अदानींच्या ताब्यातील बंदरावर हजारो कोटींचं हेरॉईन जप्त, उलटसुलट चर्चांनंतर अदानींचं स्पष्टीकरण

कच्छ येथील मुंद्रा पोर्टवर 16 सप्टेंबर रोजी अंदाजे 3 हजार किलो वजनाचे हेरॉईन (ड्रग्स) जप्त करण्यात आलं. आंतरराष्ट्रीय बाजारात या हेरॉईनची किंमत 20 हजार कोटी रुपयांच्या आसपास असल्याचा अंदाज आहे.

अदानींच्या ताब्यातील बंदरावर हजारो कोटींचं हेरॉईन जप्त, उलटसुलट चर्चांनंतर अदानींचं स्पष्टीकरण
अदानींच्या ताब्यातील मुंद्रा पोर्टवर हेरॉईनचा साठा जप्त
Follow us
| Updated on: Sep 22, 2021 | 8:14 AM

गांधीनगर : गौतम अदानी यांच्या ताब्यात असलेल्या गुजरातच्या मुंद्रा पोर्टवर हजारो कोटींचं हेरॉईन जप्त झाल्याच्या प्रकरणात नवा खुलासा करण्यात आला आहे. या तस्करीशी कोणताही संबंध नाही, सोशल मीडियावर नाहक बदनामी केली जात आहे, असं स्पष्टीकरण अदानी ग्रुपच्या अधिकृत ट्विटर अकाऊण्टवरुन रात्री उशिरा परिपत्रक जारी करत देण्यात आलं आहे.

काय आहे प्रकरण?

कच्छ येथील मुंद्रा पोर्टवर 16 सप्टेंबर रोजी अंदाजे 3 हजार किलो वजनाचे हेरॉईन (ड्रग्स) जप्त करण्यात आलं. आंतरराष्ट्रीय बाजारात या हेरॉईनची किंमत 20 हजार कोटी रुपयांच्या आसपास असल्याचा अंदाज आहे. तालिबान आणि आयएसआयशी या प्रकरणाचा संबंध असल्याचा तपास यंत्रणांना संशय आहे.

डीआरआय महसूल गुप्तचर संचालनालयने ड्रग्ज तस्करी प्रकरणात ही जगातील सगळ्यात मोठी कारवाई केली. या कारवाईनंतर डीआरआयकडून अहमदाबाद, चेन्नई आणि दिल्लीपर्यंत छापेमारी करण्यात येत आहे. या तस्करीचे धागेदोरे हे अफगाणिस्तानात असल्याने अनेकांचा भुवया उंचावल्या आहेत.

अदानी ग्रुपचं स्पष्टीकरण काय?

16 सप्टेंबर रोजी डीआरआय आणि कस्टम्स विभागाने अफगाणिस्तानातून आलेल्या दोन कंटेनरमधून मुंद्रा आंतरराष्ट्रीय कंटेनर टर्मिनलवर (एमआयसीटी) मोठ्या प्रमाणावर हेरॉईनचा साठा जप्त करण्यात आला. अवैध अंमली पदार्थांचा साठा आणि आरोपींची धरपकड केल्याप्रकरणी आम्ही डीआरआयचे अभिनंदन करतो.

डीआरआय आणि कस्टम्स विभागाला सरकारने बेकायदेशीर कार्गो उघडून तपासणी करण्याचे अधिकारी दिले आहेत. मात्र देशभरातील कुठलाही पोर्ट ऑपरेटर कंटेनरची तपासणी करु शकत नाही, असं यात स्पष्ट करण्यात आलं आहे.

अदानी ग्रुपविरोधातील सोशल मीडियावर सुरु असलेल्या खोट्या आणि बदनामीकारक चर्चांना पूर्णविराम मिळेल, अशी आशा आम्ही व्यक्त करतो. आमच्या कुठल्याही पोर्टवर उतरणाऱ्या कार्गोची तपासणी करण्याचे आमचे धोरण नाही, असंही अदानी ग्रुपने स्पष्ट केले आहे.

हेरोईनचा सुगावा कसा लागला?

आंध्र प्रदेशातल्या विजयवाड्यात आशी ट्रेडिंग नावाची कंपनी आहे. या कंपनीनं अफगाणिस्तानमधून काही बाबी इम्पोर्ट केल्याची टिप डीआरआयला लागली. त्यातही यात ड्रग्ज असल्याचं टिप देणाऱ्यानं सांगितलं होतं. त्याच आधारावर मुंद्रा बंदरात आलेल्या दोन कंटेनरची झडती अधिकाऱ्यांनी घेतली. अधिकाऱ्यांना कंटेनरमध्ये ड्रग्जसारखी पावडर मिळाली. त्यांनी अधिक चौकशी केली असता, ती पावडर टॅलकम पावडर असल्याचं सांगितलं गेलं. घटनास्थळावर गांधीनगरचे फॉरेन्सिक एक्स्पर्ट हजर होते. त्यांनी ती पावडर तपासली आणि त्यात हेरॉईन असल्याची खात्री केली. अगदी तंतोतंत सांगायचं तर पहिल्या कंटेनरमध्ये 1999.58 किलो हेरॉईन होती तर दुसऱ्या कंटेनरमध्ये 988.64 किलो म्हणजेच 2 हजार 988.22 किलो एवढे हेरॉईन जप्त करण्यात आले. हे कंटेनर अफगाणिस्तानमधून जरी आले असले तरीसुद्धा ते इराणच्या बंदर अब्बास पोर्टमधून आलेले आहेत.

संबंधित बातम्या :

बाप रे ! गुजरातमध्ये 9 हजार कोटीची हेरोईन जप्त, जगातली आतापर्यंतची सर्वात मोठी तस्करी उघड, अफगाण कनेक्शन

NCB ची नवी मुंबईत मोठी कारवाई, आंतरराष्ट्रीय ड्रग्ज तस्कराला अटक

नागपुरात ड्रग्ज तस्करांनी हातपाय पसरले; एकाला अटक करून 5 किलो गांजा जप्त

भुजबळांची नाराजी,भाजप प्रवेशाचा गेमप्लॅन अन्... दमानिया काय म्हणाल्या?
भुजबळांची नाराजी,भाजप प्रवेशाचा गेमप्लॅन अन्... दमानिया काय म्हणाल्या?.
भिवंडी हादरली....निर्जनस्थळी अल्पवयीन मुलीची हत्या, मृतदेह आढळताच....
भिवंडी हादरली....निर्जनस्थळी अल्पवयीन मुलीची हत्या, मृतदेह आढळताच.....
नातवासोबत एकनाथ शिंदेंचा शेतात फेरफटका, शेतीकामात रमले अन्...
नातवासोबत एकनाथ शिंदेंचा शेतात फेरफटका, शेतीकामात रमले अन्....
शिरसाट मंत्री होताच अॅक्शनमोडवर,कॅमेऱ्यासमोरच महिला अधिकाऱ्यांना झापलं
शिरसाट मंत्री होताच अॅक्शनमोडवर,कॅमेऱ्यासमोरच महिला अधिकाऱ्यांना झापलं.
'तुमचा संतोष देशमुख करू...', तानाजी सावंत यांच्या दोन पुतण्यांना धमकी
'तुमचा संतोष देशमुख करू...', तानाजी सावंत यांच्या दोन पुतण्यांना धमकी.
धनंजय मुंडे अन् वाल्मिक कराडचे संबंध काय? अंजली दमानियांचा हल्लाबोल
धनंजय मुंडे अन् वाल्मिक कराडचे संबंध काय? अंजली दमानियांचा हल्लाबोल.
मुख्यमंत्री किंवा दादांनी बीडच पालकमंत्रिपद स्वीकाराव, कोणी केली मागणी
मुख्यमंत्री किंवा दादांनी बीडच पालकमंत्रिपद स्वीकाराव, कोणी केली मागणी.
हिवाळ्यात पावसाळा? 26-27 डिसेंबरला अवकाळी पाऊस, 'या' ठिकाणी कोसळणार
हिवाळ्यात पावसाळा? 26-27 डिसेंबरला अवकाळी पाऊस, 'या' ठिकाणी कोसळणार.
सिगारेट बट्सपासून 100 कोटींचा व्यवसाय, तरुणाची भन्नाट कल्पना
सिगारेट बट्सपासून 100 कोटींचा व्यवसाय, तरुणाची भन्नाट कल्पना.
बंगल्याच्या वाटपावरून महायुतीत धुसफूस? शिवसेनेच्या मंत्र्यांकडून खंत
बंगल्याच्या वाटपावरून महायुतीत धुसफूस? शिवसेनेच्या मंत्र्यांकडून खंत.