वसई : महाराष्ट्र नवनिर्माण सेनेचे अध्यक्ष राज ठाकरे (Raj Thackeray) यांच्याबद्दल आक्षेपार्ह विधान करणे एका तरुणाला महागात पडले आहे. तरुणाला पकडून मनसे कार्यकर्त्यांनी (MNS Volunteers) चांगलाच चोप दिला. तरुणाला धुतानाचा व्हिडीओ सोशल मीडियावर व्हायरल (Viral Video) झाला आहे. मारहाण झालेला तरुण तक्रारदार महिलेशी असभ्य भाषेत बोलल्याचा आरोप आहे. यावेळी त्याने राज ठाकरेंविषयी आक्षेपार्ह वक्तव्य केल्याचाही दावा केला जात आहे. आक्षेपार्ह वक्तव्याची मोबाईल ऑडिओ क्लिप व्हायरल झाली. त्यानंतर तरुणाला शोधून वसईच्या कार्यालयाजवळ आणत मनसे पदाधिकऱ्यांनी त्याला चोप दिला. संबंधित महिलेच्या तक्रारीनंतर पोलिसांनी त्याच्याविरोधात विनयभंगाचा गुन्हा दाखल केला आहे. तर मारहाण केल्याप्रकरणी 8 ते 10 मनसे कार्यकर्त्यांवरही गर्दी जमवून मारहाण केल्याप्रकरणी गुन्हा नोंदवण्यात आला आहे.
कल्याणला राहणाऱ्या संबंधित महिलेने “एम्पॉवर एचआर सर्व्हिस” या कंपनीची जाहिरात पाहून लेखनाचा प्रोजेक्ट हाती घेतला होता. तो प्रोजेक्ट पूर्ण करुन दिल्यानंतर कंपनीने त्यात चुका काढल्या. त्यानंतर पैसे देण्यास संबंधित तरुण टाळाटाळ करत होता.
महिलेने फोनवर तरुणाशी बातचित केली, तेव्हा तो महिलेशी असभ्य भाषेत बोलल्याचा आरोप आहे. त्याचसोबत मनसे अध्यक्ष राज ठाकरे यांच्याबद्दलही त्याने आक्षेपार्ह वक्तव्य केल्याचा दावा केला जात आहे. आक्षेपार्ह वक्तव्याची मोबाईल ऑडिओ क्लिप व्हायरल झाल्यावर मनसे कार्यकर्त्यांनी त्याला शोधून काढलं. त्यानंतर वसईच्या कार्यालयाजवळ आणून मनसे पदाधिकऱ्यांनी त्याला पकडून चोप दिला आणि पोलिसांच्या हवाली केलं.
दरम्यान, माणिकपूर पोलिसांनी महिलेच्या तक्रारीवरुन तरुणाच्या विरोधात भादंवि कलम 509 अन्वये विनयभंगाचा गुन्हा दाखल केला आहे. तर तरुणाला मारहाण केल्याप्रकरणी 8 ते 10 मनसे कार्यकर्त्यांवरही गर्दी जमवून, मारहाण केल्याप्रकरणी गुन्हा नोंदवण्यात आला आहे.
संबंधित बातम्या :
VIDEO | भाजप नगरसेवकाकडून मारहाण, नागपुरात काँग्रेस कार्यकर्त्याचा विक्की कुकरेजांवर आरोप
CCTV | जागा आमची, पत्रे आमचे, तू का हटवतोस? डोंबिवलीत वादावादी, दोघा भावांची बिल्डरला मारहाण
CCTV | भररस्त्यात अडवून बेदम मारहाण, मग चाकूने भोसकलं, नांदेडमध्ये तरुणाच्या हत्येने खळबळ