नवरा-बायकोच्या आड येतंय रात्री-अपरात्रीचं चॅटिंग! 6 महिन्यातली चिंताजनक आकडेवारी एकदा बघाच
Mobile Chatting : सहा महिन्यात एकूण 455 तक्रारी दाखल
नवरा बायको म्हटलं की त्यांच्यात खटके (Husband Wife Dispute) उडणारच. पण खटके उडण्याचं आणि ते खटके चक्क पोलिसांपर्यंत घेऊन जाण्याचं प्रमाण कमालीचं वाढलं आहे. गेल्या सहा महिन्यातल्या आकडेवारीनं नवरा बायकोच्या (Husband Wife relation) नात्यातील भांडणांचं प्रमुख कारण हे सोशल मीडिया ठरत असल्याचं अधोरेखित होताना पाहायला मिळतंय. व्हॉट्सअप, फेसबुक यामुळे नवरा बायको यांच्यामधील संवादावर परिणाम होतोय. एकीकडे जग जवळ आलंय, पण नवरा बायकोचं नातं आणि त्यांच्यातला संवाद रात्री अपरात्रीच्या चॅटिंगने (WhatsApp Chatting) बिघडत चाललाय. ठाणे पोलिसांकडे आलेल्या गेल्या सहा महिन्यातील तक्रारी काळजी वाढवण्याऱ्या आहेत. ठाणे शहर पोलिसांच्या भरोसा सेलकडे एकूण 455 तक्रारी गेल्या सहा महिन्यांत दाखल करण्यात आल्याची माहिती समोर आली आहे. यातील 21 जणांचे संसार वाचवण्यास यशही आलंय.
चिंताजनक आकडेवारी
2022 या वर्षातील पहिल्या सहा महिन्यात एकूण 455 तक्रारी दाखल करण्यात आल्या आहेत. त्यातील 362 प्रकरण प्रलंबित आहे. तर 21 प्रकरणांत दाम्पत्यांचं समुपदेशन करुन त्यांचे संसार नव्याने फुलवण्यात भरोस सेलला यश आलंय.
2 घटना आणि वाद मिटवण्यात यश
अनेक प्रकरणांपैकी दोन प्रकरणांबाबत माहितीही समोर आली आहे. यापैकी एका प्रकरणात पती रात्री सोशल मीडियात व्यस्त असायचा. तर दुसऱ्या प्रकरणात पती घरातील कामावरुन पत्नीला सतत मारहाण करत होता. दुसऱ्या प्रकरणात महिलेला तिची सासू आणि नणंदही सतत वाद घालायच्या. पण या दोन्ही प्रकरणात दाम्पत्याचं समुपदेशन करुन दोन्ही प्रकरणात संसार वाचवण्यास भरोस सेलला यश आलंय. पत्नी पत्नी यांच्यात होत असलेल्या वादाच्या प्रमुख कारणांपैकी एख कारण मोबाईलचा अतिवापर असल्याचं दिसून आलं आहे. त्यातही एकमेकांनी व्हॉट्सअपला फोटो न ठेवणं किंवा एकमेकांना पासवर्डची माहिती न देणं, यातूनही खटके उडत असल्याची अनेक प्रकरण निदर्शनास आली आहेत.
दरम्यान, आणखी एका प्रकरणा पत्नी ही सारखी व्हॉट्सअपवरील मेसेजमध्येच व्यस्त असते. ती वेळच देत नाही, अशीही एक तक्रार समोर आली होती. वारंवार समज देऊनही बायको वेळच नाही, अशी तक्रार पोलिसांकडे देण्यात आलेली होती. दोन महिन्यांपूर्व देण्यात आलेल्या तक्रारीची तुफान चर्चाही झाली होती.
काय काळजी घ्यावी?
- नवरा-बायकोच्या नात्यामध्ये पती-पत्नीच्या आईवडिलांसाह बहिण, दीर यांच्याकडून होणारा हस्तक्षेप टाळावा
- सासू-सासरे, आई-वडील यांनी भावनिक आधार घ्याव
- वडीलधारे या नात्यानं पती-पत्नीमधील वाद मिटवण्यासाठी समुपदेशन करावं
- मोबाईलचा वापर शक्य तितकाच करावा, अनावश्यक वापर टाळावा
- पती-पत्नी यांनी एकमेकांशी संवाद ठेवण्याची नितांत गरज