Mumbai Crime : युट्युबवर बघून तरुणाने बनवला बॉम्ब! शिपमेंटला आग लावून फोडला घाम, जोगेश्वरीत खळबळ

Mumbai Crime News : नुकतीच बारावीची परीक्षा दिलेल्या या मुलानं मोठा जुगाड केला.

Mumbai Crime : युट्युबवर बघून तरुणाने बनवला बॉम्ब! शिपमेंटला आग लावून फोडला घाम, जोगेश्वरीत खळबळ
धक्क्दायक घटना...Image Credit source: TV9 Marathi
Follow us
| Updated on: Jul 15, 2022 | 10:18 AM

मुंबई : चार लाखाचा कॉम्पुटर खरेदी करता यावा, म्हणून एक तरुणाने चक्क युट्युबवर (You Tube) व्हिडीओ पाहून बॉम्ब बनवला आणि जोगेश्वरीतील (Jogeshwori Crime News) एका शिपमेंटला आग लावून दिली. आग लागल्यानंतर नुकसान भरपाई म्हणून विम्याचे पैसे मिळतील, आणि त्यातून आपल्याला लाख मोलाचा कॉम्पुटर खरेदी करता येईल, असं प्लानिंग या मुलानं केलं होतं. पण हा प्लॅन फसलाय. आग लावून नुकसान केल्याप्रकरणी जोगेश्वरीतल्या अल्पवयीन तरुणाला अटक (Minor Arrested) करण्यात आली आहे. या तरुणाच्या चौकशीतून धक्कादायक बाब उघडकीस आली. युट्युबवर या मुलानं घरात कुणीही नसताना व्हिडीओ पाहिला. व्हिडीओ पाहून इलेक्ट्रीक सर्किट बनवलं आणि पार्सल दिल्ल्याच्या एका खोट्या पत्त्यावर पाठवून दिलं. प्रवासात पार्सल फुटल्यास नुकसान भरपाई मिळेल असं या तरुणाला वाटलं होतं. त्यांनी त्याला चार लाखाचा कॉम्प्युटर आणि लाख रुपयांचा मोबाईल खरेदी करायचा होता. हा सगळा प्रकार कळल्यानंतर पोलीसही चक्रावून गेलेत.

नेमकं केलं काय तरुणानं?

नुकतीच बारावीची परीक्षा दिलेल्या या तरुणानं मोठा जुगाड केला. पैसे कमावण्यासाठी या मुलाने दोन कॉम्प्युटर प्रोसेसर खरेदी केल्याचं भासवलं. त्याचं एक बनावट बिलही तयार केलं आणि एका विमान कंपनीची पॉलिसी खरेदी केली. युट्युबवरच या मुलानं या विम्याबाबतचा व्हिडीओ पाहिला होता. एखाद्या शिपमेंटला आग लागली किंवा नुकसान झालं, तर इलेक्ट्रीक सामानाची मूळ किंमत आणि दहा टक्के नुकसानभरपाई मिळते, अशी माहिती या मुलाला मिळाली होती. म्हणून त्याने आग लावण्यासाठी युट्युबवरच व्हिडीओ बघून एक बॉम्ब तयार केला.

घरात कुणीही नसताना या मुलानं इलेक्ट्रीक सर्किट तयार केलं आणि ते पार्सल करण्यासाठी दिल्ल्याच्या एका बोगस पत्त्यावर पाठवलं. जोगेश्वरीत हे पार्सल एक कुरीअर कंपनीत देण्यात आलं. त्यावेळी कंपनीच्या वेअर हाऊसमध्ये पार्सल वेगळं करताना अचानक आग लागली. या आगीची माहित मिळताच पोलिसांनी तत्काळ घटनास्थळी चौकशी केली. पोलिसांच्या तपासात एका पार्सलमध्ये फाटके आणि इलेक्ट्रीक सर्किट आढलं. याची गंभीक जखल घेत पोलिसांनी आपल्या तपासाची सगळी सूत्र फिरवली.

हे सुद्धा वाचा

सांताक्रूझमधून तरुणाला अटक

हे पार्सल नेमकं कुठून आलं, कुणी दिलं, याची चौकशी करण्यात आली. त्यानंतर पोलिसांचं पथक सांताक्रूझला पोहोचलं आणि त्यांनी पोलिसांनी एका अल्पवयीन मुलाला ताब्यात घेतलं. या अल्पवयीन मुलाच्या चौकशीतून युट्युबवर व्हिडीओ पाहून या मुलाने हा प्रताप केल्याचं उघड झालं. या मुलानं नुकतीच दहावीची परीक्षा दिलेली होती. त्यानंतर तो नीट परीक्षेलाही बसणार होता. पण चार लाखाचा पीसी घेण्यासाठी, लाख रुपयांच्या मोबाईलसाठी त्याने ही धक्कादायक पाऊल उचललं. आता पोलिसांनी या अल्पवयीन मुलाची रवानगी डोंगरीतील बालसुधारगृहात केलीय.

कराडच्या पत्नीकडे 'ते' व्हिडीओ, सुरेश धस स्पष्ट म्हणाले; ' मी लई...'
कराडच्या पत्नीकडे 'ते' व्हिडीओ, सुरेश धस स्पष्ट म्हणाले; ' मी लई...'.
सैफवर हल्ला करणाऱ्या 'त्या' व्यक्तीचा फोटो समोर, आरोपीची ओळख पटली?
सैफवर हल्ला करणाऱ्या 'त्या' व्यक्तीचा फोटो समोर, आरोपीची ओळख पटली?.
सैफच्या हल्ल्यावर मुख्यमंत्र्यांची पहिली प्रतिक्रिया; म्हणाले...
सैफच्या हल्ल्यावर मुख्यमंत्र्यांची पहिली प्रतिक्रिया; म्हणाले....
सैफवर हल्ला करणाऱ्या 'त्या' व्यक्तीचं लोकेशन ट्रेस, मुंबईच्या या भागात
सैफवर हल्ला करणाऱ्या 'त्या' व्यक्तीचं लोकेशन ट्रेस, मुंबईच्या या भागात.
सैफचा जीव घ्यायचा होता? बॉलिवूडच्या खलनायकाकडून हल्ल्याचा निषेध
सैफचा जीव घ्यायचा होता? बॉलिवूडच्या खलनायकाकडून हल्ल्याचा निषेध.
लाडकी बहीण योजना महिलांना आमिष दाखवण्यासाठी... सरकारनं काय म्हटलं?
लाडकी बहीण योजना महिलांना आमिष दाखवण्यासाठी... सरकारनं काय म्हटलं?.
'बारामतीत दरमहिन्याला बोलवत जा कारण...', मुंडे दादांना काय म्हणाल्या?
'बारामतीत दरमहिन्याला बोलवत जा कारण...', मुंडे दादांना काय म्हणाल्या?.
ट्रेन रिकामी, सीटवर पाय; विशेष लोकलमध्ये रेल्वे कर्मचाऱ्यांची दादागिरी
ट्रेन रिकामी, सीटवर पाय; विशेष लोकलमध्ये रेल्वे कर्मचाऱ्यांची दादागिरी.
...म्हणून सैफ टार्गेटवर, शरद पवार गटाच्या बड्या नेत्याला कोणावर संशय?
...म्हणून सैफ टार्गेटवर, शरद पवार गटाच्या बड्या नेत्याला कोणावर संशय?.
सैफची प्रकृती सध्या कशी? 'लिलावती'कडून निवेदन जारी, नेमकं काय म्हटलंय?
सैफची प्रकृती सध्या कशी? 'लिलावती'कडून निवेदन जारी, नेमकं काय म्हटलंय?.