडलाय, म्हणजे आई-वडिलांनीच आपल्या पोटच्या पोरीला संपवलं, असे अनेक तर्कवितर्क लावले गेले. या प्रकरणात तिचे आई-वडील, हितेनसह एकूण 40 जणांची चौकशी करण्यात आली होती.

विशेष म्हणजे, स्नेहलची मोठी बहीण शीतलने रामनगर पोलिसात वडिलांविरोधात काही दिवसांपूर्वी तक्रार दाखल केली होती. हिंदुराव गवारे हे मारहाण करत असल्याची तक्रार शीतलने केली होती. मात्र त्यांचे कौटुंबिक मित्र आणि निवृत्त एसीपीच्या मध्यस्थीनंतर तिने ही तक्रार मागे घेतली होती.

हितेनला अटक आणि सुटका

हितेन आणि स्नेहल एकाच कॉलेजमध्ये शिकत होते. ते एकमेकांना डिसेंबर 2005 पासून ओळखत होते. त्यांचा लग्न करण्याचा विचार असल्याचंही बोललं जातं. दरम्यानच्या काळात हितेन राठोडने यूएसमध्ये आपले पुढील शिक्षण पूर्ण केले. मात्र तीन वर्षांनी हितेन मायदेशी परतला. तो एका खासगी कंपनीत नोकरी करत होता. 28 एप्रिल 2010 रोजी स्नेहल गवारे हत्या प्रकरणात त्याला अटक करण्यात आली होती.

हत्येनंतर स्नेहलचा मोबाईल गायब होता. मात्र पोलिसांनी आयईएमए नंबरच्या आधारे मुंबईतील एका डीलरकडून तिचा मोबाईल जप्त केला होता. डीलरने केलेले युवकाचे वर्णन हितेन राठोडशी मिळतेजुळते होते. यावरुन त्यांनी हितेनला ताब्यात घेऊन बेड्या ठोकल्या. मात्र पुराव्यांच्या अभावी काही महिन्यातच त्याची सुटका करण्यात आली.

स्नेहल गवारेच्या आई-वडिलांची नार्को टेस्ट झाली. मात्र त्यातून काही निष्पन्न झाले नाही. सुरुवातीला कल्याण पोलिस आणि नंतर क्राइम ब्रांचने या प्रकरणाचा तपास केला. मात्र 14 वर्षांत तिच्या हत्येचे गूढ उलगडलेले नाही.

संबंधित बातम्या :

Sunanda Pushkar | थरुर, तरार आणि थरार! पाकिस्तानी महिला पत्रकारासोबत ट्विटरवॉरच्या दुसऱ्याच दिवशी झालेला सुनंदा पुष्कर यांचा गूढ मृत्यू

K. M. Nanavati | माझ्या बायकोशी लग्न करशील का? प्रेम आहुजाच्या उत्तरानंतर तीन गोळ्या झाडल्या, काय आहे नानावटी केस?

सैफवर हल्ला करणाऱ्या 'त्या' व्यक्तीचं लोकेशन ट्रेस, मुंबईच्या या भागात
सैफवर हल्ला करणाऱ्या 'त्या' व्यक्तीचं लोकेशन ट्रेस, मुंबईच्या या भागात.
सैफचा जीव घ्यायचा होता? बॉलिवूडच्या खलनायकाकडून हल्ल्याचा निषेध
सैफचा जीव घ्यायचा होता? बॉलिवूडच्या खलनायकाकडून हल्ल्याचा निषेध.
लाडकी बहीण योजना महिलांना आमिष दाखवण्यासाठी... सरकारनं काय म्हटलं?
लाडकी बहीण योजना महिलांना आमिष दाखवण्यासाठी... सरकारनं काय म्हटलं?.
'बारामतीत दरमहिन्याला बोलवत जा कारण...', मुंडे दादांना काय म्हणाल्या?
'बारामतीत दरमहिन्याला बोलवत जा कारण...', मुंडे दादांना काय म्हणाल्या?.
ट्रेन रिकामी, सीटवर पाय; विशेष लोकलमध्ये रेल्वे कर्मचाऱ्यांची दादागिरी
ट्रेन रिकामी, सीटवर पाय; विशेष लोकलमध्ये रेल्वे कर्मचाऱ्यांची दादागिरी.
...म्हणून सैफ टार्गेटवर, शरद पवार गटाच्या बड्या नेत्याला कोणावर संशय?
...म्हणून सैफ टार्गेटवर, शरद पवार गटाच्या बड्या नेत्याला कोणावर संशय?.
सैफची प्रकृती सध्या कशी? 'लिलावती'कडून निवेदन जारी, नेमकं काय म्हटलंय?
सैफची प्रकृती सध्या कशी? 'लिलावती'कडून निवेदन जारी, नेमकं काय म्हटलंय?.
सैफवर चाकूने 6 वार पण 12 व्या मजल्यावरच्या घरात चोराची एन्ट्री कशी?
सैफवर चाकूने 6 वार पण 12 व्या मजल्यावरच्या घरात चोराची एन्ट्री कशी?.
कराडला कोठडी अन् वकिलांमध्येच जुंपली, कोर्टाबाहेर एकच गदारोळ अन्...
कराडला कोठडी अन् वकिलांमध्येच जुंपली, कोर्टाबाहेर एकच गदारोळ अन्....
वाल्मिक कराडच्या समर्थकांच्या आलं अंगात, महिलांमध्ये घुमतंय कोण?
वाल्मिक कराडच्या समर्थकांच्या आलं अंगात, महिलांमध्ये घुमतंय कोण?.