मुंबई : नवजात बाळांची विक्री करणाऱ्या रॅकेटचा (Mumbai New born baby stealing racket) पोलिसांनी (Mumbai Police News) नुकताच पर्दाफाश केला होता. क्राईम पोलिसांनी केलेल्या या कारवाईनंतर सुरु असलेल्या न्यायलयीन खटल्यादरम्यान, महत्त्वपूर्ण निर्देश मुंबई कोर्टाने दिलेत. विक्री करुन दत्तक घेतलेल्या मुलांचा ताबा त्याच पालकांकडे दिला जावा, असं कोर्टानं (Mumbai Court News) म्हटलं आहे. सहा अल्पवयीन मुलांना पोलिसांनी रेस्क्यू केलं होतं. या मुलांची विक्री करण्यात आल्याचा संशय पोलिसांना होता. याप्रकरणी मुलं ज्यांच्याकडे आढळून आली होती, त्यांपैकी काही जणांना अटकही करण्यात आलेली. याप्रकरणातील एका मुलाबाबत सुनावणी देताना, दत्तक घेतलेल्या मुलाप्रकरणी एका वडिलांना अटक करण्यात आली होती. त्याच्यावर पैसे देऊन या मुलाची खरेदी केली असल्याचा ठपका ठेवण्यात आला होता. दरम्यान, काही मुलांचं रेस्क्यू करताना अनेक पालकांनी मूल दत्तक घेण्याची कायदेशीर प्रक्रिया पूर्ण केली नसल्याचंही पोलिसांच्या कारवाईत दिसून आलं होतं. अखेर आता याप्रकरणी कोर्टानं महत्त्वाचे निर्देश दिलेत.
नैसर्गिकरीत्या मूल होत नाही, म्हणून एका दाम्पत्यानं बाळ दत्तक घेतलं होतं. नव्यानेच जन्मलेल्या अवघ्या काही आठवड्यांच्या चिमुकल्याला दत्तक घेण्यात आलेलं होतं. या बाळाचं पालकत्व मिळावं, यासाठी मुंबई हायकोर्टात या दाम्पतानं याचिका केली. मात्र कोर्टात दाखल करण्यात आलेल्या मेडिकल रिपोर्टमध्ये दाम्पत्य हे मेडिकली फीट असून आता या मुलाचा कायमस्वरुपी ताबा मिळावा, अशी मागणी करण्यात आली आहे. यावर मुंबई हायकोर्ट काय निर्णय देतं तेही पाहणं महत्त्वाचंय.
एका 3 वर्षांच्या मुलाला दीड लाख रुपये देऊन दत्तक घेतल्याचा आरोप इसमावर करण्यात आला होता. त्याला याप्रकरणी पोलिसांनी अटकही केली होती. दरम्यान, आपल्यावरीन आरोप या इसमानं फेटाळून लावला होता. हा इसम 44 वर्षांचा असून तो आणि त्याचीी 37 वर्षांची पत्नी बाळाचा सांभाळ करत होते. त्यांना मूल होत नसल्यानं त्यांनी बाळाचं पालकत्व स्वीकारलं होतं. लग्नाला वीस वर्ष होऊनही बाळ होऊ न शकल्यानं त्यांनी बाळाचं पालकत्व स्वीकारलं होतं. या बाळाचे मूळ पालक त्याचा गरिबीमुळे सांभाल करु शकत नव्हते, म्हणून आम्ही त्याचं पालकत्व स्वीकारलं, असा युक्तिवाद या दाम्पत्याकडून कोर्टात करण्यात आला. त्यांनी दत्तक घेण्याचा करारही 3 सप्टेंबर 2019 मध्ये केल्याचा दावा कोर्टात केला होता.
पण अचानक एक दिवस त्यांना पोलिसांचा फोन आला आणि त्यांनी या विक्री केलेल्या बाळाच्या खरेदी केल्याचा आरोप आमच्यावर लावला गेला, असं कोर्टात सांगितलं. जानेवारी 2021 मध्ये मुंबई पोलिसांच्या क्राईम ब्रांचने नवजात बाळांची खरेदी-विक्री करणाऱ्या एका टोळीचा पर्दाफाश केला होता. त्यानंतर एका मुलीती 60 हजाराला तर लहान मुलाही दीड लाखाला विक्री करण्यात आल्याचं तपासातून समोर आलं होतं. पोलिसांनी तशी चार्जशीटही मार्च 2021 मध्ये दाखल केली होती. त्यानंतर 18 महिन्यांनी नवजात बाळांची विक्री करणाऱ्या रॅकेटचा पोलिसांनी पर्दाफाश केला होता. दरम्यान, पोलिसांनी लावलेल्या आरोपांचं खंडन करत दाम्पत्यानं या मुलाचा ताबा पूर्ण वेळ मिळावा, यासाठी हायकोर्टात दाद मागितली असल्याचंही म्हटलंय.