Sign In

By signing in or creating an account, you agree with Associated Broadcasting Company's Terms & Conditions and Privacy Policy.

गाडीला धडक दिल्याच्या कारणावरुन बेदम मारहाण, उल्हासनगरमध्ये तरुणाची हत्या

तुम्ही माझ्या दुचाकीला धडक दिली, असा आरोप करणने केला. तसंच टेम्पो चालवत असलेल्या आकाश संचेरिया याला त्याने मारहाण करायला सुरुवात केली. त्यामुळे भरत उर्फ सोनू पाटडीया हा मध्ये पडला.

गाडीला धडक दिल्याच्या कारणावरुन बेदम मारहाण, उल्हासनगरमध्ये तरुणाची हत्या
गाडीला धडक दिल्याच्या वादातून हत्याImage Credit source: टीव्ही 9
Follow us
| Updated on: May 18, 2022 | 11:03 AM

उल्हासनगर : गाडीला धडक दिल्याच्या कारणावरुन तरुणाची हत्या (Youth Murder) करण्यात आली. ठाणे जिल्ह्यातील उल्हासनगर शहरात (Ulhasnagar Thane Crime News) हा धक्कादायक प्रकार घडला. तीन चाकी टेम्पोला धडक दिल्याचा दावा करत बाईकस्वाराने एका तरुणाला मारहाण करत त्याची हत्या केल्याचा आरोप आहे. या घटनेनंतर पोलिसांनी अवघ्या पाच तासात आरोपीला बेड्या ठोकल्या आहेत.

नेमकं काय घडलं?

उल्हासनगरच्या कॅम्प 1 भागातून सोमवारी रात्री आकाश संचेरिया हा भाजी विक्रेता तरुण त्याचा मित्र भरत उर्फ सोनू पाटडीया याच्यासोबत तीन चाकी टेम्पोने जात होता. यावेळी त्यांच्या मागून करण जसुजा हा तरुण दुचाकीवरून आला आणि त्याने या टेम्पोसमोर दुचाकी आडवी लावली.

हे सुद्धा वाचा

बाईकला धडक दिल्याचा दावा

तुम्ही माझ्या दुचाकीला धडक दिली, असा आरोप करणने केला. तसंच टेम्पो चालवत असलेल्या आकाश संचेरिया याला त्याने मारहाण करायला सुरुवात केली. त्यामुळे भरत उर्फ सोनू पाटडीया हा मध्ये पडला. तेव्हा करण जसुजा याने त्यालाही खाली पाडून मारहाण केली.

या मारहाणीत जागीच बेशुद्ध पडलेल्या भरत उर्फ सोनू पाटडीया याला रुग्णालयात नेले असता डॉक्टरांनी त्याला मृत घोषित केलं. या प्रकरणी उल्हासनगर पोलिसांनी गुन्हा दाखल करत तपासाला सुरुवात केली.

कुठलाच पुरावा नसताना पाच तासात कारवाई

दुचाकी चालक हा अनोळखी असल्याने त्याचा माग काढता येत नव्हता. मात्र उल्हासनगर पोलिसांनी आपलं नेटवर्क वापरून अवघ्या पाच तासात दुचाकीचालक करण जसुजा याला बेड्या ठोकल्याची माहिती परिमंडळ चारचे पोलीस उपायुक्त प्रशांत मोहिते यांनी दिली आहे.

दुचाकीचालक करण जसुजा याच्यावर यापूर्वी कोणते गुन्हे दाखल आहेत का? याचा तपास पोलिसांकडून सध्या सुरू केला आहे. कोणताही धागा दोरा नसताना अवघ्या काही तासात उल्हासनगर पोलिसांनी आरोपीला बेड्या ठोकल्याने पोलिसांच्या कामगिरीचं कौतुक केलं जात आहे

'ओ तुम्ही गाड्या घ्या ना, कलेक्टर..', अजितदादा वैतागले
'ओ तुम्ही गाड्या घ्या ना, कलेक्टर..', अजितदादा वैतागले.
शिंदेंच्या व्यंगचित्राचे फ्लेक्स लावणं पडलं महागात, त्या बॅनरची चर्चा
शिंदेंच्या व्यंगचित्राचे फ्लेक्स लावणं पडलं महागात, त्या बॅनरची चर्चा.
हिंदूंच्या मंगळसूत्राचं रक्षण कोण करणार? उद्धव ठाकरेंचा भाजपला टोला
हिंदूंच्या मंगळसूत्राचं रक्षण कोण करणार? उद्धव ठाकरेंचा भाजपला टोला.
'त्यांनी कोणत्या बागेचा आंबा खाल्ला माहीत नाही', ठाकरेंचा भिडेंना टोला
'त्यांनी कोणत्या बागेचा आंबा खाल्ला माहीत नाही', ठाकरेंचा भिडेंना टोला.
शाहरुखच्या बंगल्याचा रंजक इतिहास; व्हिला व्हिएनावरून असा बनला 'मन्नत'
शाहरुखच्या बंगल्याचा रंजक इतिहास; व्हिला व्हिएनावरून असा बनला 'मन्नत'.
'सुरेश धसांची दाढी अचानक पांढरी झाली...', अंजली दमानियांनी डिवचलं
'सुरेश धसांची दाढी अचानक पांढरी झाली...', अंजली दमानियांनी डिवचलं.
'सौगात ए मोदी'वरून उद्धव ठाकरेंची भाजपवर टीका
'सौगात ए मोदी'वरून उद्धव ठाकरेंची भाजपवर टीका.
विधानभवन परिसरात उद्धव ठाकरे म्हणाले, 'हरामखोर आहेत ते...',रोख कोणाकडे
विधानभवन परिसरात उद्धव ठाकरे म्हणाले, 'हरामखोर आहेत ते...',रोख कोणाकडे.
शेतकऱ्यांच्या कर्जमाफीसाठी पठ्ठ्या थेट विहिरीत उतरला
शेतकऱ्यांच्या कर्जमाफीसाठी पठ्ठ्या थेट विहिरीत उतरला.
शिवसेनेत प्रवेश केल्यानंतरही धंगेकरांना काँग्रेसचा 'पंजा' काही सुटेना
शिवसेनेत प्रवेश केल्यानंतरही धंगेकरांना काँग्रेसचा 'पंजा' काही सुटेना.