जेलमधून दोनदा पळाला, कल्याण स्टेशनबाहेर मोबाईल चोरणारा भामटा पोलिसांच्या जाळ्यात कसा सापडला?

अविनाश हा 20 जुलै 2020 रोजी आधारवाडी कारागृहात त्याचा साथीदार श्याम चव्हाण सोबत पळून गेला होता. पळून गेल्यावर त्याने मोबाईल चोरीचा धंदा सुरु केला. त्याच्याकडून पोलिसांनी पाच मोबाईल हस्तगत केले आहेत.

जेलमधून दोनदा पळाला, कल्याण स्टेशनबाहेर मोबाईल चोरणारा भामटा पोलिसांच्या जाळ्यात कसा सापडला?
कल्याणमध्ये सराईत चोराला अटक
Follow us
| Updated on: Dec 26, 2021 | 8:40 AM

कल्याण : कल्याणच्या महात्मा फुले पोलिसांनी एका सराईत चोरट्याला अटक केली आहे. अविनाश गायकवाड नावाचा हा चोरटा जेलमधून दोनदा पळून गेला होता. जेलमधून फरार झाल्यानंतर त्याने अनेक लुटीचे गुन्हे केल्याचे उघड झाले आहे. त्याने चोरलेले पाच महागडे मोबाईल पोलिसांनी हस्तगत केले आहेत.

काय आहे प्रकरण?

कल्याणमध्ये राहणाऱ्या मनिष गुप्ता याची आई त्यांच्या मूळ गावी आजमगडला जाण्यासाठी निघाली होती. 22 डिसेंबर रोजी 11 वाजून 45 मिनिटांनी जाणाऱ्या गोदाम एक्सप्रेसने त्या उत्तर प्रदेशला रवाना होणार होत्या. मनिष आईला घेऊन कल्याण रेल्वे स्थानकात आला. मात्र गाडी स्थानकात येण्यास वेळ होता. आईसाठी फळे खरेदी करण्यासाठी मनिष हा कल्याण रेल्वे स्थानकातून बाहेर पडला. एसटी स्टॅण्ड समोर उभ्या असलेल्या एका हातगाडीवरून त्याने फळे घेतली. याच दरम्यान त्याचा मोबाईल हिसकावून एक अज्ञात चोरटा पसार झाला.

स्टेशनबाहेर मोबाईल चोरी

मनिषने त्याची तक्रार महात्मा फुले पोलिस ठाण्यात दिली. कल्याणचे एसीपी उमेश माने पाटील यांच्या मागदर्शनाखाली या गुन्ह्याचा तपास करण्यासाठी महात्मा फुले चौक पोलिस ठाण्याचे वरिष्ठ पोलिस निरीक्षक अशोक होनमाने आणि पोलिस निरीक्षक प्रदीप पाटील यांनी एक विशेष तपास पथक तयार केले. पोलिसांनी तपास सुरु केला.

चोरट्याविषयीच्या माहितीने पोलीसही हैराण

माहितीच्या आधारे एसटी स्टॅण्डला सापळा लावून पोलिसांनी एका तरुणाला ताब्यात घेतले. चौकशी दरम्यान माहिती समोर आली की, याच तरुणाने मनिषचा मोबाईल चोरी केला होता. अविनाश गायकवाड असे या चोरट्याचे नाव आहे. जेव्हा पोलिसांनी अविनाश गायकवाड संदर्भात माहिती काढली तेव्हा पोलिस हैराण झाले.

दोन वेळा तुरुंगातून पळाला

अविनाश हा 20 जुलै 2020 रोजी आधारवाडी कारागृहात त्याचा साथीदार श्याम चव्हाण सोबत पळून गेला होता. पळून गेल्यावर त्याने मोबाईल चोरीचा धंदा सुरु केला. त्याच्याकडून पोलिसांनी पाच मोबाईल हस्तगत केले आहेत. अविनाश हा काही वर्षापूर्वी सोलापूरच्या कारागृहातूनही पळून गेला होता. त्यावेळी त्याला अटक करण्यात आली होती. अविनाशच्या विरोधात राज्यभरात 15 गुन्हे दाखल आहेत, पुढील तपास पोलिस करत आहेत.

संबंधित बातम्या :

संमतीशिवाय महिलेच्या शरीराला हात लावणे हा गुन्हाच : मुंबई उच्च न्यायालय

गोहत्येचा संशय, सिनेस्टाईल पाठलाग करत टेम्पोवर कारवाई, सापळा रचून दोघांना पकडलं!

Dombivali Crime: चाकूच्या धाकाने बँक मॅनेजरला लूटले; डोंबिवलीतील धक्कादायक प्रकार

'मंत्रिमंडळात नाव आहे, असं सांगितलं अन् शपथविधीच्या वेळी वगळलं...'
'मंत्रिमंडळात नाव आहे, असं सांगितलं अन् शपथविधीच्या वेळी वगळलं...'.
छगन भुजबळांचा मंत्रिमंडळातून पत्ता कट, मनोज जरांगे पहिली प्रतिक्रिया
छगन भुजबळांचा मंत्रिमंडळातून पत्ता कट, मनोज जरांगे पहिली प्रतिक्रिया.
मंत्रिमंडळातून पत्ता कट शिवतारे भडकले, 'आता अडीच वर्षांनी मंत्रिपद...'
मंत्रिमंडळातून पत्ता कट शिवतारे भडकले, 'आता अडीच वर्षांनी मंत्रिपद...'.
मंत्रिमंडळ विस्तारानंतर नाराजी नाट्य, कोण-कोणत्या नेत्यांमध्ये नाराजी?
मंत्रिमंडळ विस्तारानंतर नाराजी नाट्य, कोण-कोणत्या नेत्यांमध्ये नाराजी?.
दोघांची दोस्ती अन् विधानभवनाच्या पायऱ्यांवर जमली गट्टी; बघा व्हिडीओ
दोघांची दोस्ती अन् विधानभवनाच्या पायऱ्यांवर जमली गट्टी; बघा व्हिडीओ.
बावनकुळेंनंतर भाजप प्रदेशाध्यक्षपदासाठी 'या' दोन नेत्यांची नावं चर्चेत
बावनकुळेंनंतर भाजप प्रदेशाध्यक्षपदासाठी 'या' दोन नेत्यांची नावं चर्चेत.
मंत्रिपद नाही, नाराज भुजबळ म्हणाले, 'मला डावललं, फेकलं फरक पडत नाही..'
मंत्रिपद नाही, नाराज भुजबळ म्हणाले, 'मला डावललं, फेकलं फरक पडत नाही..'.
मंत्रिपद हुकलं... तानाजी सावंत बॅग पॅक करून नागपुरातून निघाले अन्...
मंत्रिपद हुकलं... तानाजी सावंत बॅग पॅक करून नागपुरातून निघाले अन्....
बिनखात्याचं मंत्रिमंडळ म्हणत संजय राऊतांचा महायुतीवर निशाणा; म्हणाले..
बिनखात्याचं मंत्रिमंडळ म्हणत संजय राऊतांचा महायुतीवर निशाणा; म्हणाले...
आज महाराष्ट्र बंदची हाक, परभणीत आंबेडकर अनुयायांनी पुकारला जिल्हा बंद
आज महाराष्ट्र बंदची हाक, परभणीत आंबेडकर अनुयायांनी पुकारला जिल्हा बंद.