पोलिसांनी बोगस ग्राहक पाठवला आणि महिला दलाल जाळ्यात अडकली, कल्याणमध्ये देह व्यापार रॅकेटचा पर्दाफाश

ठाणे अनैतिक मानवी तस्करी पथकाने सेक्स रॅकेटचा भांडाफोड केला आहे. कल्याण शहरातील एका हॉटेलमधून एका महिला दलालाला बेड्या ठोकण्यात आल्या आहेत, तर तीन मुलींची सुटका करण्यात आली आहे

पोलिसांनी बोगस ग्राहक पाठवला आणि महिला दलाल जाळ्यात अडकली, कल्याणमध्ये देह व्यापार रॅकेटचा पर्दाफाश
कल्याणमध्ये सेक्स रॅकेटचा भांडाफोड
Follow us
| Updated on: Feb 09, 2022 | 7:08 AM

कल्याण : कल्याणमधील हॉटेलमध्ये सेक्स रॅकेटचा (Kalyan Crime) पर्दाफाश करण्यात आला आहे. ठाणे अनैतिक मानवी तस्करी पथकाने ही कारवाई केली. कल्याणमधील एका हॉटेलमधून एका महिला दलाला अटक करण्यात आली आहे. तर देह व्यापाराच्या दलदलीत जबरदस्ती ढकलण्यात आलेल्या तीन मुलींची सुटका करण्यात आली आहे. आरोपी महिला ठाणे जिल्ह्यातील कल्याण उल्हासनगर परिसरात सेक्स रॅकेट चालवत असल्याचे तपासात समोर आले आहे. महिला दलाल मुलींकडून जबरदस्ती वेश्या व्यवसाय करुन घेत असल्याची माहिती पोलीस निरीक्षकांना मिळाली होती. त्यामुळे त्यांच्या पथकाने सापळा रचला. बोगस ग्राहक पाठवून महिला दलालाला ताब्यात घेतले आणि गुन्हा दाखल केला. तर देह व्यापारातून सुटका करण्यात आलेल्या तीन मुलींची रवानगी महिला सुधारगृहात करण्यात आली आहे.

काय आहे प्रकरण?

ठाणे अनैतिक मानवी तस्करी पथकाने सेक्स रॅकेटचा भांडाफोड केला आहे. कल्याण शहरातील एका हॉटेलमधून एका महिला दलालाला बेड्या ठोकण्यात आल्या आहेत, तर तीन मुलींची सुटका करण्यात आली आहे. ही महिला कल्याण उल्हासनगर परिसरात सेक्स रॅकेट चालवत असल्याचे तपासात समोर आले आहे.

ठाणे अनैतिक मानवी तस्करी पथकाचे पोलीस निरीक्षक महेश पाटील यांना एक महिला दलाल मुलींकडून जबरदस्तीने वेश्या व्यवसाय करुन घेत असल्याची माहिती मिळाली होती. कल्याण पश्चिमेकडील लीला रेसिडन्सी नजीक काही मुलींना ती घेऊन येणार असल्याचंही त्यांना समजलं होतं.

बोगस ग्राहक पाठवून सापळा

या माहितीच्या आधारे पोलीस पथकाने सापळा रचत बोगस ग्राहक पाठवले आणि या महिलेला ताब्यात घेतले. या महिलेच्या ताब्यातून तीन मुलींची सुटका करण्यात आली आहे. या प्रकरणी कल्याण बाजारपेठ पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला असून या महिला दलालाला पोलिसांच्या ताब्यात देण्यात आलं आहे. तर तीन मुलींना महिला सुधारगृहात पाठवण्यात येणार आहे.

संबंधित बातम्या :

पिंपरीत स्पा सेंटरच्या नावाखाली वेश्या व्यवसाय, महिला मालकासह दोघे अटकेत, चौघींची सुटका

75 बांग्लादेशी मुलींशी लग्न, दोनशे जणींना देह व्यापारात ढकललं, मुंबई-पुण्यासह देशभरात जाळं

नागपूरच्या गजबजलेल्या मार्केट परिसरात देहविक्रीचा धंदा, लॉजवर पोलिसांचा सापळा, अखेर तरुणीचा सुटका, आरोपीला बेड्या

भाजपच्या या 4 नेत्याचं सत्तेत कमबॅक, लालदिव्याची प्रतीक्षा अखेर संपली
भाजपच्या या 4 नेत्याचं सत्तेत कमबॅक, लालदिव्याची प्रतीक्षा अखेर संपली.
भरतशेठ... झाले थोडे लेट पण कॅबिनेटच आणलं थेट! मंत्रिपदाची माळ गळ्यात
भरतशेठ... झाले थोडे लेट पण कॅबिनेटच आणलं थेट! मंत्रिपदाची माळ गळ्यात.
'हा मैं नाराज, वहाँ नही रहेना..',भुजबळांचा भडका अन् हाती बंडाचा झेंडा?
'हा मैं नाराज, वहाँ नही रहेना..',भुजबळांचा भडका अन् हाती बंडाचा झेंडा?.
'मंत्रिमंडळात नाव आहे, असं सांगितलं अन् शपथविधीच्या वेळी वगळलं...'
'मंत्रिमंडळात नाव आहे, असं सांगितलं अन् शपथविधीच्या वेळी वगळलं...'.
छगन भुजबळांचा मंत्रिमंडळातून पत्ता कट, मनोज जरांगे पहिली प्रतिक्रिया
छगन भुजबळांचा मंत्रिमंडळातून पत्ता कट, मनोज जरांगे पहिली प्रतिक्रिया.
मंत्रिमंडळातून पत्ता कट शिवतारे भडकले, 'आता अडीच वर्षांनी मंत्रिपद...'
मंत्रिमंडळातून पत्ता कट शिवतारे भडकले, 'आता अडीच वर्षांनी मंत्रिपद...'.
मंत्रिमंडळ विस्तारानंतर नाराजी नाट्य, कोण-कोणत्या नेत्यांमध्ये नाराजी?
मंत्रिमंडळ विस्तारानंतर नाराजी नाट्य, कोण-कोणत्या नेत्यांमध्ये नाराजी?.
दोघांची दोस्ती अन् विधानभवनाच्या पायऱ्यांवर जमली गट्टी; बघा व्हिडीओ
दोघांची दोस्ती अन् विधानभवनाच्या पायऱ्यांवर जमली गट्टी; बघा व्हिडीओ.
बावनकुळेंनंतर भाजप प्रदेशाध्यक्षपदासाठी 'या' दोन नेत्यांची नावं चर्चेत
बावनकुळेंनंतर भाजप प्रदेशाध्यक्षपदासाठी 'या' दोन नेत्यांची नावं चर्चेत.
मंत्रिपद नाही, नाराज भुजबळ म्हणाले, 'मला डावललं, फेकलं फरक पडत नाही..'
मंत्रिपद नाही, नाराज भुजबळ म्हणाले, 'मला डावललं, फेकलं फरक पडत नाही..'.