Mumbai : मुलगी झोपेत असताना वडील नको तिथे स्पर्श करायचे! आता तर थेट….
चेंबूर येथील रुग्णालयातील थरारक घटना! मुलीच्या वडिलांना अटक, समोर आली धक्कादायक माहिती
मुंबई : एका 44 वर्षांच्या व्यक्तीला स्वतःच्या मुलीचं लैंगिक शोषण केल्याप्रकरणी अटक करण्यात आलीय. धक्कादायक बाब म्हणजे पीडित मुलीवर रुग्णालयात उपाचार सुरु होते. तेव्हा नराधम पित्याने मुलीचा जीव घेण्याचा प्रयत्न केला. पण रुग्णालय प्रशासनाच्या सतर्कतेमुळे या मुलीला वाचवण्यात आणि नराधम पित्याच्या डाव उधळून लावण्यात यश आलंय. झोपेच्या गोळ्याचं अतिसेवन केल्यामुळे पीडितेला रुग्णालयात दाखल करण्यात आलं होतं. तिच्यावर उपचार सुरु होते. त्यादरम्यान ही घटना घडली.
चेंबूर येथील एका खासगी रुग्णालयात थरारक घटना घडली. वॉर्ड अटेंडट म्हणून काम करणाऱ्या एका व्यक्तीने आपल्याच मुलीसोबत संतापजनक कृत्य केली. या व्यक्तीलाल अटक करण्यात आलीय. रुग्णालयातच या व्यक्तीने धक्कादायक कृत्य केला.
ही व्यक्ती चाकू घेऊन मुलीची हत्या करण्याच्या उद्देशाने रुग्णालयात आली होती. पण रुग्णालयातील स्टाफला शंका आल्यानंतर मोठा अनर्थ टळला. या व्यक्तीकडील चाकूही जप्त करण्यात आला. तसंच या व्यक्तीला आता पोलिसांच्या ताब्यात देण्यात आलं आहे.
चेंबूर पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, नराधम पित्याला अटक करण्यात आली आहे. पण हे संपूर्ण प्रकरण पॉक्सो कायद्याअंतर्गत येत असल्यानं याप्रकरणी अधिक माहिती देणं पोलिसांना टाळलं आहे.
समोर आलेल्या माहितीनुसार, पीडित मुलीच्या वडिलांनी तिच्यावर वेळोवेळी लैंगिक शोष केलं होतं. पीडित अल्पवयीन मुलगी झोपेत असताना तिचे वडील तिला नको तिथं स्पर्श करताचे. या प्रकारामुळे पीडिता बिथरली होती. ती प्रचंड मानसिक तणावाखाली होती. तसंच तिच्या मनात भीती भरली होती, अशीही माहिती समोर आली आहे.
प्रचंड मानसिक तणावाखाली असलेल्या या पीडितेनं झोपेच्या गोळ्या घाल्या होत्या. त्यामुळे तिला रुग्णालयात दाखल करण्याची वेळ ओढावली होती. सोमवारी तिला रुग्णालयात दाखल करण्यात आलं होतं. रुग्णालयात आल्यानंतर मुलगी आपला भांडाफोड करेल, अशी भीती तिच्या पित्याला होती. त्यामुळे त्याने तिची हत्या करण्याचा कट आखला होता. म्हणूनच तो चाकू घेऊन मुलीची हत्या कऱण्याच्या उद्देशाने रुग्णालयात आला असावा, अशी शंका घेतली जातेय.
आता नराधम पित्याला अटक करण्यात आली असून चेंबूर पोलिसांनी याप्रकरणी गुन्हा दाखल केला आहे. पीडितेच्या वडिलांची कसून चौकशी केली जाते आहे. तसंच मुलीचाही जबाब नोंदवून घेतला जाईल. त्यानंतर पुढील कारवाई केली जाणार आहे.