उल्हासनगरमध्ये पुन्हा अज्ञात मृतदेह सापडला, डोक्याला इजा, हत्येचा संशय
उल्हासनगर शहरात मागील काही दिवसांपासून हत्या, मृतदेह सापडणं यांचं सत्र सुरु आहे. त्यात आता आणखी एका मृतदेहाची भर पडलीये. विठ्ठलवाडी पोलीस ठाण्याच्या हद्दीत सेंटर पार्क हॉटेल असून या हॉटेलच्या बाजूला एक अज्ञात मृतदेह आज सकाळच्या सुमारास आढळून आला.
उल्हासनगर : ठाणे जिल्ह्यातील उल्हासनगर शहरात पुन्हा एकदा एका अज्ञात व्यक्तीचा मृतदेह आढळून आला आहे. दहाचाळ भागातील सेंटर पार्क हॉटेलच्या परिसरात हा मृतदेह आढळून आला. मृतदेहाच्या डोक्यावर दुखापत असल्यामुळे हत्येचा संशय व्यक्त केला जात आहे.
काय आहे प्रकरण?
उल्हासनगर शहरात मागील काही दिवसांपासून हत्या, मृतदेह सापडणं यांचं सत्र सुरु आहे. त्यात आता आणखी एका मृतदेहाची भर पडलीये. विठ्ठलवाडी पोलीस ठाण्याच्या हद्दीत सेंटर पार्क हॉटेल असून या हॉटेलच्या बाजूला एक अज्ञात मृतदेह आज सकाळच्या सुमारास आढळून आला.
या मृतदेहाच्या डोक्यात इजा झाल्याचं दिसत असून त्यामुळे त्याची हत्या झाल्याचा संशय व्यक्त होत आहे. मृतदेहाची ओळख पटवण्याचं काम सध्या विठ्ठलवाडी पोलिसांकडून सुरु आहे.
वालधुनी नदीतही अज्ञात मृतदेह
याआधी, उल्हासनगरातून वाहणाऱ्या वालधुनी नदीत एक अज्ञात मृतदेह आढळला होता. नदीत 30 सप्टेंबरच्या रात्री उशिरा हा मृतदेह सापडला होता. त्यानंतर परिसरात एकच खळबळ उडाली होती.
नेमकं काय घडलं?
उल्हासनगर शहरातून वालधुनी नदी वाहते. सध्या या नदीचं नाल्यात रुपांतर झालंय. या नदीत उल्हासनगर रेल्वे स्थानकाच्या बाजूला असलेल्या संजय गांधी नगर परिसरात रात्री एका अज्ञात इसमाचा मृतदेह स्थानिकांना आढळला होता. याबाबत स्थानिकांनी पोलिसांना कळवल्यानंतर पोलिसांनी घटनास्थळी धाव घेत मृतदेह ताब्यात घेतला. मध्यवर्ती जिल्हा रुग्णालयात पाठवून मध्यवर्ती पोलीस तपास करत आहेत.
बुलडाण्यात डोंगर पायथ्याशी तरुणाचा मृतदेह
दरम्यान, बुलडाण्यात डोंगराच्या पायथ्याशी एका तरुणाचा मृतदेह काही दिवसांपूर्वी संशयास्पदरित्या आढळला होता. बुलडाणा जिल्ह्यातील खामगांव तालुक्यातील गारडगाव शिवारातील डोंगराच्या पायथ्याशी 32 वर्षीय व्यक्तीचा मृतदेह गावातील नागरिकांना आढळून आला. यामुळे परिसरात एकच खळबळ उडाली.
संतोष टवरे (रा. एकलारा बानोदा, तालुका संग्रामपूर) असे मृत तरुणाचे नाव असल्याचे त्याच्याजवळ मिळालेल्या आधार कार्डावरुन समजले होते. मृतदेहाजवळ दारुची छोटी बॉटल, एक गुलाबाचे फूल, ब्लाऊज आणि एक अगरबत्तीचा पुडाही आढळून आल्याने ही घटना घातपात असल्याची शंका व्यक्त केली जात आहे.
हेही वाचा :
उल्हासनगरात वालधुनी नदीत अज्ञात मृतदेह, परिसरात खळबळ, हत्या की आत्महत्या, गूढ कसं उलगडणार?
मुलाच्या काळजीमुळे अचानक यूटर्न, दोघांचा बळी घेणाऱ्या अपघातानंतर कार चालकाचा दावा
लग्नाच्या आमिषाने विवाहित पोलीस उपनिरीक्षकाकडून बलात्कार, कोथरुड पोलिसात तक्रार