परदेशी महिलेचा ट्रेनमध्ये विनयभंग, सोशल मीडियावर तीन वर्षांचा शोध, आरोपी जवान कल्याणमध्ये जेरबंद

आरोपीला शोधण्यासाठी अनेक शक्कल लढवल्या गेल्या, मात्र आरोपीचा शोध लागत नव्हता. पोलिसांना जो नंबर मिळाला, तो बंद होता. फेसबुक आणि इतर सोशल मीडियाच्या माध्यमातून आरोपीचा शोध सुरु केला. अखेर पोलिसांना यश आले.

परदेशी महिलेचा ट्रेनमध्ये विनयभंग, सोशल मीडियावर तीन वर्षांचा शोध, आरोपी जवान कल्याणमध्ये जेरबंद
कल्याणमध्ये परदेशी युवतीचा विनयभंग करणारा अटकेतImage Credit source: टीव्ही9
Follow us
| Updated on: Mar 02, 2022 | 1:49 PM

कल्याण : परदेशातून भारतात फिरायला आलेल्या महिलेचा धावत्या ट्रेनमध्ये विनयभंग (Molestation) झाला होता. आरोपी सैनिकाला कल्याण लोहमार्ग पोलिसांनी तब्बल तीन वर्षांनंतर अटक केली आहे. विशेष म्हणजे आरोपी साहिश टी याला अटक करण्यासाठी पोलिसानी सोशल मीडियाची मदत घेतली. 2019 साली पोर्तुगालची एक महिला (Portuguese Woman) भारतात फिरण्यासाठी आली होती. व्हॅलेंटाईन्स डे अर्थात 14 फेब्रुवारी रोजी ती गोवा दिल्ली निजामुद्दीन एक्स्प्रेसने प्रवास करत होती. यावेळी रात्री साडेअकरा वाजताच्या सुमारास एक व्यक्तीने तिच्यासोबत अश्लील वर्तन केलं. ही घटना कल्याण कसारा (Kalyan Crime) दरम्यान घडली होती.

महिलेच्या वर्णनावरुन शोध सुरु

या महिलेने घडल्या प्रकाराबाबत भारतीय दूतावासाला तक्रार केली होती. अनेक प्रकाराच्या प्रक्रिया करत या प्रकरणी कल्याण जीआरपीने गुन्हा दखल केला. आरोपी कोण आहे, याबाबत पोलिसांना कोणतीही माहिती नव्हती. जेव्हा पोलिसांनी या महिलेला संपर्क साधला, तेव्हा महिलेने वर्णन सांगितले.

कल्याण जीआरपी वरिष्ठ पोलीस निरीक्षक वाल्मिक शार्दूल यांच्या मार्गदर्शनाखाली पोलीस निरीक्षक अर्चना दुसाने यांच्या पथकाने तपास सुरू केला. आरोपीला शोधण्यासाठी अनेक शक्कल लढवल्या गेल्या, मात्र आरोपीचा शोध लागत नव्हता. पोलिसांना जो नंबर मिळाला, तो बंद होता. फेसबुक आणि इतर सोशल मीडियाच्या माध्यमातून आरोपीचा शोध सुरु केला. अखेर पोलिसांना यश आले.

आरोपी आर्मीच्या केरळ युनिटमध्ये कार्यरत होता. पोलीस तपासा दरम्यान आरोपी साहिशला कुणकुण लागली. त्याने कल्याण न्यायालयात अटकपूर्व जामिनासाठी अर्ज केला, मात्र तो रद्द झाला. त्यानंतर त्याने मुंबई उच्च न्यायालयात धाव घेतली, त्या ठिकाणी अटकपूर्व जामीन नामंजूर झाला. याच दरम्यान पोलिसांना साहिश कल्याणमध्ये नातेवाईकांकडे लपला असल्याची माहिती मिळाली. पोलिसांनी त्याला अटक केली. आज त्याला कल्याण न्यायालयात हजर केलं जाणार आहे.

पाहा व्हिडीओ :

महिलेसोबत अश्लील संभाषण प्रकरणी अटक, फीट आल्याने न्यायालयीन कोठडीतील आरोपीचा मृत्यू

लज्जास्पद! 75 वर्षीय महिलेचा रुग्णालयात विनयभंग, डोंबिवलीत वॉर्डबॉयला अटक

अल्पवयीन मुलीला मिठी मारुन शाळेच्या पटांगणात चुंबन, मुरुडमध्ये टवाळखोराला अटक

'...म्हणून सरपंच देशमुख यांची हत्या', CIDन कोर्टात काय केला मोठा दावा?
'...म्हणून सरपंच देशमुख यांची हत्या', CIDन कोर्टात काय केला मोठा दावा?.
कराडच्या गावात महिलांचं समर्थनार्थ आंदोलन, थेट रस्त्यावर झोपल्या अन्..
कराडच्या गावात महिलांचं समर्थनार्थ आंदोलन, थेट रस्त्यावर झोपल्या अन्...
वाल्मिक कराडला कोठडी अन् समर्थकांचा कोर्टाबाहेर एकच गोंधळ
वाल्मिक कराडला कोठडी अन् समर्थकांचा कोर्टाबाहेर एकच गोंधळ.
संतोष देशमुख हत्या प्रकरणात मोठी अपडेट, कराडला 7 दिवस पोलीस कोठडी
संतोष देशमुख हत्या प्रकरणात मोठी अपडेट, कराडला 7 दिवस पोलीस कोठडी.
कराडविरोधात पुरावा नाही, हत्येचा गुन्हा कसा? आरोपीच्या वकिलांचा दावा
कराडविरोधात पुरावा नाही, हत्येचा गुन्हा कसा? आरोपीच्या वकिलांचा दावा.
सुरेश धसांकडून पुन्हा मुन्नीचा उल्लेख, आता म्हणाले, राष्ट्रवादीच्या...
सुरेश धसांकडून पुन्हा मुन्नीचा उल्लेख, आता म्हणाले, राष्ट्रवादीच्या....
Beed Case : 'ती' वेळ मिळती-जुळती, कराडच्या गुन्ह्यांची कुंडली समोर
Beed Case : 'ती' वेळ मिळती-जुळती, कराडच्या गुन्ह्यांची कुंडली समोर.
'...अन्यथा इज्जतीचा पंचनामा होईल', धसांचा अजित पवारांना खोचक टोला
'...अन्यथा इज्जतीचा पंचनामा होईल', धसांचा अजित पवारांना खोचक टोला.
PM Modi VIDEO : 'सुरतच जेवण आणि काशीच मरण...', मोदी नेमकं काय म्हणाले?
PM Modi VIDEO : 'सुरतच जेवण आणि काशीच मरण...', मोदी नेमकं काय म्हणाले?.
Indian Navy : INS निलगिरी, वाघशीर अन् सूरत जहाजाची वैशिष्ट्ये काय?
Indian Navy : INS निलगिरी, वाघशीर अन् सूरत जहाजाची वैशिष्ट्ये काय?.