Sign In

By signing in or creating an account, you agree with Associated Broadcasting Company's Terms & Conditions and Privacy Policy.

CCTV | कार पार्किंगवरुन बाचाबाची, मुरबाडमध्ये डॉक्टरवर कोयत्याने हल्ला

पार्किंगच्या वादातून एका इसमाने डॉक्टरवर कोयत्याने प्राणघातक हल्ला केल्याची घटना मुरबाडमध्ये घडली आहे. मुरबाड शहरातील अंजनी गॅस परिसरात सोमवारी सकाळी ही घटना घडली.

CCTV | कार पार्किंगवरुन बाचाबाची, मुरबाडमध्ये डॉक्टरवर कोयत्याने हल्ला
डॉक्टरवर कोयत्याने हल्ला
Follow us
| Updated on: Feb 15, 2022 | 6:34 AM

ठाणे : डॉक्टरवर प्राणघातक हल्ला (Doctor Attacked) झाल्याची घटना धक्कादायक घटना उघडकीस आली आहे. पार्किंगच्या वादातून हा हल्ला झाल्याचा दावा केला जात आहे. आरोपीने कोयत्याने डॉक्टरवर जीवघेणा हल्ला केल्याचा आरोप आहे. ठाणे जिल्ह्यात बदलापूर-अंबरनाथजवळ असलेल्या मुरबाडमध्ये (Murbad Thane) हा अंगाचा थरकार उडवणारा प्रकार घडला. डॉ. धीरज श्रीवास्तव यांच्यावर हा हल्ला झाला. डॉक्टर नेहमीप्रमाणे क्लिनिकला जायला निघाले असताना आरोपीने त्यांच्याशी पार्किंगवरुन हुज्जत घालण्यास सुरुवात केली होती. डॉक्टरांनी आरोपीचा वार चुकवल्याने थोडक्यात निभावलं. कोयत्याचा वार त्यांनी हातावर झेलला. त्यामुळे डॉक्टरांना डोकं आणि हाताला दुखापत (Thane Crime News) झाल्याची माहिती आहे. हल्ल्याची ही घटना परिसरातील सीसीटीव्ही कॅमेरात कैद झाली आहे.

काय आहे प्रकरण?

पार्किंगच्या वादातून एका इसमाने डॉक्टरवर कोयत्याने प्राणघातक हल्ला केल्याची घटना मुरबाडमध्ये घडली आहे. मुरबाड शहरातील अंजनी गॅस परिसरात सोमवारी सकाळी ही घटना घडली. मुरबाड शहरात वैद्यकीय व्यवसाय करणारे डॉ. धीरज श्रीवास्तव हे अंजनी गॅस परिसरात राहतात. सकाळी ते नेहमीप्रमाणे आपल्या क्लिनिकमध्ये जाण्यास निघाले असता याच ठिकाणी राहणाऱ्या भाऊ मुरबाडे या इसमाने त्यांच्याशी गाडी पार्किंग करण्यावरून वाद घातला.

नेमकं काय घडलं?

डॉ. धीरज यांना भाऊ मुरबाडे याने दांडक्याने मारहाण करण्यास सुरुवात केली. इतक्यावरच न थांबता त्याने डॉ. धीरज यांच्यावर कोयत्याने हल्ला केला. कोयत्याचा हा वार त्यांनी हातावर झेलल्याने हा हल्ला डॉक्टरांच्या बोटावर निभावला. या हल्ल्यात डॉ. धीरज यांच्या हाताला आणि डोक्याला दुखापत झाली आहे.

दरम्यान, हल्ल्याची ही घटना सीसीटीव्हीत कैद झाली असून आरोपी भाऊ मुरबाडे याच्यावर मुरबाड पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करून त्याला बेड्या ठोकण्यात आल्या आहेत. मात्र या प्रकरणी पोलिसांनी कॅमेरासमोर काहीही बोलण्यास नकार दिलाय.

पाहा व्हिडीओ :

संबंधित बातम्या :

दहा रुपयांच्या सिगारेटवरुन वाद, टोळक्याचा दुकानावर हल्ला, दुकानदाराच्या वडिलांची हत्या

मुलींची छेड काढून मुख्याध्यापकांवर तलवारीने हल्ला करणारा रोड रोमियो पोलिसांच्या ताब्यात

VIDEO | पगाराचा चेक का अडवला? महिला मुख्याधिकाऱ्याचा आक्रस्ताळेपणा, अकाऊण्टंटवर वस्तू फेकल्या

प्रशांत कोरटकर जामीनासाठी अर्ज करणार
प्रशांत कोरटकर जामीनासाठी अर्ज करणार.
आमदारांच्या घरांसमोर टेंभे पेटवणार; कर्जमाफीच्या मुद्यावर कडू आक्रमक
आमदारांच्या घरांसमोर टेंभे पेटवणार; कर्जमाफीच्या मुद्यावर कडू आक्रमक.
लाडक्या बहिणींमुळे तिजोरीवर भार आलाय, त्यामुळे..; शिरसाटांचा खुलासा
लाडक्या बहिणींमुळे तिजोरीवर भार आलाय, त्यामुळे..; शिरसाटांचा खुलासा.
कर्जमाफी देता येत नाही तर...; संजय राऊतांचा अजित पवारांना टोला
कर्जमाफी देता येत नाही तर...; संजय राऊतांचा अजित पवारांना टोला.
स्वत:च्याच कारमध्ये मृतावस्थेत आढळला पोलीस कर्मचारी
स्वत:च्याच कारमध्ये मृतावस्थेत आढळला पोलीस कर्मचारी.
ठाणे का टायगर, आखो मे अंगार.. ; शिंदेंच्या समर्थनार्थ शहाजीबापूंचं गाण
ठाणे का टायगर, आखो मे अंगार.. ; शिंदेंच्या समर्थनार्थ शहाजीबापूंचं गाण.
मनसे मेळावा; शिवतीर्थावर राज ठाकरेंची तोफ धडाडणार
मनसे मेळावा; शिवतीर्थावर राज ठाकरेंची तोफ धडाडणार.
संघ बाह्य आणि आंतरिक दृष्टीसाठी काम करतो; पंतप्रधान मोदींचे गौरवोद्गार
संघ बाह्य आणि आंतरिक दृष्टीसाठी काम करतो; पंतप्रधान मोदींचे गौरवोद्गार.
'आपल्या सर्वांना...', पंतप्रधान मोदींची मराठीतून भाषणाला सुरुवात
'आपल्या सर्वांना...', पंतप्रधान मोदींची मराठीतून भाषणाला सुरुवात.
शुद्ध सात्विक प्रेम हीच संघाची प्रेरणा - मोहन भागवत
शुद्ध सात्विक प्रेम हीच संघाची प्रेरणा - मोहन भागवत.