उल्हासनगर : ठाणे जिल्ह्यातील उल्हासनगर शहरामध्ये डान्स बारवर कारवाई करत गुन्हे शाखेनं बारबालांसह वेटर आणि ग्राहकांना ताब्यात घेतलं. चांदनी नावाच्या बारवर ही कारवाई करण्यात आली. 17 बारबालांसह वेटर आणि ग्राहक अशा 40 जणांना पोलिसांनी ताब्यात घेतलं.
काय आहे प्रकरण?
उल्हासनगरच्या 17 सेक्शन चौकाजवळ चांदनी नावाचा बार आहे. या बारमध्ये बारबाला बिभत्स नृत्य करत असल्याची माहिती उल्हासनगर गुन्हे शाखेला मिळाली होती. त्यानुसार गुन्हे शाखेचे वरिष्ठ पोलीस निरीक्षक महेश तरडे यांनी स्वतः पथकासह शनिवारी रात्री उशिरा या बारवर धाड टाकली.
बारबाला, वेटर, ग्राहकांवर कारवाई
यावेळी बारमध्ये 17 बारबाला अश्लील हावभाव करत नृत्य करत असल्याचं समोर आल्यानं या बारवर कारवाई करण्यात आली. यावेळी 17 बारबाला, 13 वेटर्स आणि 10 ग्राहकांना गुन्हे शाखेनं ताब्यात घेतलं.
उल्हासनगर शहरात अनेक डान्सबार असून एक दिवस कारवाई झाली की पुन्हा दुसऱ्या दिवशीपासून हे बार सुरू होतात. त्यामुळे बारवर कडक कारवाई करण्याची गरज निर्माण झाली आहे.
गोरेगावमधील डान्स बारवर छापा
याआधी, लॉकडाऊनमध्ये सुरु असलेल्या डान्स बारवर मुंबई पोलिसांनी गेल्या वर्षी ऑक्टोबर महिन्यात धाड टाकली होती. यावेळी पोलिसांनी 15 ग्राहकांसह 20 जणांना अटक करण्यात आली होती. गोरेगाव पोलिसांनी ही धडक कारवाई केली होती. पोलिसांनी या बारमधील तळ घरातून 11 मुलींची सुटका केली होती.
पोलिसांनी गोरेगाव येथील एका डान्स बारवर कारवाई केल्यानंतर परिसरात एकच खळबळ उडाली होती. रात्री 1 वाजता पोलिसांनी बारवर छापा मारला त्यावेळी डान्स बारमध्ये एकूण 11 मुली डान्स करत होत्या, असं पोलिसांनी सांगितले. 11 पीडित मुलींची यामधून सुटका करत वेटर, सुपरव्हायजर, कॅशिअर आणि मॅनेजरलाही पोलिसांनी अटक केली होती.
पिंपरीत बार आणि लॉजवर छापेमारी
पिंपरी चिंचवड पोलिसांच्या सामाजिक सुरक्षा विभागाने रात्री बार आणि लॉजवर छापेमारी केली होती. जगताप डेअरी परिसरातील अॅलो गॅस्ट्रो लॉज आणि एटीन डिग्री रुफ टॉप हॉटेल अँड बारवर पोलिसांनी धाड टाकली होती. यावेळी 200 हून अधिक तरुण-तरुणींना पिंपरी चिंचवड पोलिसांनी ताब्यात घेतलं होतं.
संबंधित बातम्या
पुण्यात बनावट ग्राहक पाठवून लॉजवर छापा, देह व्यापाराच्या रॅकेटचा पर्दाफाश, तिघींची सुटका
लॉकडाऊनमध्ये रात्री उशिरापर्यंत डान्सबार सुरु, पोलिसांचा छापा, तळघरातून 11 मुलींची सुटका