पत्नीच्या हत्या प्रकरणातून जिने जामिनावर सोडवलं, त्याच बहिणीचा भांडणानंतर खून
दोन दिवसांपूर्वी या दोघा भावंडांमध्ये काही कारणावरून वाद झाला. या वादात योगेश याने अरुणा यांची हत्या केली. यानंतर बहिणीचा मृतदेह घरातच टाकून तो पसार झाला.
उल्हासनगर : उल्हासनगरात निर्दयी भावानेच बहिणीची हत्या केल्याची घटना घडली आहे. दोन दिवसांपासून बहिणीचा मृतदेह घरातच पडून असल्याने मृतदेहाची दुर्गंधी पसरली होती. त्यानंतर इमारतीतल्या रहिवाशांनी पोलिसांना माहिती दिली आणि हा प्रकार समोर आला. धक्कादायक बाब म्हणजे याच आरोपीने सहा वर्षांपूर्वी त्याच्या गर्भवती पत्नीची सुद्धा हत्या केली होती. आरोपी भाऊ गतिमंद असल्याची माहिती आहे.
काय आहे प्रकरण?
ठाणे जिल्ह्यातील उल्हासनगर शहरातील कॅम्प 1 भागात असलेल्या सचदेव नगरमध्ये ही घटना घडली. या भागात असलेल्या एका इमारतीत योगेश म्हैसमाळे आणि अरुणा म्हैसमाळे हे दोघे बहीण भाऊ इमारतीच्या चौथ्या मजल्यावर राहत होते.
दोन दिवसांनी इमारतीत दुर्गंधी
दोन दिवसांपूर्वी या दोघा भावंडांमध्ये काही कारणावरून वाद झाला. या वादात योगेश याने अरुणा यांची हत्या केली. यानंतर बहिणीचा मृतदेह घरातच टाकून तो पसार झाला. अखेर दोन दिवसांनी इमारतीत दुर्गंधी पसरल्यानंतर रहिवाशांनी पोलिसांना माहिती दिली आणि या सगळ्याचा उलगडा झाला.
सहा वर्षांपूर्वी पत्नीची हत्या
यानंतर पोलिसांनी आरोप योगेश म्हैसमाळे याला अटक केली आहे. धक्कादायक बाब म्हणजे योगेश म्हैसमाळे याने सहा वर्षांपूर्वी त्याच्या पत्नीची सुद्धा हत्या केली होती. या प्रकरणात शिक्षा झाल्यानंतर तो कारागृहात असताना अरुणा या मयत बहिणीनेच त्याला जामिनावर सोडवून आणलं होतं. त्यानंतर हे बहीण भाऊ सोबत राहत होते. मात्र आता योगेश याने बहिणीचीच हत्या केल्यानं खळबळ माजली आहे.
संबंधित बातम्या :
वडिलांपाठोपाठ लेकही गेला, कृषी पंपाचे कनेक्शन जोडताना खांबावरच शॉक, 32 वर्षीय तरुणाचा मृत्यू
जेलमधून संचित सुट्टीवर बाहेर, गावकऱ्याचं घर पेटवणाऱ्या तरुणाला तीन वर्ष सक्तमजुरी