Cuff Parade CCTV | आधी एकाला उडवलं, मग घाबरुन ब्रेकऐवजी अॅक्सलरेटर दाबला… खुद्द कार चालकाने सांगितला अपघाताचा थरार
अपघाताच्या वेळी कार चालक मद्यधुंद अवस्थेत होता. त्याच्या रक्ताचे नमुने रासायनिक विश्लेषणासाठी पाठवण्यात येणार असल्याचे पोलिसांनी सांगितले. मंगळवारी दुपारी हा अपघात झाला होता
मुंबई : मुंबईतील कफ परेड परिसरात (Cuff Parade) असलेल्या वर्ल्ड ट्रेड सेंटरच्या इमारतीजवळ झालेल्या अपघातातील आरोपी कार चालकाला 16 एप्रिलपर्यंत पोलीस कोठडी सुनावण्यात आली आहे. 27 वर्षीय मुकेश सिंगने त्याच्या मालकाची कार चालवताना टॅक्सीसह तिघा जणांना धडक दिली होती. पहिल्या पादचाऱ्याला धडक दिल्यानंतर आपण घाबरलो आणि ब्रेकऐवजी चुकून अॅक्सिलरेटर जोराने दाबला, असा दावा आरोपीने केला आहे. मंगळवारी दुपारी झालेल्या या अपघातात एकाचा मृत्यू झाला, तर तिघे जण गंभीर जखमी झाले आहेत. आरोपीला बुधवारी कोर्टात हजर केलं असता त्याला तीन दिवसांची पोलीस कोठडी सुनावण्यात आली.
नेमकं काय घडलं?
अपघाताच्या वेळी कार चालक मद्यधुंद अवस्थेत होता. त्याच्या रक्ताचे नमुने रासायनिक विश्लेषणासाठी पाठवण्यात येणार असल्याचे पोलिसांनी सांगितले. टाईम्स ऑफ इंडियाने यासंदर्भात बातमी दिली आहे. या अपघातात नवी मुंबई पोलीस आयुक्तालयाचे मुख्य लिपिक प्रसेनजीत धाडसे (वय 36 वर्ष) यांचा मृत्यू झाला, तर रिझर्व्ह बँक ऑफ इंडियाचे एजीएम नितेशकुमार मंडल (वय 43 वर्ष) आणि एसबीआय कॅपिटलचे सहाय्यक उपाध्यक्ष सुजय कुमार विश्वास (वय 35 वर्ष) हे दोन बँकर आणि अन्य कार चालक आसिफ शेख (वय 44 वर्ष) गंभीर जखमी झाले आहेत.
“मंडल आणि शेख यांना रुग्णालयातून डिस्चार्ज देण्यात आला आहे, तर सुजय कुमार हे उपचारांना प्रतिसाद देत आहेत. त्यांच्यावर लवकरच शस्त्रक्रिया होण्याची शक्यता आहे” अशी माहिती पोलिसांनी दिली आहे.
पादचाऱ्याने सांगितलं काय घडलं
“नमाज पढून मी तिघा जणांसोबत परत येत होतो. मी फूटपाथच्या जवळच होतो, तर माझे मित्र पुढे चालत होते. अचानक एका भरधाव कारने मला धडक दिली. मी हवेत उडून जमिनीवर पडलो. त्यानंतर ती गाडी पुढे जाऊन आणखी काही जणांना आणि टॅक्सीला धडकली” असं शेख यांनी सांगितलं.
पाहा व्हिडीओ :
कफ परेड परिसरात भरधाव गाडीने चार जणांना उडवले#Mumbai #CuffParade #Accident #Car #Death pic.twitter.com/dk6KWhR9zU
— TV9 Marathi (@TV9Marathi) April 12, 2022
संबंधित बातम्या :
कफ परेड परिसरात भरधाव गाडीने चार जणांना उडवले; अपघाताची भीषण घटना CCTV मध्ये कैद
कसारा घाटात एकामागून एक दोन अपघात, आधी आयशर पलटली, नंतर कंटेनर-कार अपघातात सहा महिला जखमी
इंदुरीकर महाराज अपघातातून बालंबाल बचावले, लाकडं नेणाऱ्या ट्रॅक्टरला कारची भीषण धडक