Mumbai : एफआयआरला उशीर, बलात्काराचा आरोप असलेल्याला जामीन मंजूर! कोर्टाचा महत्त्वपूर्ण निर्णय
Mumbai Session Court : फेसबुकवर तक्रारदार महिलेची एका पुरुषाशी ओळख झाली होती. त्यानंतर या पुरुषासोबत मैत्री झालेल्या या महिलेवर बलात्कार करण्यात आला. फेसबुकवर मैत्री केलेल्या या पुरुषानेच आपल्यावर बलात्कार केला, असा आरोप तक्रारीतून करण्यात आला होता.
मुंबई : मुंबई सत्र न्यायलायने (Mumbai Session Court) एक महत्त्वपूर्ण निकाल दिला आहे. बलात्काराचा (Rape accused) आरोप असलेल्या एका आरोपीला जामीन मंजूर करताना कोर्टानं महत्त्वाचं निरीक्षण नोंदवलं. एफआयआर दाखल करण्यास उशीर झाल्याने आरोपीला जामीन मंजूर करत असल्याचं कोर्टानं म्हटलंय. सोबत एफआयरमधील (FIR) अनेक गोष्टी विसंगत असल्याचा युक्तिवाद आरोपीच्या वकिलांकडून करण्यात आला होता. मुंबई सत्र न्यायालयात काळा चौकी पोलीस स्थानकात दाखल करण्यात आलेल्या बलात्काराच्या तक्रारीवर सुनावणी पार पडली. एका विवाहितेनं आपल्यावर बलात्कार करण्यात आल्याचा आरोप केला होता. या आरोपांबाबतची पोलीस तक्रार उशिरा दाखल करण्यात आल्याचं कोर्टाच्या निदर्शनास आलं. त्याचप्रमाणे या तक्रारीत विसंगती असल्याचंही सकृत दर्शनी पुराव्यांच्या आधारे आढळून आल्यानं कोर्टानं आरोपीला दिलासा दिलाय. आरोपीला अटीशर्थींसह जामीन मंजूर करण्यात आला.
नेमकं काय प्रकरण?
टाईम्सने दिलेल्या वृत्तानुसार, फेसबुकवर तक्रारदार महिलेची एका पुरुषाशी ओळख झाली होती. त्यानंतर या पुरुषासोबत मैत्री झालेल्या या महिलेवर बलात्कार करण्यात आला. फेसबुकवर मैत्री केलेल्या या पुरुषानेच आपल्यावर बलात्कार केला, असा आरोप तक्रारीतून करण्यात आला होता. याच पुरुषासोत आपले प्रेमसंबंधही होते, असंही तक्रारदार महिलेनं आपल्या तक्रारीत म्हटलं होतं. आपल्या जबाबात परस्परविरोधाभास आढळला आहे, असा युक्तिवाद आरोपीच्या वकिलांकडून करण्यात आला. त्यानंतर यात तथ्य असल्याचं आढळल्यानं न्यायमूर्ती माधुरी देशपांडे यांनी आरोपी प्रतिक कुरडे यांस जामीन मंजूर केला. 30 हजार रुपयांच्या जातमुचलक्यावर अटीशर्थींसह बलात्काराचा आरोप करण्यात आलेल्या प्रतिकला कोर्टाने जामीन दिला.
काळाचौकी पोलीस स्थानकात बलात्कार प्रकरणी महिलेनं तक्रार दाखल केली होती. फेसबुकवर पीडितेची प्रतिकसोबत मैत्री झाली, असं तिने म्हटलं होतं. त्यानेतर या दोघांमध्ये मैत्री झाली आणि त्यानंतर त्यांचे प्रेमसंबंध जुळले असलंही नमूद करण्यात आलेलं होतं. मात्र बलात्काराची ही तक्रार देण्यास पीडितेने उशीर केला असल्याचं कोर्टाच्या निदर्शनास आणून दिलं. असं नेमका का करण्यात आलं, याबाबत साशंकता असल्यानं कोर्टानं आरोपीला जामीन मंजूर केला.